
प्रतिनिधी:ग्रो (Grow) कंपनीने आपल्या आयपीओ फायलिंगनंतर आता वॉलमार्टचा पाठिंबा असलेल्या फोन पे या बड्या फिनटेक कंपनीचा १२००० कोटीचा आयपीओ बाजारात दाखल होत आ हे. ग्रो कंपनीने गोपनीय पद्धतीने डीएआरपी (Draft Red Herring Prospectus DHRP) भरलेला असल्याने कंपनीच्या आयपीओबद्दल अतिरिक्त माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. परंतु रिलायन्स जिओपूर्वी येणारा हा सगळ्यात मोठा आयपीओ असेल यापूर्वी होंडाई मोटर्सचा आयपीओ (IPO) बाजारात दाखल झाला होता. फोन पे (Phone Pay) ला जागतिक दर्जाच्या कंपन्या Ti ger Global, Microsoft, Walmart अशा कंपन्याचा पाठिंबा आहे.
भारतातील सर्वाधिक डिजिटल पेमेंट मार्केटमध्ये व्यापलेल्या मार्केट शेअर असलेल्या कंपन्यापैकी फोन पे चा क्रमांक लागतो. हा आयपीओ बीएसई व एनएसई दोन्ही बाजारात सूचीबद्ध (Listed) होणार आहे. प्राईज बँड, तारखा, इक्विटी शेअरची संख्या याबद्दलची मूलभूत माहिती आगामी दिवसात बाजारात मिळेल.