Saturday, September 27, 2025

मध्य रेल्वेवर उद्या भायखळा, शीव पुलाच्या कामासाठी रात्रीचा ब्लॉक; एक्स्प्रेस गाड्यांवर होणार परिणाम

मध्य रेल्वेवर उद्या भायखळा, शीव पुलाच्या कामासाठी रात्रीचा ब्लॉक; एक्स्प्रेस गाड्यांवर होणार परिणाम

मुंबई : भायखळा आणि शीव स्थानकावरील फुटओव्हर ब्रिजचे गर्डर्स बसवण्यासाठी शनिवार २७ सप्टेंबर रोजी रात्री दोन विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक्स घेण्यात येणार आहेत. यामुळे अनेक लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम होणार आहे.

मध्य रेल्वे भायखळा स्थानकावर फुट ओव्हर ब्रिजचे ४ स्टील गर्डर्स बसवण्यासाठी आणि शीव रेल्वे ओव्हर ब्रिज येथे फुट ओव्हर ब्रिजचा ४० मीटर स्पॅन बसवण्यासाठी दोन विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक्स घेण्यात आले आहेत. पहिला ब्लॉक शनिवारी रात्री १२.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत घेण्यात आला आहे. हा ब्लॉक भायखळा आणि परेल दरम्यान अप व डाउन धीम्या व जलद मार्गावर घेण्यात आला आहे. तर दुसरा ब्लॉक शनिवारी मध्यरात्री १.१० ते पहाटे ४.१० वाजेपर्यंत घेण्यात आला आहे.

२७ ते २९ सप्टेंबर (शनिवार ते सोमवार):

डाउन ट्रेन रद्द: कर्जत-खोपोली लोकल, दुपारी १२, दुपारी १:१५ आणि दुपारी १:३९ वाजता सुटेल. अप ट्रेन रद्द: खोपोली-कर्जत लोकल, सकाळी ११:२०, दुपारी १२:४० आणि दुपारी २:५५ वाजता सुटेल.

कर्जत स्थानकावर २६ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरपर्यंत पॉवर ब्लॉक

कर्जत यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पाअंतर्गत नॉन-इंटरलॉकिंग पूर्व-बांधकाम कामे सुलभ करण्यासाठी, मध्य रेल्वेने कर्जत स्थानकावर शुक्रवार, २६ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२५ पर्यंत विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉकची मालिका जाहीर केली आहे. २६ सप्टेंबर रोजी रेल्वे सेवांवर कमीत कमी परिणाम होईल. रेल्वे सेवांवर मोठा परिणाम २७ सप्टेंबरपासून सुरू होईल. पहिले चार दिवस, अप आणि डाउन पनवेल मार्गांवर दररोज सकाळी ११:२० ते दुपारी ४:२० पर्यंत ब्लॉक असेल. यामुळे नागनाथ केबिन आणि कर्जत प्लॅटफॉर्म २ आणि ३ आणि कर्जत प्लॅटफॉर्म ३ ते चौक स्टेशन दरम्यानच्या भागावर परिणाम होईल.

कर्जत स्थानकात विशेष ब्लॉक

कर्जत स्थानकात प्री-नॉन-इंटरलॉकिंगच्या कामासाठी मध्य रेल्वेने विशेष ब्लॉक घेतला आहे. कर्जत स्थानकावर २६ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत उपनगरीय सेवा आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. त्यामुळे लोकल प्रवाशांना कर्जत ते खोपोली दरम्यान प्रवास करता येणार नाही. कर्जत स्थानकाच्या फलाट क्र. २ आणि ३ दरम्यान, कर्जत फलाट क्र. ३ ते चौक स्थानकादरम्यान २७ ते ३० सप्टेंबर रोजी स.११.२० ते सायं. ५.२० वाजेपर्यंत ब्लॉक घेतला आहे.

Comments
Add Comment