वेडाचे बळी

तामिळनाडू या राज्यातील अभिनेते साक्षात ईश्वर समजले जातात आणि क्रिकेटमध्ये सचिन तेंडूलकरला जे स्थान आहे तेच तेथील लोकप्रिय अभिनेत्यांना असते. डेमी गॉड्स असे हे अभिनेते समजले जातात, दक्षिणेत या चित्रपट अभिनेत्यांची मंदिरे उभारली गेली आहेत. इतक्या पराकोटीचे वेड तेथे आहे. त्यामुळे विजय थलपती या अभिनेत्याच्या रॅलीत काल करूर येथे घडलेल्या चेगराचेंगरीची घटना दुःखदायक असली तरीही आश्चर्यकारक मुळीच नाही. अभिनेते विजय यांच्या रॅलीत झालेल्या गर्दी आणि चेंगराचेंगरीमुळे ३९ लोक ठार झाले, तर कित्येक लोक जखमी झाले. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी मृतांच्या नातेवाइकांना मदत वगैरे जाहीर केली आणि या घटनेची चौकशी होणार आहे. पण तामिळनाडूतील लोकांचे वेड कमी होत नाही. यापूर्वीही कित्येक अभिनेते आणि अभिनेत्री यांनी तेथे लोकांना वेड लावले आहे आणि त्यात अनेक लोकाचे प्राण गेले आहेत. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री दिवंगत एमजी रामचंद्रन, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले एन. टी. आर, जयललिता आणि सध्या राजकीय पक्ष काढून राजकारणात स्वतःचा धाक जमवण्याच्या प्रयत्नात असलेले कमल हसन असे किती तरी नेते आहेत ज्यांनी राज्यावर आधी अभिनयाने आणि नंतर राजकारणात जाऊन राज्य केले आहे. त्यांच्यामागे हजारो लोक असतात आणि त्याच्यासाठी ते प्राणही त्यागण्यास तयार असतात. एखाद्या नेत्याचे निधन होते तेव्हा त्यांच्यामागे कित्येकांनी आत्महत्या केल्याची उदाहरणं आहेत. हे पराकोटीचे वेड लोकांना त्यांच्या आत्मघातामागे घेऊन जाते असे दिसते. विजय थलपती हा दक्षिणेतील सर्वाधिक मानधन घेणारा स्टार आहे. रजनीकांत आणि धनुष हे असेच सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार आहेत. जितके हे स्टार लोकप्रिय होतात तितकेच त्यांचे फॅन फॉलोईंग वाढत जाते आणि मग त्यांना नुसतं पाहण्यासाठी हे लोक काहीही करण्यास तयार होतात. हेच विजय यांच्या रॅलीत घडले. करूर या जिल्ह्यात विजय येणार होते. पण त्यांना यायला उशीर झाला. उशीर झाल्याने लोक अगोदरच त्रस्त झाले होते आणि त्यात पुरेशी व्यवस्थाही नव्हती. त्यामुळे लोकांनी विजयला पाहण्यासाठी खेचाखेच केली आणि तेथे झालेल्या अभूतपूर्व चेंगराचेंगरीत ३९ लोक ठार झाले.


या घटनेने तमिळ लोकांचे चित्रपट अभिनेत्यांबद्दल असलेले वेड आणि तेथील राजकारण यांचे सरमिसळ कशी केली जाते याचे विदारक चित्र ही घटना दर्शवते. विजय यांचा पक्ष अजून बाल्यावस्थेत आहे पण त्यांच्या चाहत्यांच्या गर्दीने विजय यांना ब्लॉक बस्टर चित्रपटाचे अनाकलनीय आणि कल्पनातीत असे भावनात्मक वलय प्राप्त करून दिले आहे. विजय यांच्या रॅलीत जमलेली गर्दी ही राजकीय गर्दी नव्हती हे पहिल्या प्रथम लक्षात घेतले पाहिजे. विजय यांच्या चाहत्यांची गर्दी ही टिपिकल पक्ष कार्यकर्त्यांची नव्हती, तर ती सिनेमा वेडाने पछाडलेली होती हा इतर मेळाव्यातील आणि या गर्दीतील फरक आहे. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील अभिनेत्यांचे वेड कसे पराकोटीला गेले आहे हे याच घटनेवरून लक्षात येते आणि यापूर्वीच्या कित्येक घटनांवरूनही लक्षात येतेच. आणखी एक दाक्षिणात्य अभिनेत्री आहे जिचे नाव आहे खुशबू. दक्षिणेत तिचे मंदिर उभारले आहे. विजय यांना प्रचंड उशीर झाला तरीही त्यांचे चाहते थांबले होते आणि नंतर त्यांनी विजय यांना पाहण्यासाठी भयानक गर्दी केली असे प्रत्यक्ष फुटेज सांगतात. त्यातच एकोणचाळीस लोकांचा बळी गेला. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ज्या तीव्रतेने विजयचे चाहते त्यांना पाहण्यासाठी आले होते ते केवळ दक्षिणेतच पाहायला मिळते. तामिळनाडूत विजय यांचा थेट सामना द्रमुकशी आहे. त्यामुळे जमलेल्या गर्दीत विजय यांचे चाहते अधिक संख्येने होते तसेच द्रमुकचे प्रेमी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा थेट सामना कोण अधिक लोकप्रिय असा होता. विजय यांच्याकडे फॅन फॉलोईंग आहे तसेच त्यांच्याकडे पक्षाची विचारधारा आहे पण प्रशासनाने हा मेळावा हाताळण्यात अक्षम्य ढिलाई केली हे खरे आहे. कारण प्रशासनाने विजय यांच्या मेळाव्यासाठी गर्दी आटोक्यात आण्यासाठी तितके प्रयत्न केले नाहीत. विजय यांनी प्रशासनाला माहिती दिली होती, की फक्त १० हजार प्रशंसक येतील. पण प्रत्यक्षात त्यापेक्षा चारपट अिधक लोक हजर होते.


विजय यांच्या चाहत्यांना ज्या अडचणींचा सामना करावा लागला त्यामुळे लोकांचा संताप होणे साहजिक होते. पण डिजिटल युगात विजय यांच्या चाहत्यांच्या प्रचंड संख्येने जमणे आणि लोकांनी त्यांचे भाषण ऐकणे आणि त्यात झालेल्या गर्दी आणि चेंगराचेंगरीत प्राण गमावणे हे अभूतपूर्व आहे. विजय यांचा चाहता वर्ग आज सर्वत्र वाढत आहे कारण त्यांना कमल हसन आणि चिरंजीवी वगळता फारसे प्रतिस्पर्धी उरलेले नाहीत. त्यामुळे विजय यांच्या रॅलीत दुर्घटना घडण्यामागे द्रमुक प्रशासन, पोलीस आणि न्यायालयाची असहाय्यता हीच कारणं आहे असे लक्षात येते. विजय यांची अपेक्षा होती त्यापेक्षा अधिक लोक जमले. इतक्या अफाट लोकसंख्येचे व्यवस्थापन करण्यात तामिळनाडू प्रशासन अपयशी ठरले हे सत्य आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून काय उपाय करता येतील याचा विचार आता केला जाईल, कारण ही काही पहिलीच घटना नाही आणि अखेरची तर नाहीच. बंगळूरुमध्ये आरसीबी चाहत्यांनी अशीच गर्दी केली होती आणि त्यात ११ चाहत्यांचा मृत्यू ओढवला होता. तेव्हाही हेच प्रश्न उपस्थित झाले होते. आता सर्वांनी सजग राहून उपाय करण्याची वेळ आली आहे.

Comments
Add Comment

नको हे विरोधक

निम्म्या महाराष्ट्राला अतिवृष्टीने उद्ध्वस्त केल्यानंतर हवामान विभागाने कालच आणखी किमान दोन दिवस मुसळधार

हिंसाचारी ‘हात’?

श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळमध्ये उभं राहिलेलं जनक्षोभ आणि हिंसाचाराचं भूत सीमा ओलांडून भारतात आलं की काय, अशी

जातीची बाधा

सार्वजनिक जीवनात जातीचं अवास्तव स्तोम माजत असल्याचं चित्र सर्वत्र दिसत असताना, उत्तर प्रदेश सरकारने रविवारी

महाराष्ट्रात महाप्रलय

महाराष्ट्रावर महाप्रलयाचं संकट आलं आहे. नेहमीपेक्षा थोडा लवकरच सुरू झालेला पाऊस नवरात्रीतही आषाढासारखा कोसळतो

स्वदेशीचा नारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर भारतीय लोकांना स्वदेशीचा नारा दिला. जीएसटी २.०ची

‘आयटी’ चिंता

अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व जगावर नुकताच एक अणुबाॅम्ब टाकला आहे. तो जपानवर अमेरिकेने टाकलेल्या