पुणे : शिवसेनेचे माजी आमदार आणि प्रति शिर्डी शिरगाव चे मुख्य विश्वस्त प्रकाश केशवराव देवळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर बुधवार,दि 24 रोजी दुपारी 3 वा. वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.
कट्टर शिवसैनिक असलेले प्रकाश देवळे हे शिवसेनेतर्फे 1996 मध्ये विधान परिषदेवर निवडून गेले. शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. शिरगाव शिर्डी येथे त्यांनी साईबाबांची प्रतिशिर्डी उभी केली. अन्नछत्र उभारले. अनेक संस्था आणि संघटनांशी त्यांचा जवळचा संबंध होता.