मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष सोडण्यात आले. त्यांची निर्दोष सुटका झाल्यानंतर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना कर्नल पदावर बढती देण्यात आली आहे. कर्नल पुरोहित यांनी या स्फोट प्रकरणात नऊ वर्षे तुरुंगवास भोगला होता. कर्नल पुरोहित यांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला, की त्यांना राजकीयदृष्ट्या अडकवण्यात आले आहे. कर्नल पुरोहित १९९४ मध्ये मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये सामील झाले होते.