विदर्भ-मराठवाडा जोडणारा रेल्वे प्रकल्प संथ गतीने


मराठवाडा-कर्नाटक जोडणारा नांदेड-देगलूर-बिदर रेल्वे प्रकल्प यापूर्वीच मंजूर झाला आहे. या रेल्वे मार्गासाठी लागणारा खर्च व त्यामधील ५० टक्के वाटा महाराष्ट्र शासनाने अर्थसंकल्पात मंजूरही केला आहे. तसे केंद्राला देखील कळविले आहे; परंतु कर्नाटक राज्याने त्यांच्या वाट्याला येणारा या रेल्वे मार्गाचा खर्च अद्यापही मंजूर केलेला नाही. कर्नाटक राज्याकडूनच यासाठी चालढकल होत असल्याचे सांगितले जात आहे.


विदर्भ व मराठवाड्याला जोडणारा वर्धा-यवतमाळ-नांदेड हा रेल्वे प्रकल्प संथगतीने सुरू आहे. २८४ किमी अंतराच्या या वर्धा-नांदेड रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी ९० गावे जोडण्यात येत आहेत. यासाठी ३४४५.३४ कोटी रुपयांचा खर्च मंजूर झालेला आहे. याच प्रकल्पासाठी सुरुवातीचा खर्च ३१६८ कोटी रुपये एवढा होता; परंतु हा प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण न होऊ शकल्याने यासाठी खर्चाची रक्कम वाढली आहे. केंद्राच्या रेल्वे बोर्डाकडे या रेल्वे मार्गाचे काम आहे. विदर्भातील वर्धा-यवतमाळ-देवळी या रेल्वे स्थानकापर्यंत रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच कळंबपर्यंत रेल्वेसेवा सुरू होईल, असे सांगण्यात येत आहे. विदर्भातील कळंब या रेल्वे स्थानकापर्यंत वर्धा मार्गे रेल्वेसेवा सुरू झाली तर किमान विदर्भातील प्रवाशांची मराठवाड्यात ये-जा करण्यासाठी सोय होईल. मराठवाड्यातील हदगावपर्यंत या रेल्वेमार्गाचे काम सद्यस्थितीला सुरू आहे; परंतु हे काम खूपच हळू होत असल्याने या प्रकल्पाला उशीर लागत आहे. विदर्भ व मराठवाड्याला जोडणारा हा एक उत्तम मार्ग असून यामुळे नांदेड-नागपूर या भागाची कमी वेळेत रेल्वेसेवा जोडली जाईल. केवळ प्रवासी मार्ग म्हणूनच या मार्गाचा वापर हो


मराठवाड्यातील प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना गती मिळणे अत्यंत गरजेचे आहे. मराठवाड्यातील मुदखेड-परभणी या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण झाले. आता परभणी ते अंकाई या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण लवकर व निर्धारित वेळेत झाल्यास छत्रपती संभाजीनगरला जोडणारा हा एक गतिशील मार्ग उपलब्ध होऊ शकतो. मराठवाड्यातील प्रलंबित रेल्वेप्रकल्प तातडीने पूर्ण व्हावेत, अशी मागणी नांदेड जिल्हा रेल्वे परिषदेने सातत्याने लावून धरली आहे. यासाठी खासदारांच्या माध्यमातून दिल्ली येथील रेल्वे बोर्डाकडेही पाठपुरावा सुरू आहे; परंतु मराठवाड्यातील राजकीय शक्ती कमी पडत असल्याने मराठवाड्यातील रेल्वे प्रकल्प संथगतीने सुरू आहेत, असे नांदेड जिल्हा रेल्वे परिषदेचे मत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून मराठवाडा-कर्नाटक जोडणारा नांदेड-देगलूर-बिदर रेल्वे प्रकल्प यापूर्वीच मंजूर झालेला आहे. या रेल्वे मार्गासाठी लागणारा खर्च व त्यामधील ५० टक्के वाटा महाराष्ट्र शासनाने अर्थसंकल्पात मंजूरही केला आहे. तसे केंद्राला देखील कळविले आहे; परंतु कर्नाटक राज्याने त्यांच्या वाट्याला येणारा या रेल्वे मार्गाचा खर्च अद्यापही मंजूर केलेला नाही. कर्नाटक राज्याकडूनच य


वंदे भारतबाबत आनंदवार्ता


सद्यस्थितीला मुंबई ते नांदेड वंदे भारत रेल्वे सुरू आहे. अजून मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे तेलंगणाची राजधानी हैदराबाद ते नांदेड अशीही वंदे भारत लवकरच सुरू होणार आहे. यासाठी तेलंगणा सरकारने पुढाकार घेतला आहे; परंतु आता नांदेडमधील राजकारणी व पुढाऱ्यांनी या वंदे भारतचे श्रेय घेणे सुरू केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर प्रसार माध्यमातून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. हैदराबाद-नांदेड या वंदे भारतसाठी सिकंदराबाद डिव्हिजनने पुढाकार घेतला. त्यावेळेस नांदेडमधील एकाही नेत्यांनी हैदराबाद-नांदेडदरम्यान वंदे भारतची मागणी केली नव्हती; परंतु रेल्वे बोर्डानेच त्यांची गरज लक्षात घेऊन हैदराबाद ते नांदेड अशी मराठवाड्याला जोडणारी वंदे भारत लवकरच सुरू करण्याची घोषणा देखील केली आहे. मराठवाड्यात खरे पाहिले तर पुण्याला जोडणारी वंदे भारत अत्यावश्यक आहे. पुण्याला जाण्यासाठी मराठवाड्यातून दररोज शेकडो ट्रॅव्हल्स धावत असतात. ही खरी गरज येथील राजकारणी मंडळींना दिसत नाही काय, असा सवाल मराठवाड्यातील जनतेतून उपस्थित होत आहे. खरोखरच नेत्यांना नागरिकांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायचे असेल, तर त्यांनी नांदेड ते पुणे तसेच नांदेड ते नागपूर अशी वं- डॉ. अभयकुमार दांडगे



Comments
Add Comment

'व्होट बँक'साठी इच्छुकांचे फंडे

महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर होऊन त्यावर हरकती-सूचनांची सुनावणी झाली आहे. त्यामुळे सर्व

जयंत पाटिल यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट

दक्षिण महाराष्ट्राचे राजकारण गेल्या काही दिवसांत एका वक्तव्यामुळे प्रचंड ढवळून निघाले आहे. आमदार गोपीचंद

कोकणावर पावसाचे दुष्काळी सावट

कोकणात ढगफुटी केव्हा कोणत्या भागात होईल याचा अंदाज बांधणेही शेतकऱ्याला अवघड झाले आहे. पालघर, रायगड, रत्नागिरी,

सौदीही निसटला?

सौदीही निसटला? पाकिस्तानचा नुसता उल्लेख झाला, तरी भारतीय मन सावध होतं. पाकिस्तान भारताची थेट कुरापत काढू शकत

नागपूरकर भोसलेंचा पितृपक्षातील गणेशोत्सव

नागपूरकर भोसलेंचा पितृपक्षातील गणेशोत्सव महाराष्ट्रात भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून तर चतुर्दशीपर्यंत घरोघरी

कांद्याच्या दरासाठी आणखी किती काळ संघर्ष?

स्थिर निर्यात धोरण स्वीकारण्याची सध्या गरज आहे. निर्यात धोरण धरसोड वृत्तीचे असल्यामुळे देखील कांदा भाव खाली येत