
मुंबई : मुंबईच्या कांदिवली (पूर्व) परिसरात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एका दुकानात आग लागल्याची घटना घडली. या आगीत सहा महिला आणि एक पुरुष गंभीर भाजले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आग सकाळी ९.०५ वाजता राम किसन मेस्त्री चाळ, मिलिटरी रोडवरील आकुर्ली मेंटेनन्स चौकीजवळ असलेल्या एका दुकानात लागली. दुकानातील विद्युत वायरिंग आणि इलेक्ट्रिक उपकरणांमुळे आग गॅस स्टोव्ह अशा वस्तूंमध्ये पसरली असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या दुर्घटनेत रक्षा जोशी (४७), दुर्गा गुप्ता (३०) आणि पूनम (२८) या महिल ८५ ते ९० टक्के भाजल्या असून त्यांना तातडीने बीडीबीए रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर अधिक उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
इतर जखमींची माहिती:
नीतू गुप्ता (३१) – ८०% भाजल्या
जानकी गुप्ता (३९) – ७०% भाजल्या
शिवानी गांधी (५१) – ७०% भाजल्या
मनाराम कुमकत (५५) – ४०% भाजले
घटनास्थळी तत्काळ चार अग्निशमनगाड्या व इतर यंत्रणा दाखल झाली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे, असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.