Friday, September 26, 2025

IND vs SL: श्रीलंकाने जिंकला टॉस, टीम इंडिया करणार फलंदाजी

IND vs SL: श्रीलंकाने जिंकला टॉस, टीम इंडिया करणार फलंदाजी
दुबई: आशिया कप २०२५मधील १८व्या सामन्यात आज भारत आणि श्रीलंका यांच्यात टक्कर आहे. दोन्ही संघादरम्यानचा हा सुपर ४मधील शेवटचा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जातोय. या सामन्यात भारतीय संघाने टॉस हरल्याने ते पहिल्यांदा फलंदाजी करणार आहे. भारतीय संघ याआधी आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. तेथे त्यांचा सामना रविवारी पाकिस्तानशी होणार आहे. दुसरीकडे श्रीलंकेच्या संघाचे मात्र फायनल खेळण्याचे स्वप्न भंगले. भारताचे प्लेईंग ११ अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव(कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, अक्षऱ पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह आणि वरूण चक्रवर्ती. श्रीलंकेचे प्लेईंग ११ पथुम निसंका, कुसल मेंडिस(विकेटकीपर), कुसल परेरा, चरिथ असंलका(कर्णधार), जेनिथ लियानागे, कमिंदू मेंडिस, दासुन शनाका, वनिंदु हसारंगा, दुष्मंथा चमिरा, महीश तीक्ष्णा, नुवान तुषारा.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा