
प्रतिनिधी:एनपीसीआय (National Payments Corporation of India NPCI) नव्या आकडेवारीनुसार, युपीआय (Unified Payment Interface UPI) व्यवहारातून सोने खरेदी करण्याच्या व्यवहारात प्रचंड मोठी वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार ही वा ढ ९५.८९% वाढली आहे. इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) सोन्याच्या युपीआय खरेदीत ५५.४% वाढ झाली असून ती ११८४ कोटींवर पोहोचली आहे. जानेवारीत ही वाढ ७६१.६० कोटींवर गेली होती.एनपीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यातील १०२०. २४ कोटींच्या तुलनेत ही वाढ ऑगस्ट महिन्यात ११८३.७३ कोटींवर पोहोचली आहे.मुख्यतः भौतिक दृष्टीने सोने खरेदी करण्यापेक्षा ग्राहकांचा कल डिजिटल सोने खरेदीकडे असल्याचे हे द्योतक आहे. ईपीएफ (Exchange Traded Fund ETF) गुंतवणूकीत मो ठ्या प्रमाणात ही वाढ होत आहे. फोन पे, पेटीएम, फोन पे यांसारख्या फिनटेक व्यासपीठावर ही वाढ सातत्याने होत आहे. खासकरून भारतीय स्त्रीयांना सोने हे बहुमूल्य दागिने असल्याने सणासुदीच्या काळात सोन्यातील गुंतवणूक ही अधिक वाढू शकते. त्यामुळे डिजिटल सोने व भौतिक सोने या दोन्ही कमोडिटीत गुंतवणूक सातत्याने होत आहे. डब्लूजीसी (World Gold Council) डेटानुसार, जगभरातील ११% सोने भारतीय स्त्रियांकडे आहे. यातूनच भारतातील सोन्याचे महत्व लक्षात येते.
मात्र खरेदी करण्यात काही अडचणीही आहेत.डिजिटल सोने एका क्लिकवर खरेदी करू शकतात. त्यासाठी फारसे कष्ट लागत नाही मात्र यामध्ये या गुंतवणूकीत काही जोखीमही आहेत. डिजिटल सोन्यात गुंतवणूक करणे सोपे आहे. तुम्ही MMTC-PAMP, Pa ytm आणि PhonePe सारख्या अँप्स आणि प्लॅटफॉर्मवरून कमी प्रमाणात डिजिटल सोने खरेदी करू शकता. यामध्ये, सोने सुरक्षित तिजोरीत साठवले जाते आणि ते रोख किंवा भौतिक सोन्याच्या स्वरूपात परत वेळेवर परत मिळवता येते. हा एक लवचिक (Fl exible) गुंतवणूक पर्याय आहे ज्यामध्ये सहसा लॉक-इन कालावधी नसतो. ते उच्च तरलता (Liquidity) देखील देते.असे असले तरी जोखमी बघितल्यास डिजिटल सोने हे सेबी किंवा आरबीआयद्वारे नियंत्रित केले जात नाही. त्यामुळे त्यावर ठोस नियमन नाही. नि यामक देखरेखीचाही अभाव आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांचे संरक्षण किंवा तक्रार निवारण यंत्रणा नसतानाही ते मोठ्या जोखमींना तोंड देऊ शकते. दुसरीकडे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागारांना डिजिटल सोन्याची शिफारस करण्यास मनाई केली आहे कारण ते गुंतवणूकदारांच्या निधीचा गैरवापर करण्यास संवेदनशील गुंतवणूक असते.
डिजिटल सोने प्लॅटफॉर्मना देखील सायबर हल्ल्यांचा धोका असतो. जून २०२५ मध्ये, हॅकर्सनी एनबीएफसी (NFBC) अँप मध्ये चोरी केली होती. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार,४०० हून अधिक ग्राहकांच्या खात्यांमधून १.९५ कोटी रुपयांचे डिजिटल सोने चोरले.म्हणून डिजिटल सोन्यात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी लक्षात ठेवा की तुम्ही असुरक्षित आणि उच्च-जोखीम असलेल्या गुंतवणुकीसाठी स्वतःला तयार करू शकता.डिजिटल सोने देणाऱ्या कंपन्या सुरक्षित तिजोरीत डिजिटल सोने साठवण्याचा दावा करतात, परंतु ते स्वतंत्रपणे पडताळण्याचा कोणताही मार्ग नाही. यामुळे पारदर्शकतेचा अभाव निर्माण होतो आणि फसवणुकीच्या शक्यता उघडतात. या सणासुदीच्या काळात, तुम्ही तुमची संपत्ती वाढवण्यासाठी सुरक्षित गुंतवणूक पर्याय निवडण्याचे ध्येय ठेवले पाहिजे आणि त्यानुसार तुमचे आर्थिक नियोजन केले पाहिजे