कल्पना एक...’चे  अस्तित्त्व अंतिम टप्प्यात...


एकांकिकांच्या विश्वात विशेष स्थान राखून असलेल्याअस्तित्त्व’ या संस्थेच्या ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ या स्पर्धेचा प्रवास आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ ही स्पर्धा महाविद्यालयीन विद्यार्थी; तसेच हौशी आणि व्यावसायिक रंगकर्मींना त्यांचा कलाविष्कार सादर करण्यासाठी दरवर्षी रंगमंच उपलब्ध करून देते. गेली तब्बल ३९ वर्षे ही स्पर्धा गाजत आहे आणि या व्यासपीठाच्या माध्यमातून अनेक रंगकर्मी उदयास आले आहेत. मात्र यंदाची स्पर्धा ही या प्रवासातली ‘शेवटापूर्वीची आवृत्ती’ असल्याचे सूतोवाच या स्पर्धेच्या आयोजकांकडून करण्यात आले आहे. ‘अस्तित्त्व’ या संस्थेला आता ३० वर्षे झाली आहेत आणि ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ ही स्पर्धा आता चाळीशीच्या उंबरठ्यावर उभी असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे, ‘अस्तित्त्व’ या संस्थेतर्फे या संदर्भात स्पष्ट करण्यात आले आहे.


दरम्यान, यंदा या स्पर्धेची प्राथमिक फेरी २७ व २८ सप्टेंबर रोजी होत असून, अंतिम फेरी ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. यंदा या स्पर्धेचे ‘कल्पना सूचक’ ज्येष्ठ रंगकर्मी अशोक सराफ आहेत. कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या ‘विदूषक’ या कवितेतल्या काही ओळी कल्पना म्हणून त्यांनी सुचवल्या आहेत. अशोक सराफ यांनी या विषयाला अनुसरून कोणतीही विस्तृत प्रस्तावना दिलेली नाही. मात्र, हा विषय इतका प्रभावी आहे की तो लेखकांना आपोआप स्फूर्ती देईल, असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. साहजिकच, आता या विषयावर सादर होणाऱ्या एकांकिका म्हणजे लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांसाठी आव्हानात्मक गोष्ट असून, सदर विषय नव्या दमाचे रंगकर्मी कशा पद्धतीने मांडतात; हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  -राज चिंचणकर



Comments
Add Comment

विस्तृत अवकाशाची बहुस्तरीय निर्मितीवस्था...!

राजरंग : राज चिंचणकर एखादा सिनेमा निर्माण होताना त्या कलाकृतीची निर्मितीवस्था विविध वळणे आणि आडवळणे घेऊन

‘ह्युमन कोकेन’चा धडकी भरवणारा ट्रेलर

‘ह्युमन कोकेन’चा ट्रेलर अखेर विविध माध्यमांवर प्रदर्शित झाला असून काही क्षणांतच प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त

दिग्दर्शक महेश मांजरेकरांशी भेट...

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल  अतुल काळे लेखन, अभिनय, दिग्दर्शन व गायन या सर्व क्षेत्रांमध्ये मुशाफिरी करणारा एक

उतावळे परीक्षक आणि अकलेला बाशिंग

भालचंद्र कुबल : पाचवा वेद भाग एक ६४व्या हौशी राज्यनाट्य स्पर्धेचे साधारण २५ केंद्रावरचे निकाल यायला सुरुवात

‘चिरंजीव परफेक्ट’ बिघडलाय!

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल  विनोद रत्ना हा नव्या पिढीचा लेखक, अभिनेता व दिग्दर्शक आहे. ‘चिरंजीव परफेक्ट

कलासक्त कलाकारांच्या ऊन-पावसाची कथा ...

राजरंग : राज चिंचणकर नाट्यसृष्टीत प्रायोगिक व व्यावसायिक असे दोन प्रवाह असल्याचे साधारणतः मानले जाते. पण त्याही