Friday, September 26, 2025

Gold Silver Rate Today: सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ ! जगात सोना चांदीचे दर का वाढत आहे त्याचे भारतावर काय परिणाम वाचा सविस्तर

Gold Silver Rate Today: सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ ! जगात सोना चांदीचे दर का वाढत आहे त्याचे भारतावर काय परिणाम वाचा सविस्तर

मोहित सोमण: सलग दोनदा घसरण झाल्यानंतर आज पुन्हा एकदा सोन्याचे दर वाढले आहेत. तर चांदीच्या दरात तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा चांदीचेही दर वधारले आहेत. जागतिक अस्थिरतेचा सामना करत असलेल्या कमोडिटी बाजारात मोठी चढउतार सातत्याने होत आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ४४ रुपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ४० रूपये,१८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ३३ रूपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे आज भा तीय सराफा बाजारातील सोन्याचे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेट दर ११४८८ रूपये, २२ कॅरेट दर १०५३० रूपये, १८ कॅरेट दर ८६१६ रूपयांवर गेले आहेत. २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ४४० रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ४०० रूपये, १८ कॅ रेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ३३० रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेट ११४८८० रूपये, २२ कॅरेटसाठी १०५३०० रूपये,१८ कॅरेटसाठी ८६१६० रूपयांवर गेले आहेत.

आज भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) सोन्याच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.१७% वाढ झाल्याने दरपातळी ११४०६० रूपयांवर गेली असून सोन्याच्या जागतिक गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळ पर्यंत ०.२१% वाढ झाली आहे. तर जागतिक पातळीवरील मानक (World Standard) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युएस गोल्ड स्पॉट दरात ०.०७% घसरण झाली असून प्रति डॉलर दरपातळी ३७४९.५१ औंसवर गेली आहे.संकेतस्थळावरील माहितीनुसार,भार तीय बाजारातील सोन्याचे सरासरी प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी ११४८८ रूपये, २२ कॅरेटसाठी १०५५० रूपये, १८ कॅरेटसाठी ८७४० रुपये आहे.आज भारतीय सराफा बाजारात आज सोन्यात सकाळच्या सत्रातच दबाव पातळी निर्माण झाली होती. सकाळी ९ ते १० दरम्यान सकाळच्या सत्रात रूपयाने किरकोळ रिकवरी केली तरी त्यापूर्वी रूपया डॉलरच्या तुलनेत निचांकी पातळीवर घसरला होता.सणासुदीच्या काळातील वाढलेल्या मागणीसह घसरलेला रूपया या कारणामुळे भारतीय बाजारात आज सोन्यात वाढ झाली आ हे. वैश्विक दृष्टीने भूराजकीय दबाव कायम असताना युएस बाजारातील गुंतवणूकदारांच्या मनात जीडीपीतील अपेक्षेपेक्षा सकारात्मक कामगिरीमुळे पुन्हा एकदा फेड दरकपातीची आशा निर्माण झाली आहे.

त्याचाच परिपाक म्हणून गुरुवारी अमेरिकेतील मज बूत आकडेवारीमुळे ट्रेझरी उत्पन्न वाढले आणि फेडच्या जवळच्या मुदतीच्या दर कपातीच्या अपेक्षा कमी झाल्या.US २१८००० विरुद्ध २३५००० च्या अंदाजामुळे आठवड्यातील बेरोजगारी दाव्यांचे आश्चर्य, काम गार बाजारातील ताकद वाढली आणि सोन्यावर दबा व आला. काल नव्या आकडेवारीनुसार ३.३% वरून सुधारित तिमाही जीडीपी ३.८% वर आला, ज्यामुळे बाजार फेडच्या दृष्टिकोनातून थोडे अधिक आक्रमक दृष्टिकोनाकडे ढकलले गेले. उद्या पीसीईची आकडे वारी अपेक्षित आहे याचाही परिणाम आगामी सोन्या तील गुंतवणूकीत होऊ शकतो दरम्यान आजच्या डोनाल्ड ट्रम्प यांनी फार्मा व इतर उत्पादनावर टॅरिफ घोषित केल्यामुळे सोन्यावर आणखी दबाव पडणे यापुढे अपेक्षित आहे.

सोन्याच्या घडामोडीवर भाष्य करताना ब्रोकरेज फर्म पीएल कॅपिटलचे संचालक अँडिप रायचुरा म्हणाले आहेत की आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किमती सध्याच्या सुमारे $३८०० वरून $४८०० प्रति औंसपेक्षा जास्त वाढू शकतात, म्हणजेच २६% पेक्षा जास्त वा ढ झाली.या वर्षी सोन्याला आर्थिक इतिहासाच्या केंद्रस्थानी ठेवले आहे, अमेरिकेतील स्पॉट गोल्डच्या किमती २३ सप्टेंबर २०२५ रोजी प्रति औंस सुमारे $३,७९१.११ या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचल्या आहेत, जे दोन वर्षांपूर्वीच्या पातळीच्या जवळजवळ दुप्पट हो ते. याव्यतिरिक्त, २३ सप्टेंबर २०२५ रोजी सोन्याच्या ईटीएफमध्ये दररोजचा ३ वर्षांचा उच्चांकी प्रवाह दिसून आला, ज्यामुळे धातूची ताकद आणखी वाढली.'

आजच्या सोन्याच्या टेक्निकल पोझिशनवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,' कॉमेक्स गोल्ड स्थिर राहिल्याने सोन्याचे भाव ११४००० वर स्थिर राहिले आणि १३० रुपयांची किरकोळ वा ढ झाली. डॉलर किंचित सकारात्मक राहिला आणि रुपया ८८.७१ च्या जवळ स्थिर राहिला. अमेरिकेच्या जीडीपी डेटामध्ये वाढ झाली, ज्यामुळे काल किरकोळ नफा बुकिंग झाली, परंतु सोन्याने लवकरच सुधारणा केली, त्याची तेजीची रचना कायम ठेवली. एकूण कल सकारात्मक राहिला, ११२५०० पातळीवर आधार (Support) आणि ११५००० वर प्रतिकार (Resistance)...'

त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात सोन्यात भाववाढ झाली असून सुद्धा मागणी राहू शकतात ज्यामुळे भविष्यात सोन्याला अधिक भाव येण्याची शक्यता आहे. खासकरून ईटीएफ गुंतवणू‌ कीत मोठी वाढ अपेक्षित आहे. गेल्या महिन्यात सोन्यात चढ उतार झाली असली तरी गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या किमती ५०% पेक्षा जास्त वाढल्या आहेत, ज्याने इक्विटी आणि रिअल इस्टेट सारख्या इतर मालमत्ता वर्गांना सुद्धा मागे टाकले आहे. सोन्याचा भाव त्याच्या सर्वकालीन उच्चांकी पातळीजवळ सध्या व्यवहार करत आहे आणि तज्ञांचा असा विश्वास आहे की वेळोवेळी सुधारणांसह यामध्ये प्राईज करेक्शन होऊ शकते.

चांदीतही आज वाढ !

चांदीच्या दरातही तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज वाढ झाली आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार चांदीच्या प्रति ग्रॅम दरात आज ३ रूपयाने, व प्रति किलो दरात तब्बल ३००० रूपयांनी वाढ झाली आहे त्यामुळे प्रति ग्रॅम दर १४३ रूपये, प्रति किलो दर १४३००० रुपयांवर गेले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.५६% वाढ झाल्याने दरपातळी १३७८२६ रुपयांवर पोहोचली आहे. जागतिक स्तरावरील चांदीच्या सिल्वर फ्युचर निर्देशांकात संध्याकाळ पर्यंत ०.६०% वाढ झाली.जागतिक दृष्टीने चांदीच्या किमती २.२८% वाढून १३७०५६ पातळीवर स्थिरावल्या कारण मजबूत औद्योगिक मागणी आणि जवळच्या काळातील भौतिक पुरवठ्यात घट झाल्याने अमेरिकेतील मजबूत मॅक्रोइकॉनॉमिक डेटाचा परिणाम जा स्त झाला ज्याचा परिणाम म्हणून उत्पन्न आणि डॉलर आज वाढला. ऑगस्टमध्ये अमेरिकेतील विद्यमान घरांच्या विक्रीत केवळ ०.२% ने किंचित घट झाली, तर दुसऱ्या तिमाहीतील जीडीपी वाढ ३.८% पर्यंत सुधारित झाली, जी २०२३ च्या उत्तरार्धानंतरची सर्वात मज बूत आहे. या मजबूत डेटा पॉइंट्समुळे आक्रमक फेड सुलभतेच्या अपेक्षा कमी झाल्या, परंतु चांदीला औद्योगिक मागणी, विशेषतः फोटोव्होल्टेइक पॅनेल आणि इलेक्ट्रॉनिक्सकडून पाठिंबा मिळाला, जिथे प्रतिस्थापन मर्यादित आहे.

जागतिक बाजारपेठेत पुरव ठ्याच्या बाजूने, रिफायनिंग हबमधील व्यत्ययांमुळे रिफाइंड चांदीची उपलब्धता मर्यादित झाली, डिलिव्हरेबिलिटी कमी झाली आणि प्रिमियम दर वाढले असल्याचे जागतिक कमोडिटी तज्ञांनी म्हटले आहे. गुंतवणूक देखील मजबूत रा हिली आहे, आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या सहामाहीत चांदीच्या ईटीपीने ९५ मोझचा निव्वळ प्रवाह नोंदवला आहे, जो २०२४ च्या पूर्ण वर्षाच्या तुलनेत आधीच जास्त आहे.

Comments
Add Comment