Saturday, September 27, 2025

'त्या' लहान मुलीचा हट्ट आणि आमदार निलेश राणे खालीच बसले...

'त्या' लहान मुलीचा हट्ट आणि आमदार निलेश राणे खालीच बसले...

प्रत्येकाला आपले वाटणारे आमदार..!

मालवण : महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आपल्या अभ्यासू, आक्रमक आणि कार्यतत्पर शैलीने ओळखप्राप्त नेतृत्व मालवण कुडाळचे आमदार निलेश राणे यांचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. प्रत्येकाला आपले वाटणारे हे नेतृत्व...! मालवण दौऱ्यावर असताना शुक्रवारी त्यांनी कुंभारमाठ येथील जरीमरी देवालयात देवीचे दर्शन घेतले.

यावेळी अनेकजण त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी पुढे येत होते. याचवेळी मंदिरात असलेल्या एका लहान मुलीनेही आमदार निलेश राणे यांच्यासोबत फोटो काढण्याचा आग्रह आपल्या पालकांकडे केला. त्या मुलीचा हट्ट पाहून आमदार निलेश राणे यांनी खाली बसून त्या छोट्या मुलीसोबत फोटो काढला. यावेळी त्या मुलीच्या चेहऱ्यावरील असलेले हास्य आपलेपणा स्पष्ट करणारे होते.

आमदार निलेश राणे प्रत्येकाला आपले वाटतात. आमदार निलेश राणे ज्यांनी ज्यांनी जवळून अनुभवले ते प्रत्येकजण सांगतात आमदार निलेश राणे यांच्यासारखा दिलदार मनाचा नेता नाही. नेहमी प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी असणारे आणि मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास असणारे हे नेतृत्व आमदार म्हणून आम्हाला लाभले हे आमचे भाग्यच! अशा भावना या निमित्ताने उमटल्या.

Comments
Add Comment