निसर्गाच्या सान्निध्यात तणावमुक्तीसाठी चला!

आपल्याला मानसिकदृष्ट्या तणावमुक्त होण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात भटकंती करायला हवी. त्यासाठी निसर्गरम्य आणि हिरव्यागार कोकणात गेले पाहिजे. निसर्गाच्या सहवासात मनावरील ताण कमी होतो. त्यासाठी निसर्गाचे फायदे लक्षात घेऊन निसर्गापासून दूर असणाऱ्या व्यक्तींनी भयमुक्त होऊन आयुष्यात आनंदी जगण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात गेलेच पाहिजे म्हणून घेतलेला वेध.


आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात मानसाला मनशांती मिळत नाही. अशा परिस्थितीत जर तुम्हाला खरोखरच शांतता प्राप्त हवी असेल तर तुम्ही निसर्गाच्या जवळ थोडा वेळ घालवला पाहिजे. मनुष्याचे धावते जीवन, कामाचे ओझे, संबंधांची गुंतागूंत ह्यात आणखीन भर म्हणजे आपल्या मनात रोजच्या कामाचा कोलाहल, ताण-तणाव, कधी-कधी ह्या सर्वांपासुन खूप दूर कुठे तरी दाट वनराईमध्ये, पक्ष्यांचे कर्ण मधुर आवाज, वाऱ्याची झुळुक ह्या पर्वांमध्ये कुठे अलगद येणारा झऱ्याचा आवाज, ह्यांचा सहवास हवाहवासा वाटतो. कधी समुद्र किनारी, वाळूमध्ये अनवाणी चालताना, लाटांचे आवाज, विशाल निळे आकाश, अथांग सागर, आकाशामध्ये ईश्वराने केलेली रंगांची उधळण हे सारे दृश्य मनाच्या खोल दरीत घेऊन जाते. ही निसर्गाची साथ मनाला
शांत बनवते.
उच्चशिक्षण घेऊनही गावात रोजगार मिळत नसल्यामुळे रोजीरोटीसाठी गाव सोडून अनेकांना शहरात जावे लागते. याचा परिणाम गावातील अनेक घरे बंद असल्याचे दिसते. त्यात सध्या पुरेसे पोट भरेल इतक्या पगाराची नोकरी देखील मिळणे कठीण झाले आहे. याचा परिणाम अनेक अप्रीय घटना घडत आहेत. चोऱ्या, दरोडेखोर, खून, हत्या या घटनांमध्ये वाढ झाली. धावपळीचे जीवन, वाढती महागाई याने अनेकांचे कंबरडे मोडले. त्यात घरातून बाहेर पडल्यावर वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी लागणारी मन:शांती हे फार मोठे दिव्य असते. असे असतानाही अनेक समस्या, संघर्ष करत जगावे लागते. त्यामुळे हा ताण कमी करण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात गेले पाहिजे. निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर मन मोकळं होते. बऱ्याचवेळा निसर्गाच्या जवळ जाताना आपलं कुटुंब, हक्काची माणसंही आपल्यासोबत हवीत. या वातावरणात अनेक समस्यांचं निराकरण होतं. ही निसर्गाची करामत आहे, हे सत्य आहे. त्यामुळे कधीही, कुठेही निसर्गाची आठवण जर झाली की, कोकण आठवतं. आपल्या हक्काचं ठिकाण. इथे येण्यासाठी तुमचं आर्थिक गणितही बसतं. त्यासाठी मनावरील ताण अथवा दडपण कमी करण्यासाठी निसर्गरम्य कोकणात अधूनमधून जावं. अलीकडे तर परदेशी पाहुण्यांचा ओढाही कोकणाकडे वाढला आहे. कारण त्यांना कोकणातील निसर्गाचे महत्त्व पटले आहे.
मानसोपचार तज्ज्ञ डॉ. समीक्षा स्वाती धोंडीराम जाधव या कोविड महामारीमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये गेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी मला फोन करून त्यांनी तिथे काय मार्गदर्शन केले याची माहिती दिली. निसर्गाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे, ही आजची गरज आहे. आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी आपल्याला दरदिवशी व्यायाम करावाच लागणार. सकस आहार घ्यावाच लागेल. त्यात कोरोनाची भर पडली आहे. त्यामुळे आज प्रत्येकाला स्वत:शी प्रामाणिक राहावं लागेल. दिवसाचे दैनंदिन वेळापत्रक बनवा. निसर्गाच्या सहवासात मोकळा श्वास घ्या. यामुळे नवी ऊर्जा मिळते. आजच्या तरुणांना सगळं चटकन हवंय. त्यामुळे आपल्यापेक्षा त्यांची मानसिकता वेगळी आहे. म्हणूनच आज तरुण वर्गाला आपल्या गावी कोकणात एकदा तरी घेऊन जा. वर्षातून एकदा तरी कोकणात जा. नकळत ते निसर्गाच्या सान्निध्यात, एकत्र कुटुंब पद्धतीत रमतील. थोडे दिवस फास्टफूडपासून दूर राहतील. याचा परिणाम आपल्याला निरोगी जीवन जगता येते. कोकणचे हे सौंदर्य निसर्गाने विनामूल्य दिले आहे. हे वैभव पाहण्यासाठी देशविदेशातून लोक कोकणात येतात. त्यामुळे आपण जरी पोटाची खळगी भरण्यासाठी शहरात आलो तरी आपण सुद्धा निसर्गाचा आनंद लुटला पाहिजे, हे ठामपणे डॉ. समीक्षा सांगतात.
निसर्गाच्या सहवासात गेल्यावर काय वाटते हे सांगून किंवा लिहून समजणार नाही, तर प्रत्यक्षात जावे लागेल. नोकरीनिमित्ताने गगनचुंबी इमारतीमध्ये राहणाऱ्यांनी तर एकदा तरी या शुद्ध हवा, पाणी आणि चुलीवरच्या जेवणाचा आस्वाद घ्या. महागड्या हॉटेलात जाण्यापेक्षा कोकणात जा. आठवड्यातील पाच ते सहा दिवस आपण घर ते कार्यालय असा रोजचा खडतर प्रवास करतो. त्यात रोज दूषित हवेचा सामना करावा लागतो. कृत्रिम थंडगार गारव्यात बसून काम करायला बाहेर पडल्यावर पुन्हा तेच. त्यामुळे कधी कधी सूर्याचे दर्शनही होत नाही. अशा सेवकांनी तर निसर्गाच्या सान्निध्यात येऊन गारेगार व्हाच. कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटक जिल्हा म्हणून देशातील पहिला जिल्हा आहे. हीच खरी कोकणची ओळख आहे. कोकणातील निसर्गरम्य वातावरण असल्याने पर्यटक इथे अधिक आकर्षित होतात. सध्या तर कोकणातील परिसर हिरवागार आहे. त्यामुळे बरेच पर्यटक हवापालट करण्यासाठी येत असतात. यात हिरवेगार डोंगर, डोंगरातून रस्ते, घनदाट झाडी, हिरवेगार सडे-मळे यामधून वाहणारे शुद्ध पाण्याचे वाहणारे नदी-नाले असल्यामुळे हा सुंदर देखावा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. मुंबई ते गोवा असा प्रवास करताना कोकणाच्या उजव्या बाजूला अथांग अरबी समुद्र हे खास वैशिष्ट आहे. ते सुद्धा स्वच्छ समुद्र किनारे यातून त्यांना आनंद मिळत असतो. यामुळे पर्यटकांच्या नेहमीच्या धावपळीच्या जीवनातून तणावमुक्त होण्याला मदत होते.
निसर्गाने बनवलेल्या नियमानुसार चालणारा व्यक्तीच स्वत:च मन स्वस्थ ठेवू शकतो. पहाटेचा सूर्य, त्याची सोनेरी किरणे, ढगांवर चढलेली त्या किरणांची लालिमा, पक्ष्यांचे उडते थवे, कोंबड्यांची आरव जसे तुम्हाला ते नव्याने सुरुवात करायला सांगते. रोज निसर्ग उदार होऊन आपले मातृप्रेम आपल्यावर ओतत असतो. गुणांची उधळण करत राहतो. प्रकृतीचे एक-एक रूप अनेकानेक गुणांनी भरले आहे.त्यामुळे निसर्गाचे रक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. तर आता कसला विचार करता चला तर तणावमुक्त जीवन जगण्यासाठी निसर्गाच्या
सान्निध्यात जाऊया.

Comments
Add Comment

दुरवस्था उड्डाणपुलांची, कोंडी मुंबईकरांची

गेल्याच आठवड्यात मुंबईतील एक महत्त्वाचा उड्डाणपूल बंद झाला. हा पूल बंद झाल्यामुळे मुंबईकरांच्या त्रासात आणखी

निकोबार द्वीप समूहाचा व्यूहात्मक विकास

केंद्र सरकारने अंदमान निकोबार बेट समूहाचा विकास करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. या बेटाचे भौगोलिक स्थान लक्षात

बालेकिल्लाही भाजप विचारांचा होतोय

तरुण मतदारांच्या अपेक्षा रोजगार, शिक्षण व उद्योजकतेशी निगडित आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी अजूनही पारंपरिक

विद्युत वाहनांस प्रोत्साहन

मुंबईतील सूक्ष्मकण प्रदूषण (पीएम २.५ आणि पीएम १०) हा वायू प्रदूषणाचा मुख्य घटक आहे, जो सार्वजनिक आरोग्यासाठी

विद्यार्थ्यांची प्रगती कशी होणार?

विद्यार्थ्यांची प्रगती होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेऊन अध्यापकांनी योग्य मार्गदर्शन करणे

नव्या दोस्तीची अमेरिकेला धास्ती

प्रा. जयसिंग यादव डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ नीतीमुळे चीन, भारत, रशिया अमेरिकेची व्यूहनीती झुगारून एकत्र आले.