'त्या' ग्रामपंचायतींच्या पायाभूत सुविधांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा, अजित पवारांचे निर्देश


पुणे : पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीची मूळ लोकसंख्या केवळ अकरा हजार इतकी आहे. मात्र लगतच्या एमआयडीसी क्षेत्रामुळे येथे स्थलांतरित लोकसंख्या तब्बल दोन लाखांवर पोहोचली आहे. या वाढलेल्या लोकसंख्येमुळे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा, जलनिस्सारण, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे या भागातील पायाभूत सुविधांचे प्रश्न सोडविण्यासह गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तातडीने आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच याच परिसरातील कारेगाव, ढोकसांगवीसह हिवरे ग्रामपंचायतींचे प्रश्न सुध्दा तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.


रांजणगाव गणपती, कारेगाव, ढोकसावंगी, हिवरे या ग्रामपंचायतींच्या हद्दीतील विविध प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री, आमदार दिलीप वळसे-पाटील आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत रांजणगाव गणपती, ढोकसांगवी, कारेगावसह हिवरे ग्रामपंचायतींच्या प्रश्नांवर विशेष चर्चा झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, रांजणगाव गणपती हे गाव अष्टविनायकांपैकी एका गणपतीचे स्थान असल्यामुळे धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. शिवाय या गावाच्या लगत एमआयडीसी असल्यामुळे येथे असणारे कामगार तसेच हे गाव प्रमुख रस्त्यालगत असल्याने बाहेरील लोकांची स्थलांतरीत लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. या पार्श्वभूमीवर गावातील पायाभूत सुविधा सक्षम करणे ही अत्यावश्यक गरज असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. या भागातील वाढती लोकसंख्या आणि भाविकांचा सततचा ओघ लक्षात घेऊन एमआयडीसीने या भागात विकास कामे करताना जिल्हा परिषदेशी समन्वय ठेवून काम करण्याचे निर्देश दिले.


या बैठकीत रांजणगाव गणपतीसह कारेगाव, ढोकसावंगी, हिवरे या ग्रामपंचायतींच्या प्रतिनिधींनी पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, जलनिस्सारण आदी विषयांवरील अडचणी मांडल्या. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. या बैठकीला संबंधित ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, एमआयडीसी अधिकारी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Comments
Add Comment

"शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचेपर्यंत आमचा प्रयत्न सुरूच राहील" : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुष्काळमुक्तच नाही तर, हरित माणदेशाच्या दिशेने मार्गक्रमण! सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज फलटण,

पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रारंभ, २४ तास दर्शनाची सुविधा!

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तीच्या

नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेले मराठवाड्याचे प्राध्यापक येताना पत्नीसह भीषण अपघात दगावले...

पुणे : छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात विद्यापीठाचे निवृत्त

पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार

भाजप-अजित पवार गट आमने-सामने पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचा फलटण दौरा

सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक झाली आहे.

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन