Monday, September 29, 2025

‘दसरा मेळाव्याबाबत विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा’

‘दसरा मेळाव्याबाबत विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा’

मुंबई : सर्व मंत्र्यांनी दौरे केले. शेतकऱ्यांचा रोष, नाराजी, राग, विरोध पाहायला मिळाला. जेव्हा घरदार उध्वस्त होते. शेतीचे प्रचंड नुकसान होते. जमीन वाहून जाते, तेव्हा साहजिक अशा प्रतिक्रिया उमटतात. दसरा मेळाव्याबाबत सद्सद् विवेकबुद्धीला स्मरुन त्यांनी निर्णय घ्यावा, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दसरा मेळाव्याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर उत्तर देताना, मला याबाबत काही बोलायचे नाही. प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते प्रगल्भ आहेत. ते निर्णय घ्यायला सक्षम असल्याचे ते म्हणाले.

तर दुसरीकडे, उद्धवराव, आता वेळ आहे कृती करायची… मुख्यमंत्री असताना तर कधी कृती न करता घरात बसून राहिलात, आता त्याचे प्रायश्चित्त घेण्याची वेळ आली आहे. दसरा मेळावा रद्द करून तो खर्च पूरग्रस्तांना दिला पाहिजे. तर त्यांच्या व्यथा आणि वेदनांवर संवेदना व्यक्त करायला अर्थ असेल, अशी पोस्ट केशव उपाध्ये यांनी एक्सवर केली आहे.

Comments
Add Comment