राज्यातील १९.२२ लाख शेतकऱ्यांसाठी १ हजार ३३९ कोटींची मदत जाहीर !

मुंबई : राज्यात जुलै व ऑगस्ट २०२५ या महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या १९ लाख २२ हजार ९०९ शेतकऱ्यांच्या १५ लाख ४५ हजार २५०.०५ हेक्टरवरील शेत पिकाच्या नुकसानीपोटी १ हजार ३३९ कोटी ४९ लाख २५ हजाराच्या मदतीस मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी दिली. याबाबतचा शासन निर्णय 202509231108205819 निर्गमित करण्यात आला आहे.


यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत सापडला असून शेतकऱ्यांना तत्काळ मदत करून त्याचे जीवन सुकर करण्यासाठी ही मदत निश्चितच उपयोगी पडेल, असा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी व्यक्त केला.



अमरावती विभाग


अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यातील ७ लाख ८८ हजार ९७४ शेतकऱ्यांच्या ६ लाख ५४ हजार ५९५.४२ हेक्टर वरील शेत पिकाच्या नुकसानीपोटी ५६५ कोटी ६० लाख ३० हजाराच्या मदतीस मान्यता.



नागपूर विभाग


नागपूर विभागातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यातील ३७ हजार ६३१ शेतकऱ्यांच्या २१ हजार २२४.६४ हेक्टरवरील शेत पिकाच्या नुकसानीपोटी २३ कोटी ८५ लाख २६ हजाराच्या मदतीस मान्यता.



पुणे विभाग


पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यातील ३६ हजार ५५९ शेतकऱ्यांच्या ८ हजार ८३५.१५ हेक्टरवरील शेत पिकाच्या नुकसानीपोटी १४ कोटी २८ लाख ५२ हजाराच्या मदतीस मान्यता.



छत्रपती संभाजीनगर


छत्रपती संभाजीनगर विभागातील हिंगोली, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यातील १० लाख ३५ हजार ६८ शेतकऱ्यांच्या ८ लाख ४८ हजार ४४५.३७ हेक्टरवरील शेत पिकाच्या नुकसानीपोटी ७२१ कोटी ९७ लाख ८६ हजाराच्या मदतीस मान्यता.



नाशिक विभाग


नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील २४ हजार ६७७ शेतकऱ्यांच्या १२ हजार १४९.४६ हेक्टरवरील शेत पिकाच्या नुकसानीपोटी १३ कोटी ७७ लाख ३१ हजाराच्या मदतीस मान्यता देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

देशव्यापी सायबर सुरक्षा जनजागृती अभियानाचा २५ सप्टेंबरपासून शुभारंभ

नागरिकांसाठी महिनाभर देशव्यापी सायबर सुरक्षा व गोपनीयता जनजागृती अभियान; नागरिकांना सायबर सुरक्षा व

‘ए आय’च्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याची विकासाकडे वाटचाल

निती आयोग करणार सिंधुदुर्गातील ‘ए आय’ प्रकल्पाचा अभ्यास - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : ‘ए आय’

देशात प्रदूषित नद्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल; ५४ नद्यांची भीषण अवस्था, मुंबईतील नद्या मरणासन्न का?

मुंबई : एकेकाळी गावागावांतून वाहणाऱ्या नद्या या जीवनदायिनी होत्या. त्यांचं पाणी पिऊन माणसं जगत होती, शेतं

पुराचा तडाखा बसलेल्यांना जाहीर झाली मदत, दिवाळीआधी मदत देण्याचे संकेत

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या भागांना पावसाचा तडाखा बसत आहे. मराठवाड्यासह विविध

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने घेतले आठ महत्त्वाचे निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या

Katrina Kaif Pregnancy : कुणी तरी येणार येणार गं! विकी-कतरिनाकडे लवकरच येणार गोड पाहुणा, बेबी बंपचा फोटो शेअर करत म्हणाले...

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांनी त्यांच्या चाहत्यांसोबत