Monday, October 27, 2025
Happy Diwali

ऑक्टोबर २०२५ मध्ये महाराष्ट्रात या दिवशी बँकांना सुटी

ऑक्टोबर २०२५ मध्ये महाराष्ट्रात या दिवशी बँकांना सुटी

मुंबई : नवरात्रौत्सवानंतर काही दिवसांनी दिवाळी हा सण आहे. यंदा दिवाळी ऑक्टोबर महिन्यात आहे. यामुळे ऑक्टोबर २०२५ मध्ये बँका किती दिवस सुरू राहणार हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

बँकांना सुट्या या रिझर्व्ह बँकेच्या नियमांच्या चौकटीत राहून दिल्या जातात. या नियमांनुसार सर्व बँकांच्या महाराष्ट्रातील शाखांना ऑक्टोबर २०२५ मध्ये फक्त नऊ दिवस सुटी असेल. यापैकी चार दिवस हे रविवार आहेत तर दोन दिवस हे शनिवार आहेत. बँकांना रविवारी सुटी असते. या व्यतिरिक्त दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुटी असते. या व्यवस्थेनुसार सर्व बँकांच्या महाराष्ट्रातील शाखांना ऑक्टोबर २०२५ मध्ये रविवारच्या चार आणि शनिवारच्या दोन अशा एकूण सहा सुट्या मिळतील. या व्यतिरिक्त दसरा / गांधी जयंती, लक्ष्मीपूजन आणि दीपावली पाडवा या तीन दिवशीही बँकांना सुट्या मिळतील. यामुळे सर्व बँकांच्या महाराष्ट्रातील शाखांना ऑक्टोबर २०२५ मध्ये एकूण नऊ दिवस सुट्या मिळतील.

यूपीआय सेवा, मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग, एटीएम, डिपॉझिट मशीन, क्रेडिट आणि डेबिट कार्ड यामुळे बहुसंख्य नागरिकांना थेट बँकेत न जाता विना अडथळा आर्थिक व्यवहार करता येतात. यामुळे सर्व बँकांच्या महाराष्ट्रातील शाखांना ऑक्टोबर २०२५ मध्ये नऊ दिवस सुट्या असल्या तरी नागरिकांचे बहुसंख्य आर्थिक व्यवहार विना अडथळा सुरळीत सुरू राहतील.

महाराष्ट्रात या दिवशी बँकांना सुटी

  1. गुरुवार २ ऑक्टोबर २०२५ - दसरा, गांधी जयंती
  2. रविवार ५ ऑक्टोबर २०२५ - पहिला रविवार
  3. शनिवार ११ ऑक्टोबर २०२५ - दुसरा शनिवार
  4. रविवार १२ ऑक्टोबर २०२५ - दुसरा रविवार
  5. रविवार १९ ऑक्टोबर २०२५ - तिसरा रविवार
  6. मंगळवार २१ ऑक्टोबर २०२५ - लक्ष्मीपूजन
  7. बुधवार २२ ऑक्टोबर २०२५ - दीपावली पाडवा, बलिप्रतिपदा
  8. शनिवार २५ ऑक्टोबर २०२५ - चौथा शनिवार
  9. रविवार २६ ऑक्टोबर २०२५ - चौथा रविवार
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >