Saturday, October 25, 2025
Happy Diwali

चंद्रपूर - वरोरा तालुका परिसरात भूकंपाचे धक्के

चंद्रपूर - वरोरा तालुका परिसरात भूकंपाचे धक्के

चंद्रपूर : वरोरा तालुका परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के बसले असून वरोरा भूकंपाचे केंद्रबिंदू ठरले आहे. दरम्यान ३.२ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यातील वरोरा तालुका परिसरात भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याचे समोर आले आहे. ३.२ रिश्टर चे भूकंप नोंद झाल्याची माहिती भूकंप 'ॲप' द्वारे प्राप्त झाली आहे. त्याच वेळी वरोरा परिसरातील नागरिक विशेषतः मार्दा, एकोना गावातील नागरिक , पोलीस पाटील , तलाठी त्यांच्यामार्फत खात्री केली असता कोणत्याही प्रकारचे भूकंपाचे धक्के जाणवले नसल्याचे सांगण्यात आले. सदर परिसरात वेकोली खाण व्यवस्थापनाकडूनही खात्री करण्यात आaली आहे. नोंद झालेल्या भूकंपाच्या घटनेत सध्या तरी कोणतेही नुकसान न झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >