
या सामन्यात पहिल्यांदा धक्का बसला तो शुभमन गिलच्या रूपाने. शुभमन गिल अवघ्या ४ धावा करून बाद झाला. सलामीवीर अभिषेक शर्माचा जबरदस्त फॉर्म या सामन्यातही पाहायला मिळाला. त्याने ३१ बॉलमध्ये ६१ धावांची तुफानी खेळी केली. सूर्याही या सामन्यात चमकदार खेळी करू शकला नाही. त्याच्या बॅटमधून केवळ १२ धावा निघाल्या. संजू सॅमसनने ३९ धावांची खेळी केली. तर हार्दिक पांड्या केवळ २ धावा करू शकला. अक्षर पटेल २१ तर तिलक वर्मा ४९ धावांवर नाबाद राहिले.
भारतीय संघ याआधी आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. तेथे त्यांचा सामना रविवारी पाकिस्तानशी होणार आहे. दुसरीकडे श्रीलंकेच्या संघाचे मात्र फायनल खेळण्याचे स्वप्न भंगले. भारताचे प्लेईंग ११ अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव(कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, अक्षऱ पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह आणि वरूण चक्रवर्ती. श्रीलंकेचे प्लेईंग ११ पथुम निसंका, कुसल मेंडिस(विकेटकीपर), कुसल परेरा, चरिथ असंलका(कर्णधार), जेनिथ लियानागे, कमिंदू मेंडिस, दासुन शनाका, वनिंदु हसारंगा, दुष्मंथा चमिरा, महीश तीक्ष्णा, नुवान तुषारा.