अकाली प्रसूती

गर्भधारणा ही स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण व नाजूक प्रक्रिया आहे. साधारणतः ३७ ते ४० आठवड्यांदरम्यान बाळाचा जन्म होतो; परंतु काही वेळा ३७ आठवड्यांपूर्वीच बाळ जन्माला येते, त्याला अकाली प्रसूती असे म्हणतात. अशा बाळांना प्रिमॅच्युअर बेबी म्हणतात. अकाली जन्मलेली बाळे शारीरिक व मानसिकदृष्ट्या अपरिपक्व असल्यामुळे त्यांच्यात गुंतागुंत होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अकाली प्रसूतीची कारणे ओळखणे व योग्य वेळी प्रतिबंधात्मक उपाय करणे हे आई व बाळाच्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेचे आहे.
अकाली प्रसूतीची कारणे
१ आईचे वैद्यकीय आजार उच्च रक्तदाब मधुमेह.
थायरॉईडचे आजार.
मूत्रमार्गातील वारंवार
होणारे संसर्ग.
२. गर्भाशय व गर्भाशयमुखातील समस्या.
गर्भाशयाचे आकारातील दोष.
गर्भाशयमुखाची कमजोरी.
जास्त प्रमाणात
अम्नियोटिक द्रव.
३. एकापेक्षा जास्त गर्भधारणा.
जुळे किंवा तिळे गर्भ असल्यास गर्भाशयावर जास्त ताण येतो व प्रसूती लवकर सुरू होते.
४. आईचे वय व जीवनशैली.
वय खूप कमी (१८ पेक्षा कमी) किंवा खूप जास्त (३५ पेक्षा जास्त).
धूम्रपान, मद्यपान, तंबाखूसेवन
अयोग्य आहार व कुपोषण
शारीरिक श्रम किंवा ताणतणाव.
५. पूर्वीची प्रसूती व गर्भपाताचा इतिहास.
पूर्वी अकाली प्रसूती झालेली असेल तर पुन्हा होण्याची शक्यता वाढते.
६. संसर्ग
गर्भाशयातील, मूत्रमार्गातील किंवा योनीतील संसर्गामुळेही अकाली प्रसूती होऊ शकते.
७. अपघात किंवा आघात
पोटावर मार, पडणे किंवा अपघात यामुळेही अकाली प्रसूतीची शक्यता वाढते.


अकाली प्रसूतीमुळे होणारे धोके
बाळाचे फुप्फुस पूर्ण विकसित नसल्यामुळे श्वसनाचा त्रास होतो.
संसर्ग होण्याचा धोका जास्त.
वजन कमी असल्यामुळे बाळाला उष्णता टिकवणे अवघड जाते.
दीर्घकालीन परिणाम
म्हणून बौद्धिक व शारीरिक विकासात उशीर.
काही बाळांमध्ये ऐकण्यास किंवा पाहण्यास समस्या.


अकाली प्रसूतीचा प्रतिबंध
अकाली प्रसूती पूर्णपणे टाळता येत नसली तरी तिची शक्यता कमी करता येते. त्यासाठी खालील उपाय उपयुक्त ठरतात :
१. गर्भधारणेपूर्व तयारी (Preconception care):
गर्भधारणा होण्यापूर्वी आईचे संपूर्ण आरोग्य तपासणे
आवश्यक आहे.
मधुमेह, थायरॉईड, उच्च रक्तदाब यांसारखे आजार नियंत्रणात आणणे.
फॉलिक ॲसिडसह पोषणपूरक गोळ्या घेणे.
२. गर्भधारणेदरम्यान
नियमित तपासणी :
प्रत्येक महिन्यात स्त्रीरोगतज्ज्ञाकडे तपासणी करणे.
सोनोग्राफी व रक्त तपासण्या योग्य वेळी करून घेणे.
गर्भाशयमुखाची कमजोरी असल्यास सर्व्हिकल सर्क्लाज (Cervical cerclage) ही शस्त्रक्रिया केली जाऊ शकते.
३. योग्य आहार :
प्रथिने, लोह, कॅल्शियम, जीवनसत्त्वे यांचा समावेश असलेला संतुलित आहार घ्यावा.
भरपूर पाणी प्यावे.
मद्यपान, धूम्रपान, तंबाखू यांचा त्याग करावा.
४. संसर्ग टाळणे :
स्वच्छता राखणे, मूत्रमार्गातील व योनीतील संसर्ग वेळेवर
तपासून घेणे.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे न घेणे.
५. जीवनशैलीत सुधारणा:
पुरेसा आराम, योगा, हलका व्यायाम.
ताणतणाव टाळणे.
जास्त कामाचा ताण, जड वस्तू उचलणे टाळावे.
६. औषधोपचार व वैद्यकीय उपाय :
प्रोजेस्टेरॉन हॉर्मोनच्या इंजेक्शन्स किंवा गोळ्या
काही प्रकरणांत उपयोगी पडतात.
धोका जास्त असल्यास बाळाच्या फुप्फुसांचा विकास जलद होण्यासाठी स्टेरॉईड इंजेक्शन दिले जाते.
अकाली प्रसूतीची चिन्हे दिसल्यास (पोटात वारंवार गोळे येणे, रक्तस्त्राव, पाणी येणे) त्वरित रुग्णालयात दाखल व्हावे.


निष्कर्ष
अकाली प्रसूती ही आई व बाळ दोघांसाठीही धोकादायक ठरू शकते. पण योग्य जागरूकता, वेळेवर वैद्यकीय तपासणी, योग्य आहार, संसर्गापासून बचाव आणि जीवनशैलीतील सुधारणा यांद्वारे त्याची शक्यता कमी करता येते. आई निरोगी असेल तरच बाळ निरोगी राहते. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने गर्भधारणेपूर्वी व गर्भधारणेदरम्यान आपले आरोग्य जपावे, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि वेळेवर आवश्यक उपाययोजना कराव्यात.
“सुदृढ मातृत्वातूनच सुदृढ पिढी घडते आणि अकाली
प्रसूती टाळणे हे त्यासाठी अत्यावश्यक आहे.”

Comments
Add Comment

परंपरेला आधुनिकतेचा साज

गायत्री डोंगरे मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यातील शेती संबंधित असा सण आहे. त्यामुळेच या दिवसांमध्ये शेतांत

साहित्यिक कर्मयोगिनी

कर्तृत्ववान ती राज्ञी : चित्रा कुलकर्णी मराठी साहित्यविश्वात गेली अनेक वर्षे निष्ठेने, सातत्याने आणि सामाजिक

स्वतःची किंमत ओळखा

मीनाक्षी जगदाळे लोकांनी तुम्हाला 'चांगले' म्हणावे यापेक्षा लोकांनी तुमचा 'आदर' करावा हे जास्त महत्त्वाचे आहे.

योग : अंध:काराकडून प्रकाशाकडे नेणारा मार्ग 

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके योगिनींनो, म्हणता म्हणता २०२५ हे वर्ष सरलं आणि निरोप घ्यायची वेळ आली सुद्धा.

ओट्स–दुधाची खीर (डायबेटिक-फ्रेंडली)

सुग्रास सुगरण :  गायत्री डोंगरे मधुमेही देखील खाऊ शकतील अशी ओट्स–दुधाची खीर. साधी आहे, पचायला हलकी आहे आणि

कलमधारिणी वीर नारी

मोहिनी गर्गे - कुलकर्णी : कर्तृत्ववान ती राज्ञी वैशाली गायकवाड आयुष्याचा प्रवास कधीही सरळ रेषेत नसतो; तो