
मोहित सोमण: दोन दिवसांच्या दणकून झालेल्या वाढीनंतर आज सोन्याच्या गाडीला ब्रेक लागला आहे. दोन दिवस सोन चांदी उच्चांकी पातळीवर पोहोचले होते. आज विविध कारणांमुळे सोन्या च्या दरात आज घसरण झाली आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ३२ रूपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ३० रूपयांनी, १८ कॅरेट सो न्याच्या प्रति ग्रॅम दरात २४ रूपयांनी घसरण झाली. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी ११५३७ रूपये, २२ कॅरेटसाठी १०५७५ रूपये, १८ कॅरेटसाठी ८६५३ रूपयांवर पोहोचला आहे. माहितीनु सार, सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत २४ कॅरेटसाठी ३२० रूपये, २२ कॅरेट साठी २४० रूपये, १८ कॅरेटसाठी २४० रूपयांनी घसरण झाली. त्यामुळे प्रति तोळा किंमत २४ कॅरेटसाठी १०५७५० रू पये, २२ कॅरेटसाठी ८६५३० रूपये, १८ कॅरेटसाठी ८६५३० रूपयांवर पोहोचले आहेत.
मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी ११५६४ रूपये, २२ कॅरेटसाठी १०५७५ रुपये, १८ कॅरेटसाठी ८७८० रूपयांवर पोहोचले आहेत. तसेच भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) बाजारात सोन्याच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.३८% घसरण झाली आहे. त्यामुळे एमसीएक्समधील दरपा तळी ११३४०० रूपयांवर पोहोचली. तसेच जागतिक पातळीवर सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.४७% घसरण झाली आहे. जागतिक मानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यु एस गोल्ड स्पॉट दरात संध्याकाळपर्यंत ०.०३% घसरण झाल्याने प्रति डॉलर दरपातळी ३७६१.२२ औंसवर गेली आहे.
दोन दिवसांच्या रॅलीनंतर आज का घसरले सोने?
जागतिक स्तरावरील सोन्यावर दोन दिवस दबाव निर्माण झाला होता. मात्र आज सकाळपासूनच डॉलर निर्देशांकात (Dollar Index DXY) वाढ झाल्याने काहीसा दबाव सोन्यामध्ये कमी झाला.त सेच मागणीतही घट होण्याबरोबरच जागतिक पातळीवरील अस्थिरतेत आगामी युएस बाजारातील शुक्रवारच्या पीसीई (Personal Consumption Expenditure PCE) म्हणजेच वैयक्तिक उप भोग खर्चाची आकडेवारीची गुंतवणूकदार प्रतिक्षा करत आहेत. युएस बाजारात फेडरल रिझर्व्ह व्याजदरात २५ बेसिस पूर्णांकाने कपात झाल्यानंतर खर्चाची आकडेवारी सकारात्मक आहे का या ची गुंतवणूकदारांना चिंता असल्याने सोने आज काहीशा खालच्या पातळीवर झुकले. अंतिमतः आज बाजारात घसरण झाली आहे.
तज्ञांच्या मते,अमेरिकन डॉलर (USD) मध्ये झालेली वाढ आणि स्थिर ट्रेझरी (Treasury Yield) उत्पन्नामुळे सोन्याच्या किमतीत वाढ होण्याच्या प्रयत्नांना मर्यादा येत आहेत जरी गेल्या आठवड्या त २५-बेसिस-पॉइंट (bps) कपात केल्यानंतर वर्षा अखेरपर्यंत अतिरिक्त व्याजदर कपातीच्या शक्यतेवर बाजारातील दावे ठाम आहेत. सततचे भू-राजकीय तणाव आणि व्यापक मूलभूत आणि तां त्रिक दृष्टिकोन घसरणीच्या जोखमींना कमी करत आहेत, गती विक्रमी क्षेत्राजवळ थांबली तरीही घसरणीच्या खरेदीदारांना गुंतवून ठेवत आहेत.
मंगळवारी वॉशिंग्टनमध्ये बोलताना फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी त्यांच्या परिचित स्क्रिप्टवर ठाम राहून यावर भर दिला की चलनविषयक धोरण 'डेटा-अवलंबित' राहील आणि भविष्यातील व्या जदर निर्णयांसाठी 'कोणताही पूर्वनिर्धारित मार्ग नाही' त्यांनी म्हटले आहे की जोखमींचे संतुलन बदलले आहे, रोजगाराच्या नकारात्मक धोके वाढत आहेत, परंतु सावधगिरी बाळगली की खूप आक्र मकपणे सवलती दिल्यास महागाईचे काम अपूर्ण राहू शकते असे म्हटले होते.