
डॉ. सर्वेश सुहास सोमण इंडिया VIX, ज्याला बाजाराचा भीतीचा मापक म्हटले जाते, ते पुढील ३० दिवसांत निफ्टी ५० मध्ये अपेक्षित अस्थिरता दर्शवते. हा लेख इंडिया VIX ची गणना कशी केली जाते, त्याचा बाजारातील भावनेशी संबंध काय आहे, गुंतवणूकदार जोखीम समजून घेण्यासाठी आणि चांगले निर्णय घेण्यासाठी त्याचा वापर कसा करतात यावर आहे.
जेव्हा आपण शेअर बाजाराबद्दल बोलतो तेव्हा सर्वात सामान्यपणे वापरला जाणारा शब्द म्हणजे 'अस्थिरता'. लोक हा शब्द बऱ्याचदा परतावातील चढ-उतारांचे वर्णन करण्यासाठी आणि कधीकधी बाजारातील जोखीम आणि चढउतार दर्शविण्यासाठी वापरतात. शेअर बाजार सहसा गुंतवणूकदारांच्या भावनांवर चालतो आणि त्याची हालचाल खूपच मोठ्या प्रमाणावर चढ उतार दर्शवणारी असते. ज्याप्रमाणे निर्देशांकांद्वारे बाजारातील ट्रेंड बघणे शक्य आहे, त्याचप्रमाणे अस्थिरता मोजणे आणि मूल्यांकन करणे शक्य आहे.
VIX म्हणजे अस्थिरता निर्देशांक, ज्याला अनेकदा 'भय निर्देशांक' म्हणतात. तो पुढील ३० कॅलेंडर दिवसांसाठी निफ्टी ५० च्या अस्थिरतेची बाजाराची अपेक्षा मोजतो. यासाठी अधिक योग्य संज्ञा म्हणजे 'कन्फ्यूजन' किंवा 'अप्रत्याशितता' निर्देशांक. जेव्हा गुंतवणूकदार बाजारातील अस्थिरतेची अपेक्षा करतात तेव्हा VIX निर्देशांक वाढतो. याउलट ज्यावेळी स्थिरता अपेक्षित असते त्यावेळी VIX कमी असतो.
India VIX म्हणजे काय?
VIX हे इंग्रजीत ‘Volatility Index’ चं लघुरूप आहे, VIX हे बाजारातील ‘अस्थिरता’ (volatility) मोजण्याचं प्रमाण आहे. India VIX किंवा भारत अस्थिरता निर्देशांक हा NSE (National Stock Exchange) द्वारे मोजला जातो. हा निर्देशांक हे सांगतो की पुढील ३० दिवसांत Nifty ५० मध्ये कितपत उतार-चढाव (volatility) अपेक्षित आहे.
कसे काम करते?
India VIX मोजताना Nifty च्या option किमतींचा वापर होतो. खास करून call आणि put option च्या दामातून अंदाज लावला जातो की येत्या दिवसांत बाजारात किती बदल होऊ शकतो. जर बाजारात धोक्याची जास्त शक्यता असेल, तर investors hedging करतात, आणि option खरेदी करतात. → त्यामुळे options च्या प्रीमियम वाढतात → VIX वाढतो. उलट, जर बाजार शांत असेल, investor चांगला विश्वासू असेल, volatility कमी अपेक्षित असेल → option प्रीमियम कमी असतात → VIX कमी होतो.
VIX चे अर्थ काय असू शकतात?
.उच्च VIX → बाजारात अनिश्चितता जास्त आहे, गुंतवणूकदार भयभीत आहेत. त्यामुळे मोठे चढउतार होऊ शकतात. कमी VIX → बाजार शांत आहे, अपेक्षा आहे की मोठे बदल होणार नाहीत.
सध्या निर्देशांक हे तेजीत असून पुढील आठवड्याचा विचार करता निफ्टीची २५२५० ही अत्यंत महत्त्वाची पातळी असून जर ही पातळी तुटली तर निर्देशांकात १५० ते २०० अंकांची घसरण होऊ शकते. जोपर्यंत ही पातळी तुटत नाही तोपर्यंत निर्देशांकातील तेजी कायम राहील. त्यामुळे वरील पातळी लक्षात घेऊन व्यवहार करणे आवश्यक आहे. सध्या सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय घडामोडी बघता पुढील काही आठवडे निर्देशांकात मोठे चढ-उतार होणे अपेक्षित आहे.
(सूचना: लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही)