
मुंबई: मुंबईतील मानखुर्द साठे नगर परिसरात नवरात्र मिरवणुकीदरम्यान काही समाजकंटकांनी हल्ला करून दुर्गामातेच्या मूर्तीची तोडफोड केल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या ठिकाणी मंत्री नितेशजी राणे यांनी स्थानिक नागरिकांची भेट घेऊन संपूर्ण घटनेची माहिती मिळवली. तसेच यावेळी त्यांनी देवीचे दर्शन घेऊन त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींना अटक झाली असून पुढील तपास सुरू आहे. या विषयासंदर्भात मंत्री नितेशजी राणे हे स्वतः मुख्यमंत्री यांना घटनेची माहिती देऊन कठोर शिक्षेची मागणी करणार आहे असे त्यांनी स्थानिक नागरिकांना आश्वस्त केले.
या प्रसंगी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिकांनी उपस्थित राहून हिंदू ऐक्याचे दर्शन घडवले.