
मोहित सोमण
कल्पना करा तुम्ही एका जादुई दुनियेत बसला आहात जिथे तुम्हाला केवळ रोबोट नाही तर तुमचा फोन तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करेल. तुम्ही घरात आल्यावर तुमचा आपोआप एसी चालू होईल आपोआप फ्रिज उघडून कमांडवर थंड पाणी हातात मिळेल आपो आप समायोजित आवाजावर चित्रपट सुरु होईल आपोआप वातावरण एसी समायोजित (Adjust) करेल.इतकेच नाही तर कमांड नोटिफिकेशन आधारे तुमची सगळी गॅझेट एकमेकांशी कनेक्ट होतील एकमेकांशी संवाद साधतील एसी वॉशिंग मशीनशी बोलेल, वॉशिंग मशीन टीव्हीशी बोलेल, टीव्ही ओटीटीशी बोलेल, मोबाइल तुम्हाला महत्वाच्या ऑफिस मिटींगचा रिमांईडर अलार्म देईल, तुम्हाला आठवणीने पाणी प्यायला सांगेल, सगळ्या डिव्हाईसची इलेक्ट्रॉनिक्स सर्वेलंन्स देतानाच घरातून बाहेर पडतानाच टीव्ही,पंखे एसी बंद करण्याचीही आठवण तुम्हाला करेल किंबहुना एका बटनावर बंद करेल.अगदी तुमच्या पेट (श्वान,मांजर) यांची आर्टिफिशियल इंटेलिजन्स मार्फत काळजी घेईल हे अनुभवतानाच 'राजा' असल्याची भावना तुमच्या मनात आपोआप येईल त्यात काही शंका नाही पण प्रत्यक्ष आयुष्यात हे सगळे झाले तर भारी वाटेल ना? हेच ओळखून सॅमसंग इंडियाने ग्राहकांसाठी ए आय आधारित परिसंस्था भारतात भविष्यात नाही तर वर्तमानानच ही प्रणाली 'Smart Things' अंतर्गत आणली आहे.
नुकत्याच सॅमसंग इंडियाने बीकेसी मुंबई येथे 'AI Home : Future Living Vision' नावाचे भारतातील पहिले ए आयवर आधारित (AI Integrated) संपूर्ण ए आय एक्सपिरियंस सेटंर सुरु केले आहेत.जिथे तुम्हाला संपूर्णपणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अं तर्गत तुमची डिव्हाईस एकमेकांशी जोडल्याचा आनंद उचलता येणार आहे. तेही सगळे केवळ एका 'Smart Things' अँपमधून.केवळ घरी नाही बाहेरच्या परिसंस्थेतही (Ecosystem) तुम्ही आपली डिव्हाईस एकाचवेळी एकाच अँपवर आता कनेक्ट करू शक णार आहात. खरच हे जादुई दुनियेत भारताचा प्रवेश सॅमसंगने सुकर केला आहे. १०००० ते १५००० इंजिनियर्सच्या अथक परिश्रमानंतर सॅमसंगने ही परिसंस्था भारतात आणली. सॅमसंग इंडियासाठी भारत हे मोठे इलेक्ट्रॉनिक्स मार्केट आहे. कोरियन कंपनी सॅमसं गने अजूनही आपले मार्केट शेअर बाबतीत पहिल्या पाचात आपला क्रमांक गेले १० वर्ष टिकवला आहे. सॅमसंगला पसंती देणारा आजही मोठा वर्ग भारतात आहे. त्यामुळे या कंपनीकडून नवी परिसंस्था ही ग्राहकांसाठी पर्वणी आहे. अशातच आयुष्य सोपे करण्या साठी किंबहुना जलद व वेळ वाचवणारे करण्यासाठी सॅमसंग इंडियाच्या आर अँड डी (Research and Development R &D) विभागाने यावर मेहनत केली होती. ती आता फळास आली आहे.'Ease, Care, Save, Secure या तत्वज्ञानातून ही शोध निर्मिती झा ल्याचे सॅमसंग म्हणते. ही परिसंस्था मुख्यतः तीन विभागावर आधारित आहे.
पहिली म्हणजे Galaxy AI, Save Secure, Bespoke AI या तीन परिसंस्था कंपनीने बनवली आहे. Samsung AI Home हे या तिन्ही परिसंस्थेला जोडते. अगदी घरात,ऑफिसमध्ये, कुठेही तुम्ही या Smart Things सह मुक्त संचार करू शकता. खरं तर तुम्हा ला एका वेळी अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. इतरांवर अवलंबून रहावे लागते. पण झटपट कामे एका बटणावर होत असतील तर ते नेक्स्ट जनरेशन साठी उपयोगी ठरणार आहे. याहून पलीकडे भविष्यात आणखी शोध लागतील. पण सुरूवात महत्वाची अ सते. तोच पायंडा सॅमसंगने नुकताच पाडला. बीकेसी स्टोर लाँच वेळी अनेक मान्यवरही उपस्थित होते. भारतातील हे पहिलेच AI Enabled स्टोअर असल्याचे कंपनीने म्हटले होते.
खरं तर इंटिग्रेशन हा तुमच्या जीवनाचा पाया आहे.स्थितप्रज्ञ व्यक्तीही आयुष्यात एक दिवस नवे घटक शोधतात. भारतात झपाट्याने वाढत असलेल्या स्मार्टफोन मार्केटची नस सॅमसंगने पक्की ओळखली आहे. २००८ मध्ये सॅमसंगचा आलेला स्मार्ट कलर फोन ते आज Smart Things हा कंपनीचा मोठा प्रवास आहे. हे साध्य करताना कंपनीने अनेक गोष्टींवर काम केले. यापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे परिसंस्था बनवण्यासाठी केवळ दैनंदिन जीवन नाही किंवा दैनंदिन गॅझेट नाही तर त्यांनी जेवणाच्या पदार्थात किती पाणी घा लावे याचे संयंत्र आणले आहे इतकेच नाही तर स्मार्ट फ्रिज असेल, किंवा दैनंदिन जीवनात ओले झालेले कपडे काही मिनिटांत सुकवणारे मशिन असेल सॅमसंगने आपल्या उत्पादनात फ्युचरिस्टिक मूलभूत बदल केले आहेत. हाच ट्रेंड दुसऱ्या कंपन्या चालू ठेवतील का हा यक्ष प्रश्न आहे. सॅमसंगचे एआय होम हे त्याच्या फ्युचर लिव्हिंग व्हिजनचे प्रतीक आहे ज्यामुळे बुद्धिमत्ता केवळ वैयक्तिक उपकरणांपुरती मर्यादित न राहता स्क्रीन, उपकरणे आणि सेवांमध्ये परिवर्तन करत असते असे कंपनीने यावेळी म्हटले.
दैनंदिन जीवनात गॅलेक्सी एआय, व्हिजन एआय आणि बेस्पोक एआयद्वारे, हे सर्व स्मार्टथिंग्ज इकोसिस्टमद्वारे एकत्रित केले आहे, ही प्रणाली एक असे घर तयार करते जे गरजा ओळखते, वर्तनातून शिकते आणि दैनंदिन जीवन स्वयंचलित करते. केवळ इतकेच ना ही तर आर्किटेक्ट बनवतात तसे डिजिटल होम नकाशा देखील तयार होणे Smart Things मध्ये शक्य आहे. या तत्वज्ञानात सॅमसंग एआय होम चार परिवर्तनकारी अनुभव देते:
सहजता — दैनंदिन दिनचर्या स्वयंचलित करते, प्रकाशापासून ते घरातील कामांपर्यंत, जीवन सुरळीत बनवते.
काळजी — वैयक्तिकृत झोप सेटिंग्ज, पोषण नियोजन आणि कुटुंबातील सदस्य आणि पाळीव प्राण्यांची काळजी घेऊन निरोगीपणाला समर्थन देते.
बचत — स्मार्टथिंग्ज एनर्जी ऊर्जेचा वापर ऑप्टिमाइझ करते, खर्च कमी करते आणि शाश्वतता वाढवते.
सुरक्षित— सॅमसंग नॉक्स व्हॉल्ट आणि नॉक्स मॅट्रिक्स सर्व उपकरणांवर संवेदनशील डेटाचे संरक्षण करतात.
याशिवाय गॅलेक्सी एआय उत्पादकता वेअरेबल्सना कनेक्ट करते. व्हिजन एआय स्मार्ट टीव्ही इंटरॅक्शन देते आणि बेस्पोक एआय उपकरणे घरगुती कामे सुलभ करतात .युनिफाइड स्मार्टथिंग्ज अँप सॅमसंग उत्पादनांना हजारो पार्टनर डिव्हा इसेससह जोडते ज्या मुळे अंतर्ज्ञानी, काळजी घेणारे, कार्यक्षम आणि सुरक्षित असे राहणीमान वातावरण तयार होते. एआय होमसह, सॅमसंग एक कनेक्टेड घराचे वचन देते जे केवळ तुमच्यासाठीच नाही तर तुमच्यासोबत काम करते, जे भारतातील भविष्याचे भविष्य घडवते. असे अ सताना सॅमसंगच्या अधिकारी वर्गाने लाँचिग दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले होते की 'आम्ही या इकोसिस्टीमध्ये सुरक्षिततेला (Knox Security) सर्वाधिक प्राथमिकता देत आहोत.' या उत्पादनाची खरं तर सर्वाधिक गरज भारताला आहे. गे ल्या काही वर्षांत सायबर क्राईममध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने आज कुणाचाच डेटा संपूर्णपणे सुरक्षित नाही हीच नेमकी गरज ओळखून सॅमसंगने ही इकोसिस्टीम तयार केल्याचे सॅमसंगने म्हटले आहे. असे असताना सॅमसंगने वातावरण निर्मिती करण्यासा ठी स्वतःचे हे आउटलेट बीकेसीमध्ये उघडले आहे. पिन टू पियानो सॅमसंगच्या सगळ्या वस्तू तुम्हाला या सेंटरमध्ये पहायला मिळतील. आता ग्राहक एका अँपवर ही इकोसिस्टिम कुठेही वापरू शकतात मात्र प्रत्यक्ष ती परिसंस्था अनुभवयाची असेल तर या स्टोरला भेट देणे गरजेचे आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की टेक्निकली कळले पण प्रत्यक्षात त्याचा फायदा काय? तर हे समजून घेणे तुमच्या भावी गरजा भागविण्यासाठी आवश्यक आहे. वापरकर्त्यांसाठी याचा अर्थ असा की एक स्मार्ट सिस्टीम जी त्यांच्या गरजा आपोआप समजून घेते आणि त्यांच्याशी जुळवून घेते. उदाहरणार्थ, तुम्ही पोहोचल्यावर दिवे चालू होऊ शकतात, तुमचे एअर कंडिशनर रात्रीच्या चांगल्या झोपेसाठी समायोजित (Adjust) करू शकते किंवा तुमचे वॉशिंग मशीन परिपूर्ण सायकलची शिफारस करू शकते. मघाशी म्हट ल्याप्रमाणे ही सिस्टम 'अॅम्बियंट इंटेलिजन्स' (वातावरण निर्मिती) साठी डिझाइन केलेली आहे, वापरकर्त्यांच्या वर्तनातून आणि पर्यावरणीय संकेतांमधून सतत शिकत राहून अधिक सोयीस्करता आणि ऊर्जा बचत प्रदान करते आता शक्य होणार आहे. जागतिक बा जारपेठेत सध्या पर्यावरणाचा प्रश्न भेडसावत आहे यावर उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात उर्जेची बचत, वीज बिलाची बचत करण्यासाठी आता ही इकोफ्रेण्डली इकोसिस्टीम सॅमसंगने बनवली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही इकोसिस्टिम कार्बन उत्सर्जन (Carbo n Emission) मध्ये मोठ्या प्रमाणात कपात करणार आहे. उदाहरणार्थ, सिस्टिम देखील सेव्हच्या माध्यमातून सर्वोत्तम व मापनीय फायदे देते. स्मार्टथिंग्ज एनर्जीसह घरे अधिक कार्यक्षम होतात, ऊर्जा वापर कमी होतो आणि खर्च कमी होतो. कंपनीच्या दाव्यानुसा र, वॉशिंग मशिनसाठी होणारा ऊर्जा वापर जवळपास ७० टक्क्यांनी कमी होऊ शकतो या सर्वोत्तम बचती घरगुती खर्च कमी करण्यासोबत हरित पर्यावरणाप्रती देखील योगदान देतात.
शेवटचे म्हणजे, सेक्युअर खात्री देते की नाविन्यतेसोबत सुरक्षिततेला देखील प्राधान्य दिले जाईल.सॅमसंग नॉक्स वॉल्ट हार्डवेअर स्तरावर संवदेनशील डेटाचे संरक्षण करते,तर नॉक्स मॅट्रिक्स कनेक्टेड परिसंस्थेमध्ये ब्लॉकचेन-आधारित संरक्षण वाढवते, ज्यामुळे कु टुंबांना विश्वास मिळतो की त्यांचे डिजिटल जीवन वास्तविक जीवनाप्रमाणे सुरक्षित आहे.शेवटी, सुरक्षिततेसह, गॅलेक्सी एआय होम हे सुनिश्चित करते की नावीन्यपूर्णता सुरक्षिततेसह जोडली जाते. सॅमसंग नॉक्स व्हॉल्ट हार्डवेअर स्तरावर संवेदनशील डेटाचे संरक्षण करते, तर नॉक्स मॅट्रिक्स सर्व उपकरणांमध्ये ब्लॉकचेन -आधारित संरक्षण प्रदान करते असे कंपनीने म्हटले आहे.याशिवाय याआधी स्मार्टफोन बाबतीतही दिवाळी पूर्वीच्या काळात सॅमसंग गॅलेक्सी एस२४ अल्ट्राच्या किमतीत मोठी कपात झाली होती.आता फ्लॅग शिप फोन पूर्वीपेक्षा अधिक परवडणारा बनला आहे. आता त्याच्या सर्वात कमी किमतीत उपलब्ध असलेला, २०० मेगापिक्सेल कॅमेरा फोन त्याच्या मूळ लाँच किमतीपेक्षा ५८००० रुपयांपर्यंत कमी किमतीत खरेदी करता येईल. ही किंमत कपात सॅमसंगच्या सणासु दीच्या जाहिरातींचा एक भाग आहे आणि Amazon, Flipkart आणि अधिकृत Samsung वेबसाइट सारख्या प्रमुख प्लॅटफॉर्मवर अतिरिक्त बँक सवलती, नो-कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफरसह उपलब्ध आहे. तरीही स्मार्टफोनसह खरच स्मार्ट करणाऱ्या या इकोसिस्टीलाही विशिष्ट महत्व त्यामुळे आता प्राप्त होत आहे. एका आयडीवर तुमची सगळी डिव्हाईस Smart Things App मधून कनेक्ट करता येतील.
आपण आता उत्पादन विशेष फायदेही बघूयात..
१) बेस्पोक एआय-पॉवर्ड रेफ्रिजरेटर्स
अशा फ्रिजची कल्पना करा जो तुमच्या गरजा ओळखतो. व्हिजन एआय आणि बेस्पोक एआय ने सुसज्ज असलेले सॅमसंगचे एआय-पॉवर्ड रेफ्रिजरेटर्स तुमच्या अन्नसाठ्याचे विश्लेषण करतात तुमच्या फ्रिजमध्ये किती वस्तूचा समावेश आहे कुठली वस्तू काढली गे ली कुठली वस्तू फ्रिजमध्ये अजूनही अंतर्भूत आहे. तसेच स्वयंपाकासाठी आपल्या आवडीच्या रेसिपीही हा फ्रीज सुचवतो. केवळ तोंडाने किंवा टच स्क्रीन आधारे तुमच्या आहाराच्या रेफ्रीजरेटर आवडीनुसार पाककृती सुद्धा सुचवतात. तुम्ही निरोगी जेवणाचे नियो जन करत असाल किंवा उरलेले अन्न वापरत असाल तर फ्रिजची बुद्धिमान प्रणाली तुमचा वेळ वाचवते आणि कचरा कमी करते याची खात्री देते, ज्यामुळे तुमचे स्वयंपाकघर नेहमीपेक्षा अधिक स्मार्ट बनते.
२) एआय टीव्ही (AI TV)
सॅमसंगच्या एआय होममधील टीव्ही एक स्मार्ट हब आहे. व्हिजन एआयद्वारे समर्थित, ते नैसर्गिक भाषा संवाद आणि वैयक्तिकृत सामग्री शिफारसी देते. तुमचा आवडता शो लावणे असो किंवा खोलीतील प्रकाशयोजनेनुसार चित्र सेटिंग्ज समायोजित करणे असो, ए आय-चालित टीव्ही एक तल्लीन करणारा,अनुकूलित पाहण्याचा अनुभव निर्माण करतो.
३) Samsung Air Conditioner- सॅमसंगचे एआय-सक्षम एअर कंडिशनर तुमच्या दिनचर्यांबद्दल जाणून घेण्यासाठी आणि चांगल्या झोपेसाठी किंवा विश्रांतीसाठी तापमान स्वयंचलितपणे समायोजित करण्यासाठी एआयचा वापर करतात. ऊर्जा-बचत कर णारे ए आय मोड्ससह,ते वीज वापर देखील कमी करतात, ज्यामुळे मघाशी उल्लेख केल्याप्रमाणे घर थंड राहते आणि बील कमी राहते. तुम्ही १ किलोमीटर रेडियस (परिघात) असाल तर ते आपोआप सरुऊ होऊ शकते याशिवाय तापमान आधारे रूम टेंपरेचर एसी स मायोजित करते. सॅमसंगने लाँच दरम्यान त्यांचे ट्रेडमार्क केलेले विंडफ्री एसी प्रदर्शित केले ज्यामध्ये केवळ सर्व एआयच नाही तर एका आउटलेटमधून हवा बाहेर न टाकता बाहेर काढण्यासाठी २३००० छिद्रे देखील असल्याचे सॅमसंगकडून म्हटले गेले आ हे.
४) वाय-फाय सक्षम बेस्पोक एआय मायक्रोवेव्ह ओव्हन
स्मार्टथिंग्ज एआय सह एकत्रित केलेले सॅमसंगचे एआय-चालित मायक्रोवेव्ह कन्व्हेक्शन ओव्हन देखील प्रदर्शित लाँच दरम्यान केले गेले होते. हे वैयक्तिक पसंती आणि फ्रिजमध्ये उपलब्ध घटकांवर आधारित वैयक्तिकृत रेसिपी सूचना देऊन स्वयंपाकात क्रांती घ डवतात (घरातील सर्व उपकरणे एकमेकांशी जोडलेली असतात), तर परिपूर्ण परिणामांसाठी स्वयंपाक सेटिंग्ज स्वयंचलितपणे समायोजित करतात. जिओफेन्सिंगसह, एक नवीन तंत्रज्ञान ज्याबद्दल सॅमसंगने देखील बरेच काही सांगितले आहे ओव्हन तुम्ही घराजव ळ येताच प्रीहीट करू शकते, तुम्ही आल्यावर रात्रीचे जेवण तयार असल्याची खात्री करते.सॅमसंगच्या एआय होमचे एक उत्कृष्ट वैशिष्ट्य जिओफेन्सिंग, तुमच्या घराच्या जवळच्या कृतींवर आधारित क्रिया ट्रिगर करण्यासाठी स्थान-आधारित तंत्रज्ञानाचा वापर कर ते स्वयंचलितपणे दिवे चालू करणे, कपडे धुणे सुरू करणे, ओव्हनमध्ये स्वयंपाक करणे किंवा तुम्ही जाताना एसी समायोजित करणे किंवा तुम्ही बाहेर पडताना ऊर्जा-बचत मोड सक्रिय करणे हे या उत्पादनाचे वैशिष्ट्य आहे.
५) एआय-सक्षम नळ
सॅमसंगने एक एआय-सक्षम नळ देखील प्रदर्शित केला जो रेसिपीला किती पाणी लागते हे जाणतो आणि तेवढेच देतो ज्यामुळे जार मोजण्याची गरजही आता ए आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नाहीशी होणार आहे. नळ केवळ कधी थांबायचे हे समजत नाही तर पा ण्याचा दाब देखील त्या प्रमाणात व्यवस्थापित अथवा समायोजित करतो.
या लाँच दरम्यान सॅमसंग साउथवेस्ट एशियाचे अध्यक्ष आणि सीईओ जेबी पार्क उपस्थित होते. एआय होम: फ्युचर लिव्हिंग नाऊ इन इंडिया या कार्यक्रमाचे अनावरण करताना ते म्हणाले आहेत की,'सॅमसंगमध्ये, आम्ही केवळ एआयच्या भविष्याची कल्प ना करत नाही,आमच्या स्मार्टथिंग्ज इकोसिस्टमद्वारे गॅलेक्सी एआय, व्हिजन एआय आणि बेस्पोक एआयच्या एकत्रीकरणासह, आम्ही ते लोकांच्या दैनंदिन जीवनात आणत आहोत. येथे सॅमसंग एआय होम लाँच करून, आम्ही भारतीय घरांमध्ये फ्युचर लिव्हिंग आ णत आहोत -दैनंदिन जीवन अधिक सोयीस्कर, कार्यक्षम, निरोगी आणि सुरक्षित बनवत आहोत. भारत या प्रवासाच्या केंद्रस्थानी आहे. भारतातील आमची तीन संशोधन आणि विकास केंद्रे येथे रोमांचक एआय नवकल्पनांना आकार देत आहेत आणि त्यांना जगास मोर घेऊन जात आहेत. हे लाँच लाखो भारतीय कुटुंबांच्या भविष्यातील जीवनशैलीला अर्थपूर्ण आणि सुरक्षित तंत्रज्ञानाने आकार देण्याच्या आमच्या खोल वचनबद्धतेचे प्रतिबिंबित करते'
खरं तर मेट्रोसिटीतील लोकांचे जीवन घड्याळाच्या काट्यावर चालणारे आहे. धकाधकीच्या जीवनात सुखद धक्का अनुभवाचा असेल तर Samsung AI Home हा चांगला पर्याय आहे. तो प्रत्यक्ष अनुभवायचा असले तर वैयक्तिक मताप्रमाणे, नक्कीच एकदा भेट देऊ शकतात. जिओ वर्ल्ड प्लाझा बीकेसी हे सॅमसंगकडून फ्लॅगशिप स्टोअर सुरू झाले आहे. या जादुई दुनियेत एकदा पाऊल ठेवले की तुम्हाला बाहेर पडावेसे वाटत नाही असे हे स्टोअर आहे. त्यामुळे आपली सगळी स्मार्ट डिव्हाईस एकमेकांशी जोडण्यासाठी क्लस्टर इनहान्स सिस्टिम अनुभवण्यासाठी तुम्ही Samsung AI Home परिसंस्थेचा नक्की विचार करु शकता.
अधिक माहिती करिता ग्राहक संकेतस्थळावर भेट देऊ शकतात- https://www.samsung.com/in/smartthings/