Saturday, October 25, 2025
Happy Diwali

‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’ याचिकेवर सुनावणीस नकार

‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’ याचिकेवर सुनावणीस नकार

समीर वानखेडेंना उच्च न्यायालयाचा दणका

मुंबई : आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी अभिनेता शाहरुख खान व गौरी खान यांच्या मालकीच्या रेड चिलिज एंटरटेनमेंटसह नेटफ्लिक्स व इतर पक्षांविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने दिग्दर्शित केलेली वेबसीरिज ‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’ नुकतीच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. समीर वानखेडे यांनी दावा केला आहे, की या सीरिजमध्ये त्यांच्यासारखे दिसणारे एक पात्र दाखवण्यात आले आहे. दिल्ली न्यायालयाने वानखेडे यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव यांनी वानखेडे यांना विचारले की, ‘हे मुंबईतील प्रकरण असताना तुम्ही ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयात का दाखल केली? दिल्लीत याची सुनावणी अपेक्षित असेल, तर कोणत्या आधारावर ही सुनावणी घेतली जावी, त्याची कारणे विषद करा. राष्ट्रीय राजधानीत कारवाईची अपेक्षा का व्यक्त करत आहात?’ समीर वानखेडे विरुद्ध रेड चिलीज एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव यांनी याचिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

वेबसीरिजवर बंदी घालण्याची मागणी

‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या सीरिजमधील चित्रण हे खोटे व बदनामीकारक असल्यामुळे त्याविरोधात मनाई आदेश देण्यात यावा, तसेच नुकसानभरपाईच्या स्वरूपात दिलासा मिळावा, अशी मागणी समीर वानखेडे यांनी दिल्ली उच्च न्ययालयात केली होती. या वेबसीरिजवर बंदी घालावी आणि त्यांच्याशी संबंधित कथित दृष्य सीरिजमधून वगळावी अशी मागणी वानखेडे यांनी केली होती.

Comments
Add Comment