Wednesday, September 24, 2025

मुंबई पोलिसांची कमाल! जम्मूचा फरार आरोपी वांद्र्यातील लकी हॉटेलमध्ये सापडला

मुंबई पोलिसांची कमाल! जम्मूचा फरार आरोपी वांद्र्यातील लकी हॉटेलमध्ये सापडला
मुंबई: मुंबई गुन्हे शाखेने जम्मूमध्ये खून, दरोडा आणि खंडणीसाठी हवा असलेला एक फरार आरोपी रॉयल मनजीत सिंगला शिताफीने अटक केली. ३७ वर्षीय सिंग, मूळचा दलपतियन मोहल्ला, पीर मिठा, जम्मू येथील आहे. तो गुन्हे शाखेच्या युनिट ८, युनिट ९ आणि गुन्हेगारी गुप्तचर कक्षाच्या अधिकाऱ्यांना गुंगारा देत होता. मात्र एका गुप्त माहितीमुळे टीमला वांद्रे पश्चिम येथील लकी हॉटेलमध्ये पोहोचता आले. जिथे २३ सप्टेंबर रोजी सिंगला अटक करण्यात आली. चौकशीत भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली नोंदवलेल्या प्रकरणांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे निश्चित झाले. अटकेनंतर, सिंगला पुढील कायदेशीर कारवाईसाठी जम्मू पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
Comments
Add Comment