Thursday, September 25, 2025

रील बनवणे पडले महागात, पाच जणांचा बुडून मृत्यू

रील बनवणे पडले महागात, पाच जणांचा बुडून मृत्यू
पाटणा : बिहारमधील गयाजी येथे गुरुवारी (२५ सप्टेंबर) एक मोठी दुर्दैवी घटना घडली. खिजरसराय पोलीस ठाण्याच्या हद्दीत केनी पुलाजवळ, रील (व्हिडीओ) बनवण्याच्या नादात ९ मुलं नदीत बुडाली. यामध्ये ५ मुलांचा मत्यू झाला आहे. माहितीनुसार, ही घटना गुरुवारी (२५ सप्टेंबर) केनी घाटाजवळ घडली आहे. हि सर्व मुलं शाळेतून परत येत होती, आणि त्याच वेळी व्हिडीओ (रील) बनवण्यासाठी नदीच्या काठावर गेली, आणि बुडायला लागले.मुलांचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक धावत आले. मोठ्या प्रयत्नांनंतर सर्वांना बाहेर काढण्यात आलं.यानंतर सर्व मुलांना तातडीने बेलागंज प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं. प्राथमिक उपचारानंतर यातील दोन मुलांना पुढील उपचारासाठी अनुग्रह नारायण मगध मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठवण्यात आलं, तर उर्वरित सात मुलांना बेलागंज आरोग्य केंद्रातच दाखल करण्यात आलं.त्यामधून पाच मुलांचा मृत्यू झाला आहे आणि दोन मुलांवर उपचार सुरू आहेत. माहितीनुसार, या मुलांपैकी काही ११वीत शिकत होते तर काही १२वीत. नीमचक बथानी उपविभागीय अधिकारी (एसडीएम) केशव आनंद यांनी सांगितले की, ब्लॉक अधिकारी आणि पोलिस स्टेशन अधिकाऱ्यांकडून या घटनेची माहिती मिळाली आहे. आत्तापर्यंत ६ मुलांची ओळख पटली असून तौसीफ, जासिफ, साहिल, जैम,सुफियान आणि साजिद अशी या मुलांची नावे आहेत. या घटनेची माहिती नातेवाईकांना मिळताच संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे की, उर्वरित माहिती जिवंत वाचलेल्या मुलांच्या जबाबानंतर स्पष्ट होईल. या मुलांमध्ये कोणी सख्खे भाऊ होते का, किंवा काहीजण एका कुटुंबातील होते का, याचा तपास सुरू आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >