Saturday, September 27, 2025

जागर नवदुर्गेचा, स्त्री सन्मानाचा...

जागर नवदुर्गेचा, स्त्री सन्मानाचा...

संस्कृतीचा गोडवा : पूर्णिमा शिंदे

‘अश्विन शुद्ध पक्षी अंबा बसली सिंहासनी’ नवरात्रीची महती अनन्यसाधारण आहे. चंडमंडविनाशनी महिषासुरमर्दिनी नवदुर्गा देवीला वंदन. देवी महात्म्य असे आहे की, शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, कुष्मांडा, स्कंद माता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धीरात्री अशा नऊ दुर्गांची ही नावे आहेत. नऊ देवींची प्रत्येक रूपात शस्त्रास्त्रे कार्यभाग आणि त्या त्या कार्याचे महत्त्व वेगळेच आहे. देवीच्या हातामध्ये शस्त्रास्त्र देऊन तिच्या भूमिका विभाजन केलेले कार्य त्यांची महती साकारते.

जशी शैलपुत्री ही हिमालयाची कन्या ती भगवान शंकराची पत्नी आहे. तिचे वाहन ऋषभ आहे. हाती त्रिशूलधारिणीमाता श्रद्धेने पूजा करणाऱ्या उपासकांची मनोकामना पूर्ण करते तिचा प्रथम दिवस.

ब्रह्मपद प्राप्त करून देणारी ब्रह्मचारिणी. ही माणसाला मुक्तीचे वरदान देते. मोक्षदाहिनी चंद्रघंटेच्या साधनेतून सर्व पापे नष्ट होतात. पापमुक्त करणारी चंद्रघंटा जीवनात अनेक व्याधी, रोगराई यातून मुक्तता, कष्टातून मुक्तता करणारी आणि तल्लख बुद्धी आणि सुदृढ दीर्घायू यश प्राप्तीसाठी कुष्पांडा देवीची उपासना करावी लागते. स्कंद म्हणजे कार्तिकेय पार्वतीचा पुत्र. ही स्कंद माता. तिच्या उपासनेने कात्यायनी देवीची उपासना काळ रात्री देवी शंखचक्र खड्ग, त्रिशूळ हाती दशभूजादेवी आहे. तिची आराधना केली असता सगळीकडे यश प्राप्त होते. काळाशी लढणारी संघर्षमयी कालरात्री. या देवीची उपासना केल्यास अन्यायाला न्याय, असत्याला सत्य आणि योग्य सबळ दिशा देणारी शुभंकर देवी म्हणजे काल रात्री. दैन्य, दुःख,आळस दूर करणारी महागौरी. सुख प्रदान करणारी चतुर्भुजा देवी. तिच्या उपासनेमुळे चारी दिशांना यश मिळते. अष्टसिद्धी प्राप्त करून देणारी सिद्धीरात्री. या देवी सर्वभूतेषू शक्ती रुपेन संस्थिता नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नमः.आपल्या अवतीभोवती रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा अशा महालक्ष्मी आपल्यासमोर आजूबाजूला अवतरत असतात. कोणत्या ना कोणत्या रूपाने त्यांचे दर्शन घडते. या स्त्री सन्मानाचा देखील आज उत्सव केला जातो. पूजन केले जाते. गौरव केला जातो. उदा. या माता आहेत. आपल्या घरात माता असते. बहीण असते. पत्नी असते पुत्री असते. विविध रूपातील या आदिशक्तीला वंदन, सन्मान करणं आपलं आद्य कर्तव्यच आहे. घरोघरी आरोग्य लक्ष्मी, ऐश्वर्य लक्ष्मी, गृहलक्ष्मी, आदिलक्ष्मी, संतान लक्ष्मी, संतती लक्ष्मी, अन्नधान्य लक्ष्मी, अष्टलक्ष्मी, वैभव लक्ष्मी, गजलक्ष्मी अशा अनेकविध नावांनी ती आपल्या सोबत असते. वरदहस्त तिचा लाभ होतो. ती सहकार्य देते. आयुष्य घडवते. आयुष्याला वळण देते आणि व्यक्तिमत्त्व सजवते. तिच उत्पत्ती निर्मिती करणारी अवघ्या विश्वाची जननी माउली. नवरात्र उत्सवाच्या नवदुर्गांना वंदन करू. स्त्री शक्तीला वंदन करू. जागर नवदुर्गेचा, स्त्री सन्मानाचा.

Comments
Add Comment