Monday, September 29, 2025

हेअर केअर टिप्स: एक सवय बदलू शकते तुमच्या केसांचे आरोग्य, झोपताना केस बांधावे की मोकळे सोडावे? जाणून घ्या अधिक माहिती

हेअर केअर टिप्स: एक सवय बदलू शकते तुमच्या केसांचे आरोग्य, झोपताना केस बांधावे की मोकळे सोडावे? जाणून घ्या अधिक माहिती

मुंबई : तुमच्या झोपण्याच्या पद्धतीमुळे केसांच्या आरोग्यावर होऊ शकतात परिणाम हे तुम्हाला माहितेय का? दिवसभराच्या धकाधकीच्या जीवनात, प्रदूषणाच्या वातावरणातून घरी आल्यानंतर आपण रात्री शांत झोप घेतो तेव्हा केसही झोप घेतात असा सर्वांचा समज आहे. पण झोप घेताना छोट्याशा चुकीच्या सवयीचा खूप मोठा परिणाम होऊ शकतो. तुम्ही झोपताना केस बांधून झोपता की मोकळे ठेवून झोपता यावर तुमच्या केसांचे आरोग्य अवलंबून असते. यापैकी तुम्हाला कोणती सवय आहे? यापैकी कोणती सवय अधिक फायदेशीर ठरेल... हे सविस्तर जाणून घ्या...

केस बांधून झोपणे की मोकळे ठेऊन झोपणे काय फायदेशीर ठरेल?

जर तुमच्या केसांची लांबी लहान असेल तर मोकळे केस ठेवून झोपू शकता. परंतु जाड किंवा पातळ तसेच लांबी मोठी असल्यास केस बांधून झोपणे अधिक फायदेशीर ठरेल. त्यामुळे केसांचा गुंता होणे, केस तुटणे, केस कोरडे होणे, हे होण्यापासून टाळू शकतो. जर केस मोकळे सोडून झोपलो तर स्काल्पच्या भागातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते व मुळांना पोषण तत्वांचा पुरवठा योग्य रित्या होतो.

झोपताना केस बांधून झोपल्यास होणारे फायदे

जर तुमचे केस लांब व घनदाट असतील तर सैल वेणी घालून झोपणे अधिक फायद्याचे ठरते. यामुळे केसांचा गुंता होत नाही, केस तुटत नाहीत, व लांब होण्यास मदत होते. सैल वेणी बांधून झोपल्यास स्काल्पच्या भागात घर्षण होत नाही तसेच केसांच्या मूळांवर ताणही येत नाही.

केसांची काळजी कशी घ्यावी.

१. केसांना सिरम किंवा तेल लावून झोपणे. २. केसांची सैल वेणी बांधून झोपावे. ३. कॉटनच्या कपड्या ऐवजी रेशमी कपड्याच्या उशीचा वापर करावा. ४. केसांना तेल लावले असेल तर केस मोकळे सोडून झोपू नका. ५. घट्ट स्वरूपातील रब्बरचा वापर टाळावा.

Comments
Add Comment