Thursday, October 23, 2025
Happy Diwali

देवगड मत्स्य महाविद्यालयाच्या मंजुरीचा मार्ग मोकळा

देवगड मत्स्य महाविद्यालयाच्या मंजुरीचा मार्ग मोकळा

मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांच्या मागणीला यश

मुंबई : देवगड तालुक्यात मत्स्य महाविद्यालय होण्यासाठी खास बाब म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतिवृत्ताला मान्यता दिली आहे. यामुळे हे मत्स्यविद्यालय स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मत्स्यव्यवसाय व बंदर विकास तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कोकणच्या जनतेला नवे शैक्षणिक दालन निर्माण करून देण्याचा सातत्याने केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.

या संदर्भात दि. २६ ऑगस्ट रोजी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या दालनात बैठक झाली होती. यामध्ये सिंधुदुर्गचे पालकमंत्री तसेच मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे उपस्थित होते. या बैठकीच्या इतिवृत्ताला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. महाराष्ट्र राज्य मध्ये नवीन शासनमान्य विद्यालय यांना मान्यता देऊ नये असा धोरणात्मक निर्णय यापूर्वी झाला होता. मात्र मंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये मत्स्य विद्यालय करण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवले होते. धोरणात्मक निर्णय असल्याने त्याला मुख्यमंत्र्यांची मान्यता गरजेची होती. ही मान्यता मिळाली असून मत्स्य विद्यालय करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मत्स्य महाविद्यालय कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येणार असून,देवगड तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सौंदाळे येथे वन व महसूल यांच्या मालकीच्या जागेमध्ये होणार आहे. महाविद्यालयाच्या इमारती व सुविधांसाठी सुमारे दीडशे कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे. या महाविद्यालयामुळे पारंपरिक मच्छीमार तसेच मत्स्यव्यवसाय करणाऱ्या लोकांना आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवसाय विषयक माहिती मिळण्यास मदत होणार आहे. देवगड सारख्या किनारपट्टी भागात हे महाविद्यालय उभारले जाणार असल्याने खऱ्या अर्थाने किनारपट्टी भागाला शिक्षण आणि व्यवसायाचा न्याय  मिळणार  आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >