
नवी दिल्ली: डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम व व्होडाफोन आयडिया यांच्यातील तिढा कोर्ट कचेरीतून सुटले का हा प्रश्न उपस्थित होत आहे. नुकत्याच झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी व्होडाफोन आयडियाला काही दिलासा देत २०१६-१७ कालावधीसाठी समायोजित सकल महसूल (Adjusted Gross Revenue AGR) देयके प्रकरणात दूरसंचार विभागाच्या (DoT) यांनी मागितलेल्या निधी मागणीला आव्हान देणारी दूरसंचार ऑपरेटरची याचिका सर्वोच्च न्यायालयाने अखेर स्विकारली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबर रोजी निश्चित केली आहे.संबंधित प्रकरणात दूरसंचार विभागाने व्होडाफोन आयडियाकडून ९४५० कोटी रुपयांची देयके (Due) मागितली आहेत, तर कंपनीच्या मते ही रक्कम आर्थिक वर्ष २७ पर्यंतच्या देयके मर्यादित करणाऱ्या आणि पुनर्मूल्यांकन (Revaluation) करण्यास परवानगी न देणाऱ्या पूर्वीच्या निर्णयांच्या व्याप्तीपेक्षा अधिक आहे. या थकबाकीमध्ये व्होडाफोन आयडियाच्या विलीनीकरणानंतरच्या २७७४ कोटी रुपये आणि व्होडाफोन ग्रुपच्या विलीनीकरणा पूर्वीच्या देयके संबंधित ५६७५ कोटी रुपये या प्रकरणात समाविष्ट आहेत.
व्होडाफोन आयडियाने असाही दावा केला आहे की दूरसंचार विभागाच्या गणनेत डुप्लिकेशन आणि कारकुनी त्रुटींचा समावेश आहे. दायित्वे आधीच मोजली गेली आहेत आणि ती बदलली किंवा वाढवली जाऊ शकत नाहीत असा दावा कंपनीने केला.कर्जबाजारी झालेल्या व्होडाफोन आयडिया (VI) संबधी मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या संबंधित एजीआर देयकांवरील व्याज, दंड आणि व्याज भरण्यात दिलासा मागण्यासाठी केलेल्या याचिका फेटाळून लावल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या याचिका 'चुकीच्या' असल्याचे आढळले होते. मात्र पुर्नविचार करत न्यायालयाने काहीसा दिलासा वीआयला दिला आहे.
आदित्य बिर्ला ग्रुप आणि यूके-आधारित व्होडाफोन ग्रुप यांच्यातील संयुक्त उपक्रम होऊन मर्जर झालेल्या व्होडाफोन आयडियाने,२०१९ च्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर ज्या महसुलावर थकबाकी आकारली जाते त्याची व्याप्ती वाढवली होती त्यांच्या पासून त्यांचे थकबाकी स्पेक्ट्रम आणि महसूल-वाटप थकबाकी भरण्यासाठी आजतागायत संघर्ष कंपनी करत आहे. यापूर्वी वोडाफोन आयडियाला मदत करण्यासाठी, केंद्र सरकारने कालांतराने थकबाकीचा काही भाग इक्विटीमध्ये रूपांतरित केला आहे आणि कंपनीतील त्यांचा हिस्सा ४८.९९% केला आहे. ज्यामुळे कंपनीला तरलता (Liquidity) प्राप्त झाली होती. या आर्थिक वर्षात ३१ मार्चपर्यंत, व्होडाफोन आयडियाचे एकूण कर्ज अंदाजे २.४२ लाख कोटी रुपये होते ज्यामध्ये दीर्घकालीन आणि अल्पकालीन कर्जांचा समावेश आहे. व्होडाफोन आयडियाचे शेअर्स. आज सत्राच्या सुरुवातीलाच बीएसईवर व्होडाफोन आयडियाचे शेअर्स ९% घसरून ७.९ रुपये प्रति शेअरवर पोहोचले होते.दुपारी १:२० वाजता, व्होडाफोन आयडियाचा शेअर ६.२% घसरून ८.१ रुपयांवर व्यवहार करत होते तर दुपारी १.५८ वाजता कंपनीचा शेअर ६.९१% कोसळला होता. मागील एका वर्षात वीआयचा शेअर एका वर्षात जवळपास २२% घसरला आहे.