
प्रतिनिधी:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अध्यक्षतेखाली कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेल्वे कर्मचाऱ्यांना पीएलबी (Production Linked Bonus PLB) बोनस मंजूर झाल्यामुळे मोठ्या प्रमा णात वस्तूंच्या वैयक्तिक उपभोगातही (Personal Consumption) वाढ होण्याची शक्यता आहे. रेल्वे युनियन असलेल्या ऑल इंडिया रेल्वेमन फेडरेशन (AIRF) ने सरकारकडे सध्या अस्तित्वा त असलेल्या ७००० प्रति महिना बोनसची मर्यादा हटवून अस्तित्वात असलेल्या महागाईच्या तुलनेत बोनस असावा अशी मागणी केली होती. अखेर ती मान्य झाली आहे. याखेरीज सरकारच्या माहि तीनुसार प्रत्येक कर्मचाऱ्यांमागे १७९५१ रूपयांपर्यंत बोनस मिळू शकतो.एकूण १८६५ कोटींचा हा बोनस रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलेल्या चांगल्या कामगिरी (Performance) आधारे देण्यात येणार आ हे.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, हा बोनस विविध श्रेणीतील १०.९१ लाख कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे आगामी काळात नेमक्या सणासुदीच्या दिवसांत कर्मचाऱ्यांकडून विविध प्रकारच्या वस्तूंच्या खरेदीत वाढ होऊ शकते. २०२४ साठी ११ लाख कर्मचाऱ्यांना हा बोनस मिळाला होता.
विशेषतः नवीन जीएसटी कपातीमुळे व्यवसाय आणि किरकोळ विक्रेत्यांना या सणासुदीच्या हंगामात मागणी वाढण्याची आशा असल्याने ही वेळ महत्त्वाची आहे.शहरी आणि निमशहरी भागात ला खो रेल्वे कर्मचारी असल्याने बोनसमुळे इलेक्ट्रॉनिक्स,कपडे आणि घरगुती वस्तूंसारख्या वस्तूंवरील खर्च थेट वाढू शकतो असे तज्ञांचे म्हणणे आहे. विविध अहवालातील माहितीनुसार अशा देयकां चा बहुगुणित (एकत्रित) परिणाम होतो, ज्यामुळे वापराला पाठिंबा मिळतो आणि वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक गती टिकून राहते. ग्राहकांच्या जीएसटी कपातीमुळे बचतही होणार असल्याने बाजारात मागणी वाढू शकते. त्यामुळे खऱ्या अर्थाने हा निर्णय केवळ रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी नाही तर बाजारपेठेसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.