
मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात घसरण झाली आहे. सकाळी गिफ्ट निफ्टीतील संकेतांमुळे पडझडीचे वारे बाजारात वाहत आहेत. सुरुवातीच्या कलात सेन्सेक्स २२८.५२ व निफ्टी ८२.१० अंकाने घसरला आहे.सेन्सेक्स बँक नि र्देशांकात सकाळी १२७.२२ अंकाने व बँक निफ्टीत १२८.७० अंकांने घसरण झाली आहे. त्यामुळे आज सलग चौथ्या सत्रात शेअर बाजारात घसरण झाली आहे. दोन्ही बाजारातील मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये दबाव कायम राहिल्याने बाजारातील टेक्निकल पोझिशन मधील आव्हान कायम आहे.
भारतीय अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) हा सुरूवातीच्या कलात २.०९% उसळल्याने बाजारात अस्थिरता कायम राहण्याचे संकेत मिळत आहेत. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात आज पीएसयु बँक (०.७६%) वगळता इतर निर्देशांकात घसरण झाली आ हे.ही सलग दुसऱ्यांदा वाढ पीएसयु बँक निर्देशांकात होत आहे. तज्ञांनी पीएसयु बँकांच्या सुधारित वाढीचा उल्लेख केल्याने तसेच सरकार आगामी काळात परदेशी गुंतवणूकदारांना पीएसयु बँकांच्या गुंतवणूकीची अटल शिथिल करण्याची शक्यता वर्तवली जात आ हे.प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, केवळ २०% गुंतवणूकीची अट शिथील होऊन याहून अधिक गुंतवणूक परदेशी गुंतवणूकदार पीएसयु बँकेत करू शकतात. त्यामुळे ही पीएसयु बँक शेअर्समध्ये वाढ अपेक्षितच होती. इतर निर्देशांकात मात्र दबाव कायम आ हे. सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण अपेक्षेप्रमाणे मिड स्मॉल आयटी टेलिकॉम (१.०१%) निर्देशांकात झाली असून त्याखालोखाल आयटी (०.७१%), कंज्यूमर ड्युरेबल्स (०.५९%), मिड स्मॉल हेल्थकेअर (०.४४%), मेटल (०.४१%) निर्देशांकात सर्वाधिक झाली.
काल आशियाई व युएस बाजारात संमिश्र संकेत मिळाले होते. सलग दोन दिवस आयटी शेअर्समध्ये सेल ऑफ झाले. याच धर्तीवर आजही आयटी शेअर्समध्ये सेल ऑफ कायम राहते का ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून परदेशी सं स्थात्मक गुंतवणूकदार (Foreign Institutional Investors FII) सातत्याने गुंतवणूक बाजारातून काढत आहेत. नवीन प्रोव्हिजनल आकडेवारीनुसार, कालपर्यंत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ३५५१.१९ कोटींची गुंतवणूक बाजारातून काढली. घरगुती गुंत वणूकदारांनी (Domestic Investors) मात्र सलग ११ व्या दिवशी आपली निव्वळ गुंतवणूक कायम राखली आहे ज्याचे मूल्यांकन २६७०.८७ कोटी रुपये आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी काल ११९२.८० कोटींची गुंतवणूक काल बाजारातून काढली होती.अमेरिके चे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाविरुद्धच्या वक्तव्याचा आपला पाढाच सुरूच ठेवला ज्यांचे पडसाद काल युएस बाजारासह जगभरातील बाजारात उमटले. तेलाच्या बाबतीत व्यापाऱ्यांनी ओपेक+ सदस्यांकडून पुरवठा खंडित होण्याकडे लक्ष ठेवल्याने तेलाने ए का आठवड्यातील सर्वात मोठी वाढ नोंदवली होती. ब्रेंट प्रति बॅरल $६८ वर पोहोचला, तर वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट $64 च्या जवळपास होता. फेडरल रिझर्व्ह धोरणकर्त्यांकडून गुंतवणूकदारांनी केलेल्या भाष्यांचे मूल्यांकन केल्यामुळे सोन्याचे भाव तीन दिवसां च्या विक्रमी पातळीवर व्यवहार करत होते. त्यामुळे डॉलरचा कमोडिटीतही परिणाम कायम आहे.
भारतीय बाजारात आजही दबाव कायम आहे. युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एच१बी व्हिसावर आकारलेले नवे शुल्क आयटी शेअर्समध्ये दबाव आणखी वाढवत आहेत. त्यामुळे इतरत्र शेअर्समधील कामगिरी बाजारात आजही आधारभूत ठरणार आहे. त्या मुळेच प्री ट्रेडिंगवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,''जागतिक बाजारपेठेत सध्या एक चिंतेचा विषय म्हणजे मालमत्तेच्या किमती वाढणे. मालमत्तेच्या किमती मग त्या शेअर अ सोत, सोने असोत, चांदी असोत, बिट कॉइन असोत, त्या जास्त आहेत. ही चिंता काल फेडचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी रोड आयलंड येथे केलेल्या भाषणात व्यक्त केली. पॉवेल यांनी महागाई आणि रोजगाराच्या जोखमींचा पुनरुच्चार केला, ज्यामुळे फे ड धोरण पुढे आव्हानात्मक ठरेल असे संकेत मिळतात.भारतात, जरी निफ्टी सप्टेंबर २०२४ च्या शिखरापेक्षा सुमारे ४% खाली असला तरी, दीर्घकालीन सरासरीपेक्षा मूल्यांकने जास्त आहेत. परंतु आर्थिक वर्ष २७ मध्ये कमाईची वाढ झाल्यावर हे मूल्यांकने न्याय्य ठरतील, अशी आशा आहे. परंतु स्मॉलकॅप विभागातील मूल्यांकने वाढवत राहतील आणि पुढील सुधारणा होण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांनी बाजारातील घसरणीवर गुंतवणूक करताना मूल्यांकने आणि वाढीच्या क्षमतेवर भर दिला पाहिजे.'
आजच्या बाजारातील सुरूवातीच्या कलात सर्वाधिक वाढ रेडिको खैतान (३.१२%), युनो मिंडा कॉर्पोरेशन (२.१९%), स्विगी (२.००%), टाटा इन्व्हेसमेंट कॉर्पोरेशन (१.९३%), एफ एस एन ई कॉमर्स (१.८०%), ज्योती सीएनसी ऑटो (१.७७%), अदानी पॉवर (१.५ ७%), जेएसडब्लू होल्डिंग्स (१.५५%), ट्रेंट (१.५१%), माझगाव डॉक (१.५१%), सोभा (१.५१%), मारूती सुझुकी (१.२६%), एल टी फूडस (१.१९%), श्रीराम फायनान्स (१.१५%), टोरंट पॉवर (१.१९%), आयसीआयसीआय बँक (१.११%), आयआयएफएल फायनान्स (१.००%), वोडाफोन आयडिया (०.९१%), आयडीएफसी बँक (०.८६%), एसबीआय कार्ड (०.७७%) समभागात झाली आहे.
आजच्या सुरुवातीच्या कलात सर्वाधिक घसरण अदानी पॉवर (३.४५%), अदानी टोटल गॅस (३.१८%), अशोक लेलँड (२.२६%), केईआय इंडस्ट्रीज (२.०४%), कॅम्पस ॲक्टिववेअर (१.९४%), इंटलेक्ट डिझाईन (१.८२%), टाटा मोटर्स (१.७५%), आनंद राठी वेल्थ (१.७४%), सोनाटा सॉफ्टवेअर (१.७२%), बालकृष्ण इंडस्ट्रीज (१.७१%), जीएमडीसी (१.६९%), टेक महिंद्रा (१.५६%), कोफोर्ज (१.५६%), विप्रो (१.२०%), टीबीओ टेक (१.१४%) समभागात झाली आहे.
बाजारपूर्व परिस्थितीवर विश्लेषण करताना चॉईस इक्विटी ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या तांत्रिक व डेरिएटिव विश्लेषक अमृता शिंदे म्हणाल्या आहेत की,' गिफ्ट निफ्टी भारतीय बाजारांसाठी कमकुवत सुरुवात दर्शवितो, फ्युचर्स २५,१९३.५० -५०.५ अंकांनी खाली व्यवहार करत आहेत. मिश्र जागतिक संकेत आणि देशांतर्गत प्रतिकूल परिस्थिती दरम्यान सावधगिरीचा सूर आहे. भारताचा आर्थिक डेटा स्थिर आहे, परंतु अलिकडच्या धोरणात्मक गोंधळ विशेषतः यूएस व्हिसा सुधारणा बाजारांना सावध ठेवत आ हेत.निफ्टी ५० दबावाखाली आहे, प्रमुख सरासरीपेक्षा कमी व्यापार करत आहे, जो असुरक्षिततेचे संकेत देतो. जर २५००० पातळी कमी झाली तर घसरणीचा धोका वाढतो. प्रतिकार (Resistance) २५३००-२५३५० पातळीवर ठेवला आहे. व्यापारी २५००० पातळी वर थांबून २५१०० पातळीच्या जवळ खरेदी करू शकतात आणि नफ्यासाठी २५३००-२५३५० पातळीचे बुकिंग लक्ष्य ठेवू शकतात.बँक निफ्टी आर्थिक क्षेत्रातील कमकुवत व्याजदरातून संकेत घेत आहे; ५५२००-५५१०० पातळीवर आधार नसल्यास सुधारणा वर्तन चालू राहू शकते. प्रतिकार ५५९०० पातळीच्या जवळ अपेक्षित आहे.
भारत VIX मंदावलेला आहे आणि रेंज-बाउंड, शांत जवळच्या काळातील वातावरणाकडे निर्देश करत असले तरी, तीव्र हालचाली नाकारता येत नाहीत. संस्थात्मक प्रवाहांवर, एफआयआय (FII) निव्वळ विक्रेते -३५५१ कोटी राहतात, तर घरगुती गुंतवणूकदार (DII) आधार देण्यासाठी खरेदीदार +२६७१ कोटींहून अधिक म्हणून काम करू शकतात.प्रमुख तांत्रिक क्षेत्रांपेक्षा खाली मोडल्यामुळे, प्रतिकारांपेक्षा मजबूत पुष्टीकरण नसल्यास निर्देशांक दबावाखाली राहू शकतात. सध्यासाठी, 'शक्तीवर विक्री' (Sell on Stre ngth) किंवा रेंज-प्ले (Range Play Approach) दृष्टिकोन शहाणपणाचा आहे.'
आजच्या बाजारातील निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य बाजार रणनीतीकार आनंद जेम्स म्हणाले आहेत की,'२५००० क्षेत्रामध्ये घट दिसून आली, तर कालच्या अंदाजानुसार २५२७८ पातळीच्या क्षेत्राने वरच्या बाजूंना मर्यादा घातल्या. दिशात्मक हालचालींसाठी या टोकांच्या पलीकडे ब्रेकची आपण वाट पाहत असताना, गती मंद दिसते, ज्यामुळे शाश्वत हालचालींची शक्यता कमी होते. जोपर्यंत आपण २५३३० पातळीच्या वर बंद होताना पाहत नाही तोपर्यंत २४८८०-८०० पातळीचा मार्ग कायम राहील.'
त्यामुळे आजही बाजारात घसरणीचे संकेत मिळत आहेत. दरम्यान युएस बाजारातील नवे निर्णय पुढील हालचालींसाठी नाट्यमय वळण देऊ शकतात. तज्ञांच्या मते रेंज प्ले अप्रोच बाळगणे महत्वाचे ठरणार आहे.