Saturday, September 27, 2025

भारतीय पत्रकाराच्या प्रश्नावर पाकिस्तानच्या पंतप्रधानांची बोलती बंद

भारतीय पत्रकाराच्या प्रश्नावर पाकिस्तानच्या पंतप्रधानांची बोलती बंद

संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्राच्या ८० व्या आमसभेत बोलताना पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताबद्दल बेताल विधाने केली. मात्र संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात प्रवेश करण्याच्या आधी त्यांना एका भारतीय पत्रकाराने जाब विचारला, त्यावेळी पाकिस्तानच्या पंतप्रधानांची बोलती बंद झाली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

शहबाज शरीफ संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात प्रवेश करत होते त्यावेळी भारतीय महिला पत्रकाराने पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देणे कधी थांबवणार ? असा थेट प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर उत्तर देण्याऐवजी आधी शरीफ यांनी भारतीय महिला पत्रकारापासून दूर सुरक्षित अंतरावर जाणे पसंत केले. ते काहीच बोलले नाही. पण महिला पत्रकार प्रश्नाचा भडिमार करणे सोडत नाही याची जाणीव होताच त्यांनी लांबून आम्ही दहशतवादाला हरवत आहोत असे सांगितले. त्यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान, भारत तुमचा पराभव करत आहे असे सांगत प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पुढे काही न बोलता तडक तिथून निघून जाणे पसंत केले.

यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत बोलताना पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कौतुक केले. जर ट्रम्प यांनी वेळेवर आणि निर्णायकपणे हस्तक्षेप केला नसता तर या संघर्षाचे विनाशकारी परिणाम झाले असते; असे शरिफ म्हणाले. पाकिस्तान आणि भारत यांच्यातील शस्त्रविराम हा ट्रम्प यांच्या हस्तक्षेपामुळेच शक्य झाल्याचे ते म्हणाले. भारतीय हवाई दलाचे नुकसान केल्याचा दावा पण त्यांनी केला. पण हा दावा करणाऱ्या पाकिस्तानने एकही पुरावा सादर केलेला नाही. याउलट भारताने पाकिस्तानचे नुकसान केल्याचे अनेक पुरावे फोटो आणि व्हिडीओ स्वरुपात सादर केले आहेत.

शरिफ यांच्यात वक्तव्याला भारताने शनिवारी जोरदार प्रत्युत्तर दिले. संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी प्रतिनिधी मंडळाचे प्रथम सचिव पेटल गहलोत यांनी शरिफ यांच्या भाषणावर टीका केली. शरिफ यांच्या भाषणाला हास्यास्पद नाटक असे म्हणत पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे आणि दहशतवादाचे उदात्तीकरण करत आहे, असे पेटल गहलोत म्हणाले. किस्तान वारंवार दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचे सत्य जगासमोर आलेले आहे, असेही पेटल गहलोत म्हणाले.

Comments
Add Comment