
सिंधुदुर्ग : सध्याचं युग हे एआय युग आहे. प्रशासनही एआय तंत्रज्ञानाचा वापर करतंय आणि वेगाने विकास होतोय! सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८ विभाग एआय तंत्रज्ञानाने सज्ज झाले आहेत. आता निती आयोग या मॉडेलचा अभ्यास करणार आहे. हे सर्व शक्य झाले आहे ते मत्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या दूरदृष्टी आणि प्रयत्नांमुळे. त्यांच्या नेतृत्वाने ग्रामीण जिल्ह्याला आधुनिक ओळख मिळालीय.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री, मत्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास आणि जिल्हा एआययुक्त करणं हाच त्यांचा ध्यास आहे. त्यांच्या दूरदृष्टीपणामुळे सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला एआययुक्त जिल्हा ठरलाय. जेथे नगर विकास, परिवहन, पोलीस, आरोग्य, जिल्हा परिषद अशा ८ विभागांत एआय सक्रिय आहे. या मॉडेलमुळे नागरिकांची सुरक्षा, व्यावसायिकांचा विकास आणि पर्यटकांसाठीच्या सुविधा वाढल्या आहेत. एआय कॅमेऱ्यांमुळे महामार्गावरील अपघात रोखले जातात. हत्तींच्या समस्या सोडवल्या जातात आणि प्रलंबित प्रश्नही वेगाने मार्गी लागतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही क्रांती घडतेय, पण त्याचे मुख्य श्रेय जातं ते नितेश राणे यांना. नितेश राणे यांच्या प्रयत्नांची स्तुती करावी तितकी थोडी आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणून त्यांनी एआयला जिल्ह्याच्या विकासाचा आधार बनवलं. ग्रामीण ओळख असलेल्या जिल्ह्याला आधुनिक बनवण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. बंदर विकासापासून ते एआय एकत्रीकरणापर्यंत. त्यांच्या दूरदृष्टीमुळे निती आयोगाचे पथक ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अभ्यासासाठी येत आहे. हेच नितेश राणेंच्या प्रयत्नांचं मोठं यश आहे. हे मॉडेल देशभर राबवलं जाईल, ज्यामुळे ग्रामीण भारत एआय तंत्रज्ञामुळे विकासाची पावलं टाकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्देशानुसार निती आयोग अभ्यास करत आहे. तसंच सिंधुदुर्ग जिल्हा हा एआय मॉडेल ठरेल, असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी नितेश राणे यांनी कंबर कसलीय. पर्यटनात वाढ झालीय. मत्स्यव्यवसाय सुधारला आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळालीय. एआय तंत्रज्ञानामुळे ग्रामीण भागाचाही विकास होऊ शकतो हे नितेश राणे यांनी दाखवून दिलंय. त्यांच्या प्रयत्नांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला नवीन ओळख मिळाली. इतर जिल्ह्यांसाठी हे मॉडेल प्रेरणादायी ठरणार आहे. एकूणच नितेश राणेंचा विकासाचा ध्यास, दूरदृष्टी यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा एआययुक्त तर झालाच, त्याचबरोबर देशभरात जिल्ह्याचा गवगवाही झाला.. आता हे विकासाचे मॉडेल देशपातळीवर राबवण्यात येणार आहे.