Saturday, November 1, 2025
Happy Diwali

‘वेल डन आई’चा धम्माल टीझर प्रदर्शित

‘वेल डन आई’चा धम्माल टीझर प्रदर्शित

आजच्या मॉडर्न युगातील आईची गोष्ट सांगणारा 'वेल डन आई' हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. आई ही आई असते, मग ती पूर्वीच्या काळातील असो वा, आजच्या काळातील... आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते, कोणत्याही थराला जाऊ शकते, कोणतीही गोष्ट सहन करू शकते. मुलाला ठेच जरी लागली, तरी आईच्या डोळ्यांतून पाणी येते. अशाच आधुनिक युगातील आईची धमाल गोष्ट 'वेल डन आई' या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ३१ ऑक्टोबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा धडाकेबाज टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

निर्माते सुधीर पाटील यांनी दीपाली प्रोडक्शन या बॅनरअंतर्गत 'वेल डन आई' चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन शंकर अर्चना बापू धुलगुडे यांनी केले आहे. कथा, पटकथा आणि संवादलेखन संदीप गचांडे व शंकर धुलगुडे यांनी केले आहे. 'वेल डन आई'च्या टीझरने प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. 'वेल डन आई'चा टीझर खऱ्या अर्थाने उत्साहवर्धक असून, चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढवणारा आहे. या चित्रपटात खूप धमाल आणि मस्तीही असणार याची जाणीवही टीझर पाहिल्यावर होते. महाराष्ट्राच्या घरोघरी लोकप्रिय असलेल्या कॅामेडी क्वीन विशाखा सुभेदारने 'वेल डन आई'मध्ये शीर्षक भूमिका साकारली आहे.

Comments
Add Comment