
मोहित सोमण: युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फार्मा उत्पादनावरील टॅरिफ वाढीचा फटका आज सन फार्मा कंपनीला बसला आहे. त्यामुळे कंपनीचा शेअर ५२ आठवड्यातील सर्वाधिक निचांकी (All time Low) पातळीवर पोहोचला आहे. सकाळी सत्रा च्या सुरुवातीलाच कंपनीचा शेअर ४% घसरला होता. दुपारी १२.१३ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये २.८५% घसरण झाल्याने शेअरची किंमत १५८१ रूपये प्रति शेअरवर गेली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी फार्मा आयातीवर १००% टॅरिफवाढ केल्यानंतर सन फार्मा कं पनीची उत्पादने संकटाचा सामना करु शकतात. ट्रम्प यांनी ब्रँडेड व पेटंट औषधांवर ही दरवाढ केली ज्यामध्ये सर्वाधिक परिणाम होणाऱ्या कंपन्यांमध्ये सनफार्माचा समावेश आहे. जेनेरिक कंपन्यावर ही दरवाढ होणार नसल्याने त्यांना दिलासा मिळणार असून या वा ढीपासून संरक्षण मिळणार आहे.सनफार्माची विविध उत्पादने अमेरिकेतील बाजारात निर्यात होतात. ज्यामध्ये ILumya, Winlevi, Cequa,Odomozo या प्रमुख औषधांचा समावेश आहे. एकूण कंपनीच्या उद्योगांमधील १९.३% विक्री निर्यातीतील वाटा या औ षधांचा आहे. एकूण फार्मास्युटिकल क्षेत्रातील कंपन्याची सर्वाधिक निर्यात युएस बाजारात होते.
या विषयावर आपले मत व्यक्त करताना चॉईस इन्स्टिट्युशनल इक्विटी ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या मैत्री सेठ, दिपिका मुराका, स्तुती बगाडिया म्हणाल्या आहेत की,'अमेरिकेने ब्रँडेड औषधांवर १००% कर लादला आहे.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १ ऑक्टोबर २०२५ पासून ब्रँडेड किंवा पेटंट केलेल्या औषध उत्पाद नांवर १००% आयात शुल्क जाहीर केले आहे. या निर्णयाचे उद्दिष्ट देशांतर्गत उत्पादनाला चालना देणे आणि परदेशी आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आहे.
सवलतीच्या अटी
ट्रम्पच्या घोषणेत असे नमूद केले आहे की जर कंपनीने अमेरिकेत उत्पादन सुविधेचे बांधकाम सुरू केले असेल किंवा अशी सुविधा सध्या विकासाधीन असेल तर औषध उत्पादनांना या शुल्कातून सूट दिली जाईल.
आमचा दृष्टिकोन
फार्मास्युटिकल्स एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडियाच्या मते, ब्रँडेड आणि पेटंट केलेल्या औषध उत्पादनांवर १००% अमेरिकन शुल्क भारतीय औषध निर्यातदारांवर नकारात्मक परिणाम करू शकते, कारण अमेरिका भारतीय औषधांसाठी सर्वात मोठी बा जारपेठ आहे, जी आर्थिक वर्ष २०२५ मध्ये १० अब्ज डॉलर्सच्या निर्यातीच्या अंदाजे ३५% निर्यात करते.भारतीय औषधांना हा शुल्क प्रामुख्याने लक्ष्यित करत असताना, जटिल जेनेरिक आणि विशेष औषधे देखील प्रभावित होऊ शकतात की नाही याबद्दल अस्पष्टता आहे, ज्यामुळे आव्हाने निर्माण होऊ शकतात. अमेरिकेच्या निर्यातीवर अवलंबून असलेल्या कंपन्या. तथापि, अमेरिकेत बांधकामाधीन उत्पादन प्रकल्प असलेल्या कंपन्यांना सूट दिली जाईल, ज्यामुळे त्यांना टॅरिफ एक्सपोजर कमी करण्याची संधी मिळेल.'
सन फार्माने आर्थिक वर्ष २५ मध्ये, कंपनीने विशेष विक्रीत १७% वाढ होऊन ती १.२ अब्ज डॉलर्सवर पोहोचली होती तर जागतिक स्तरावरील इलुम्या विक्री १७% वाढून ६८१ दशलक्ष डॉलर्सवर पोहोचली आहे. तज्ञ सावधगिरी म्हणत आहेत की,'ब्रँडेड टॅरिफचा का ही उत्पादनांवर परिणाम होऊ शकतो.
याविषयी मत व्यक्त करताना, इनक्रेड अँसेट मॅनेजमेंटचे आदित्य खेमका म्हणाले आहेत की, 'ब्रँडेड औषधांच्या आयातीमुळे सन फार्मा आणि वोक्हार्टवर टॅरिफचा परिणाम होण्याची शक्यता आहे आणि बायोसिमिलर्समुळे बायोकॉनसारख्या कंपन्यांना धो का निर्माण होऊ शकतो.'
दिवसभरात कंपनीचे शेअर ३ ते ४% कोसळले आहेत. त्यामुळेच कंपनीचा शेअर १५७१.३० रूपयांवर पोहोचल्यानंतर लोअर सर्किटवर पोहोचला आहे.