Wednesday, September 24, 2025

'प्रहार' Stock Market: सलग पाचव्या सत्रात शेअर बाजारात घसरण रिअल्टी आयटी शेअरचा बाजारात ''थयथयाट' 'या' कारणामुळे आज घसरण जाणून घ्या आजचे विश्लेषण

'प्रहार' Stock Market: सलग पाचव्या सत्रात शेअर बाजारात घसरण रिअल्टी आयटी शेअरचा बाजारात ''थयथयाट' 'या' कारणामुळे आज घसरण जाणून घ्या आजचे विश्लेषण

मोहित सोमण : आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रात घसरण झाली आहे. सेन्सेक्स ३८६.४७ अंकाने व निफ्टी ११२.६० अंकांने कोसळला आहे. त्यामुळे सेन्सेक्स ८१७१५.५३ पातळीवर व निफ्टी २५०५६.९० पातळीवर स्थिरावला आहे. आजही विशेषतः दोन्ही बाजारातील बँक निर्देशांकातही मोठी घसरण झाल्याने बाजाराला सपोर्ट लेवल मिळू शकली नाही. केवळ एफएमसीजी (०.१८%) निर्देशांकात वाढ झाली असली तरी विशेषतः मिड स्मॉल कॅप आयटी टेलिकॉम (१.१६%), रिअल्टी (२.४९%), ऑटो (१.१५%) निर्देशांकात मोठी घसरण झाली. या शेअर्समध्ये सेल ऑफ झाल्याने आज बाजाराला वरची पातळी गाठता आली नाही. याशिवाय आज बाजारात मोठ्या प्रमाणात नफा बुकिंग झाल्याची शक्यता आहे.

तरीही सकाळच्या मानाने अखेरच्या सत्रात अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) घसरल्यानंतर काहीशी स्थिरता बाजारात येण्यापूर्वीच शेवटच्या क्षणापर्यंत सेल ऑफ सुरू राहिल्याने भारतीय गुंतवणूकदारांच्या तुलनेत आजही परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदा रांनी गुंतवणूक काढून घेतल्याची शक्यता आहे.

कमोडिटी बाजारातील सोन्यात संध्याकाळपर्यंत स्थिरता लाभल्याने आज सोन्यातील मागणी घटल्याने दबाव कमी झाला. किंबहुना आज सकाळी ८८.८२ या निचांकी पातळीवर गेलेला रूपया संध्याकाळपर्यंत २ पैशाने रिकव्हर झाला असल्याने काहीसा सोन्यावरील दबाव कमी झाला. अखेरच्या सत्रात आरबीआयकडून रूपयांच्या बाबतीत हस्तक्षेप सुरू झाल्याने आगामी दोन तीन सत्रात रूपयाबाबतीत दिलासा मिळू शकतो.

आज टाटा मोटर्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, अदानी एंटरप्रायझेस, विप्रो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस, बजाज ऑटो, इंडसइंड बँक, हिरो मोटोकॉर्प, अल्ट्राटेक सिमेंट, अ‍ॅक्सिस बँक आणि टेक महिंद्रा असे हेवीवेट शेअर्स १ ते २% पातळीवर घसरले आहेत. तर टाटा इन्व्हेसमेंट कॉर्पोरेशन, एसबीआय कार्ड, मारूती सुझुकी, बजाज फायनान्स या शेअर्समध्ये किरकोळ वाढ झाल्याने निर्देशांकातील होणारे नुकसान नियंत्रित झाले.

आज संध्याकाळपर्यंत युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात संमिश्र प्रतिसाद मिळत असताना आशियाई बाजारातही जागतिक अर्थव्यवस्था अस्थिरतेमुळे संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. तसेच युरोपियन बाजारातील तिन्ही बाजारात घसरण झाली आहे.

आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ टाटा इन्व्हेसमेंट कॉर्पोरेशन (८.९१%), मिंडा कॉर्पोरेशन (८.३४%), एससीआय (४.०९%), दिपक फर्टिलायजर (४.०६%), हिमाद्री स्पेशल (३.५९%), जेएसडब्लू होल्डिंग्स (३.४४%), कजारिया सिरॅमिक्स (२.५४%), सीसीएल प्रोडक्ट (२.१६%), एचबीएल इंजिनिअरिंग (२.११%), इंडियन बँक (१.८८%), एसबीआय कार्ड (१.६६%), एनटीपीसी (१.३४%), होडांई मोटर्स (१.२६%), टाटा कंज्यूमर (१.०३%), होम फर्स्ट फायनान्स (१.०१%) समभागात झाली आहे.

आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण अदानी पॉवर (१०.९९%), अदानी टोटल गॅस (७.०७%), बलरामपूर चिनी (५.३५%), झेन टेक्नॉलॉजी (४.३८%), गोदरेज प्रोपर्टी (४.०२%), नेटवेब टेक्नॉलॉजी (३.५१%), भारत फोर्ज (३.३६%), डीएलएफ (३.३९%), मस्टेक (३.३४%), बालकृष्ण इंडस्ट्रीज (३.२१%), कल्याण ज्वेलर्स (३.२०%), अदानी ग्रीन (३.२०%), आनंद राठी वेल्थ (३.०२%), रिलायन्स पॉवर (२.८८%) समभागात झाली आहे.

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'जीएसटी सुधारणांनंतर भारतीय बाजारपेठेत नफा बुकिंग दिसून आली आहे, कारण गुंतवणूकदारांनी मूल्यांकन आणि दुसऱ्या तिमाहीतील उत्पन्नाच्या अपेक्षांचे पुनर्मूल्यांकन केले आहे. एच-१बी शुल्क वाढीमुळे आयटी शेअर्सची कामगिरी कमी झाली आहे, तर चालू व्यापार वाटाघाटी आणि कमकुवत जागतिक संकेतांमुळे अमेरिकेतील व्यापारातील वक्तव्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरीची भावना निर्माण झाली आहे. भारतातील तुलनेने उच्च मूल्यांकन, कमाईच्या वाढीतील मध्यमतेसह, एफआयआयना त्यांच्या स्थानांमध्ये कपात करण्यास प्रवृत्त करत आहेत. असे म्हटले जाते की, संरचनात्मक सुधारणा आणि देशांतर्गत वाढीचे चालक अंतर्निहित कल रचनात्मक ठेवत आहेत. सध्याचे अडथळे क्षणभंगुर दिसत आहेत, कालांतराने अडथळे कमी होण्याची शक्यता आहे.'

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,'२४ सप्टेंबर रोजी भारतीय इक्विटी बेंचमार्क्स मंदावलेल्या स्थितीत बंद झाले, नफा बुकिंगमुळे निफ्टी २५०५० पातळीच्या जवळ आला. सलग चौथ्या सत्रात निर्देशांक खाली येत असल्याचे दिसून आले.

आयटी काउंटरनी कमी कामगिरी केली, एच-१बी शुल्क वाढीमुळे दबाव आला, तर अमेरिकेत सुरू असलेल्या व्यापार संघर्ष आणि जागतिक मॅक्रो मऊ झाल्यामुळे जोखीम घेण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला, ज्यामुळे बाजारातील सहभागी बचावात्मक स्थितीत राहिले.

बंद होताना, सेन्सेक्स ३८६.४७ अंकांनी किंवा ०.४७ टक्क्यांनी घसरून ८१७१५.६३ पातळीवर आणि निफ्टी ११२.६० अंकांनी किंवा ०.४५ टक्क्यांनी घसरून २५०५६.९० पातळीवर बंद झाला.

एफएमसीजी वगळता, सर्व प्रमुख क्षेत्रीय निर्देशांक नकारात्मक क्षेत्रात बंद झाले, ऑटो, आयटी, मीडिया, धातू, तेल आणि वायू आणि रिअल्टीमध्ये व्यापक नफा बुकिंग दिसून आले, ज्यामध्ये ०.५%-२.५% घसरण झाली.

मिडकॅप निर्देशांक जवळजवळ १% घसरला, तर स्मॉल-कॅप निर्देशांक सुमारे ०.७% घसरला, जो व्यापक-आधारित कमकुवतपणा दर्शवितो.'

आजच्या बाजारातील निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,'निर्देशांकाने बुधवारी सलग चौथ्या सत्रात सुधारणात्मक घसरण सुरू ठेवली. दैनिक चार्टवर, कमी उच्चांक आणि कमी नीचांकासह मंदीची मेणबत्ती (Bearish Candle) तयार केली, जी सतत नफा बुकिंग दर्शवते. या सुधारात्मक ट्रेंडमध्ये विराम केवळ दैनिक चार्टवर उच्च उच्चांक आणि उच्चांक तयार झाल्यामुळे दिसून येईल.

अपेक्षेप्रमाणे, निफ्टी एका निश्चित श्रेणीत एकत्रित होत आहे आणि नजीकच्या काळात २५००० ते २५५०० पातळीदरम्यान व्यापार सुरू ठेवण्याची अपेक्षा आहे.

२०-दिवस आणि ५०-दिवसांच्या घातांकीय मूव्हिंग सरासरी (Exponential Moving Average EMA) च्या संगमाशी संरेखित करून, तात्काळ आधार २५१००–२४९०० पातळीवर ठेवण्यात आला आहे.

सध्याच्या पुलबॅक असूनही, आम्ही सकारात्मक एकूण पूर्वाग्रह राखतो आणि सध्याच्या घसरणीला व्यापक अपट्रेंडमध्ये खरेदीची संधी म्हणून पाहतो. वरच्या बाजूस, २५५००–२५६०० झोनमध्ये प्रतिकार अपेक्षित आहे.'

आजच्या बाजारातील बँक निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,'बँक निफ्टीने दैनंदिन चार्टवर कमी उच्च आणि कमी नीचांकासह मंदीचा मेणबत्ती निर्माण केला, जो मंगळवारच्या घसरणीनंतर कोणताही फॉलो-थ्रू नसल्याचे दर्शवितो. गेल्या तीन आठवड्यांमध्ये २३०० अंकांच्या तीव्र तेजीनंतर निर्देशांक त्याच्या अतिखरेदीच्या स्थितीतून बाहेर पडताना दिसत आहे.

आम्हाला अपेक्षा आहे की नजीकच्या काळात निर्देशांक ५४७००-५६००० पातळीच्या श्रेणीत एकत्रित होत राहील. तात्काळ आधार ५४७००-५४९०० पातळीवर दिसून येत आहे, जो गेल्या आठवड्याच्या नीचांकाशी आणि २०-दिवसांच्या ईएमए (EMA) शी जुळतो. ५४००० पातळीच्या जवळ एक अधिक महत्त्वपूर्ण आधार पातळी ठेवण्यात आली आहे, जी अलीकडील तेजीच्या प्रमुख रिट्रेसमेंट पातळीचे प्रतिनिधित्व करते.

आमचा व्यापक दृष्टिकोन सकारात्मक राहिला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की सध्याच्या एकत्रीकरण टप्प्यात चालू असलेल्या अपट्रेंडमध्ये खरेदीची संधी मिळते. वरच्या बाजूस, निर्देशांकाला ५६००० अंकांच्या जवळ प्रारंभिक प्रतिकाराचा सामना करावा लागतो. या पातळीपेक्षा जास्त निर्णायक ब्रेकआउटमुळे नवीन अपट्रेंडचा मार्ग मोकळा होऊ शकतो, जो येत्या आठवड्यात ५७००० च्या पातळीला लक्ष्य करू शकतो.'

त्यामुळे सलग पाचव्यांदा घसरलेल्या बाजाराची एकूण परिस्थिती पाहता गुंतवणूकदारांना सावधगिरी बाळगली पाहिजे. विशेषतः आपली गुंतवणूक नफा बुकिंग माध्यमातून होल्ड केल्यास आगामी जागतिक घडामोडीचा सकारात्मक परिणाम बाजारात होऊ शकतो.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >