Wednesday, October 22, 2025
Happy Diwali

ICCने सूर्यकुमार यादवला ठरवले दोषी, ठोठावला दंड, निर्णयाला BCCI ने दिले आव्हान

ICCने सूर्यकुमार यादवला ठरवले दोषी, ठोठावला दंड, निर्णयाला BCCI ने दिले आव्हान

दुबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांनंतर वाद सुरूच आहे. या मालिकेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील साखळी सामन्यानंतर केलेल्या टिप्पणीमुळे भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला आयसीसी (ICC) च्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे. या प्रकरणी त्याला त्याच्या मॅच फीच्या ३० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

१४ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर सूर्यकुमारने दहशतवादी हल्ल्यातील पीडितांप्रति सहानुभूती व्यक्त करत हा विजय भारतीय लष्करी दलांना समर्पित केला होता. या विधानावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आयसीसीकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर, आयसीसीने याची दखल घेत मॅच रेफ्री रिची रिचर्डसन यांच्यासमोर सुनावणी घेतली. या सुनावणीत सूर्यकुमारने आपण दोषी नसल्याचे सांगितले असले तरी त्याची बाजू फेटाळण्यात आली.

आयसीसीने सूर्यकुमारला राजकीय स्वरूपाची कोणतीही टिप्पणी करण्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या निर्णयाविरुद्ध अपील दाखल केले आहे. यामुळे या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

याच मालिकेत पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ यालाही ३०% मॅच फीचा दंड ठोठावण्यात आला आहे, तर सलामीवीर साहिबजादा फरहान याला इशारा देऊन सोडून देण्यात आले आहे. या दोन्ही खेळाडूंनी भारताविरुद्धच्या सामन्यात आक्षेपार्ह हावभाव केले होते, ज्याची तक्रार बीसीसीआयने केली होती.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा