Friday, September 26, 2025

मोठी बातमी: ऑक्टोबर महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीची 'ही' नवी तीन तीन गिफ्ट मिळणार

मोठी बातमी: ऑक्टोबर महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीची 'ही' नवी तीन तीन गिफ्ट मिळणार

प्रतिनिधी: दिवाळीत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्यात आठव्या वेतन आयोगाची घोषणा होण्याची शक्यता आहे. अद्याप तारीख समोर आली नसली तरी या विषयी अधिकृत घोषणा ऑक्टोबर महिन्यात अपेक्षित आहे. याखेरीज सरकारच्या आकडेवारीनुसार डीए (Dearness allowance DA) वाढण्याची शक्यता आहे. या दोन्ही घोषणेसोबत आणखी एक घोषणा आठव्या वेतन आयोग (8th Pay Commission) विषयक अंमलबजावणी बाबतीत दर घोषित होऊ शकता त.नुकत्याच सरकारने फिटमेंट समितीकडून वेतन आयोगात वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. अद्यारूढ महागाई आधारे भत्ता वाढवण्याचा निर्णय ही सरकारची समिती घेत असते. त्यामुळे जुलै महिन्यातील एआयसीपीआय (AICPI) या महागाई निर्देशां कानुसार, जुलै महिन्यातील महागाई भत्ता (DA) ५८% वर पोहोचला आहे. यापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना ५५% डीए घोषित झाला होता. दिवाळीपूर्व काळात आता हा भत्ता ३% वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच दिवाळी बोनसही सरकारी कर्मचाऱ्यांना मिळ णार आहे. त्यामुळे ही दिवाळी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खरी दिवाळी ठरणार आहे.सरकारने यापूर्वीच जीएसटी कपात केल्याने वस्तूंचे दरही स्वस्त केले असल्याने व कर्मचाऱ्यांच्या कमाईत वाढ होत असल्याने मोठ्या प्रमाणात याचा फायदा ग्राहक बाजारात हो ऊ शकतो. वाढलेल्या बचतीचा फायदा सरकारी कर्मचाऱ्यांनाही होईल. एकूणच ग्राहक व व्यापारी यांच्यासाठी ही विन विन (Win Win) परिस्थिती आहे.

१) 8th Pay Commission- सरकारने हे १ जानेवारी २०२६ पासून लागू करण्याचे ठरवले आहे. याविषयी सरकार अधिकृत माहिती प्रकाशित करू शकते असे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार,पुढील महिन्यात सरकार टी ओआर (Terms of Reference ToR) घोषित करू शकते. तसेच अधिकृत घोषणाही वित्त आयोगाची पुढील महिन्यात होईल अशी अटकळ आहे.

२) दिवाळी बोनस - वित्त आयोगाच्या शिवाय सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसही मिळणार आहे. दरवर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना सरकार पीएलबी (Productive Linked Bonus) देते. विना राजपत्रित कर्मचाऱ्यांना (Non Gazetted) हा लाभ होतो. नुकत्या च झालेल्या घोषणेनुसार सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांना हा पीएलबी घोषित केला होता. त्यामुळे दिवाळी बोनसही सरकारी कर्मचाऱ्यांना अपेक्षित आहे.

३) डीए वाढ- डीअरनेस अलाऊन्स (DA) हा १ जानेवारी २०२५ पासून कर्मचाऱ्यांना ५५% महागाई भत्ता मिळत आहे. आता जुलै-डिसेंबर २०२५ चा दुसरा हप्ता ठरवायचा आहे. अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI) च्या आकडेवारीनुसार, जुलै म हिन्याचा महागाई भत्ता ५८% पर्यंत पोहोचू शकतो. दिवाळीपूर्वी, सरकार ३ टक्के महागाई भत्ता वाढ जाहीर करू शकते, म्हणजेच कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५५% वरून ५८%पर्यंत वाढेल असे सांगितले जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >