Tuesday, September 23, 2025

मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, तर शाहरूख, विक्रांत आणि राणी मुखर्जीला पुरस्कार प्रदान

मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, तर शाहरूख, विक्रांत आणि राणी मुखर्जीला पुरस्कार प्रदान
मुंबई: ७१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे आज दिल्लीच्या विज्ञान भवनात आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विजेत्यांना हा सन्मान पुरस्कार देण्यात आला. यावेळी दाक्षिणात्य अभिनेते मोहनलाल यांना सर्वोच्च दादसाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रमुख विजेते

सर्वोत्कृष्ट अभिनेता: शाहरुख खान (चित्रपट: 'जवान') आणि विक्रांत मेस्सी (चित्रपट: '12th Fail') यांना संयुक्तपणे हा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: राणी मुखर्जी (चित्रपट: 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे') यांना हा पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट चित्रपट: '12th Fail' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन: सुदिप्तो सेन (चित्रपट: 'द केरला स्टोरी') यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. दादासाहेब फाळके पुरस्कार: या वर्षीचा सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना प्रदान करण्यात आला.
Comments
Add Comment