Monday, September 29, 2025

शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी - निफ्टी ५० मध्ये फेरबदल! निर्देशांकात इंडिगो, मॅक्स हॉस्पिटल In तल हिरो मोटोकॉर्प , इंडसइंड बँक निर्देशांकातून Out

शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी - निफ्टी ५० मध्ये फेरबदल! निर्देशांकात इंडिगो, मॅक्स हॉस्पिटल In तल हिरो मोटोकॉर्प , इंडसइंड बँक निर्देशांकातून Out

प्रतिनिधी:शेअर बाजारात कामगिरीच्या आधारे निफ्टी ५० निर्देशांकातील ५० कंपन्यांच्या यादीत बदल होत असतात. असाच एक मोठा बदल नुकताच झाला. एनएसई (National Stock Excha nge NSE) बेंचमार्क निर्देशांकातील इंडिगो, मॅक्स हॉस्पिटल हे समभाग (Stocks) हिरो मोटोकॉर्प , इंडसइंड बँक यांची जागा घेणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोर्टफोलिओ बँलन्सिंगमध्ये ब दल होऊ शकतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तज्ञांच्या माहितीनुसार, या बँलन्सिंगमुळे १.०७ दशलक्ष डॉलर्सची आवक (Inflow) अपेक्षित असून जवळपास ७४७ दशलक्ष डॉलर्सची या निमित्ताने ब हिर्वहन (Outflow) अपेक्षित आहे. उप वार्षिक आरईजीज अथवा रेजिग (Rejig) यादीनुसार यावेळी निफ्टीत ५ मोठ्या नव्या समभागांचा भरणा असणार आहे. तज्ञांच्या माहितीनुसार, मॅक्स हेल्थ केअर, एसबीआय, बजाज फिनसर्व्ह, आयटीसी या समभागांच्या माध्यमांतून आवक वाढणार असून हिरो मोटोकॉर्प, इंडसइंड बँकेच्या जाण्यामुळे मोठी जावकही वाढले. आकडेवारीनुसार, आव क ही ५४५ दशलक्ष डॉलर्स असू शकते तर जावकही ५२६ दशलक्ष डॉलर्स असू शकते.

बाजारातील माहितीनुसार,इतर निर्देशांकांमध्येही ही सुधारणा दिसून येईल. निफ्टी नेक्स्ट ५० मध्ये, सोलर इंडस्ट्रीज, इंजिनिअर्स इंडिया, माझगाव डॉक आणि हिंदुस्तान झिंक या निर्देशांकात सामी ल होतील, ज्यामध्ये ३४ दशलक्ष डॉलर्स ते ५९ दशलक्ष डॉलर्सपर्यंत गुंतवणूक अपेक्षित आहे. त्यांच्या प्रवेशामुळे इंडिगो, डाबर, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ आणि स्विगीसारखे शेअर बाहेर पडतील असे म्हटले जात आहे.

बाजाराने दिलेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या या फेरबदलामुळे, नवीन निर्देशांक रचनेनुसार निष्क्रिय निधी त्यांच्या होल्डिंग्जमध्ये बदल करतील त्यामुळे व्यापारात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे. इतर निर्देशांकांत(Indices) मध्येही फेरबदल होईल. निफ्टी नेक्स्ट ५० निर्देशांकात सोलर इंडस्ट्रीज, इंजिनिअर्स इंडिया, माझगाव डॉक आणि हिंदुस्तान झिंक या निर्देशांका त सामील होतील, ज्यामध्ये ३४ दशलक्ष डॉलर्स ते ५९ दशलक्ष डॉलर्सपर्यंत गुंतवणूक अपेक्षित आहे. त्यांच्या प्रवेशामुळे इंडिगो, डाबर, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ आणि स्विगीसारखी नावे बाहेर पडणार आहेत.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये, कोटक महिंद्रा बँकेला निफ्टी बँकेत ३१ दशलक्ष डॉलर्सचा निधी येण्याचा अंदाज आहे, तर पॉवर ग्रिड सीपीएसई निर्देशांकात ८ दशलक्ष डॉलर्स आकर्षित करू शकते. मिड कॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्येही लक्षणीय बदल होतील, हिरो मोटोकॉर्प, इंडसइंड बँक आणि स्विगी हे निफ्टी मिडकॅप १५० मध्ये प्रवेश करतील, तर ग्लँड फार्मा, बंधन बँक आणि मदरसन सुमी हे स्मॉलकॅप २५० मध्ये प्रमुख समावेशांपैकी एक आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >