
मोहित सोमण:जवळपास सगळ्याच आयटी शेअर्समध्ये आज घसरण झाली आहे. आज सत्र सुरूवातीलाच आयटी शेअर्समध्ये ६% पर्यंत घसरण झाली होती. सकाळच्या सत्रात आज सर्वाधिक घसरण टेक महिंद्रा, एलटीआय माईंड ट्री, परसिस्टंट सिस्टिम, इन्फो सिस, टीसीएस या शेअर्समध्ये झाले आहे. सकाळच्या सत्रात टेक महिंद्रा (३.९३%), परसिस्टंट सिस्टिम (३.९२%), एलटीआय माईंड ट्री (३.४७%), कोफोर्ज (३.०७%), विप्रो (२.१५%), इन्फोसिस (२.३२%), टीसीएस (२.१८%) मोठ्या प्रमाणात घसरण या समभा गात (Stocks) मध्ये झाली आहे. नवीन एच-१बी व्हिसा अर्जांवर १००००० अमेरिकन डॉलर्सच्या एक-वेळ शुल्काच्या व्हाईट हाऊसच्या स्पष्टीकरणावर गुंतवणूकदारांनी प्रतिक्रिया दिल्याने सोम वारी आयटी शेअर्समध्ये मोठी पडझड आज सुरूवातीच्या सत्रात झा ली आहे.
याशिवाय डिसेंबर महिन्यातील रेकोर्ड हाय असलेला निफ्टी आयटी निर्देशांक (Nifty IT Index) हा २२% घसरला असून आजच्या तारखेपर्यंत गेल्या वर्षाच्या तुलनेत ४.५% शेअर्समध्ये आज घसरण नोंदवली गेली आहे. रविवारी संध्याकाळी जारी केलेल्या निवेद नानुसार, नवीन शुल्क फक्त २१ सप्टेंबरनंतर दाखल केलेल्या नवीन याचिकांवर लागू होत असून त्यात नूतनीकरण किंवा आधीच सादर केलेल्या अर्जांचा समावेश नाही. पर्सिस्टंट सिस्टम्स, एमफॅसिस आणि कॉफोर्जसह अनेक मिड-कॅप आयटी कंपन्यांनी एक्सचेज ना सांगितले की या बदलाचा त्यांच्या व्यवसायावर फारसा किंवा तात्काळ परिणाम होणार नाही.
या घडामोडीवर जेफरीज या रिसर्च संस्थेने म्हटले आहे की,व्हिसा खर्च वाढल्याने भारतीय आयटी सेवा कंपन्यांना त्यांच्या एच-१बी मॉडेलवर पुनर्विचार करावा लागू शकतो, करारांवर पुन्हा चर्चा करावी लागू शकते आणि येत्या तीन ते पाच वर्षांत ४-१३% नफा मिळ वावा लागू शकतो. बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीज (BoFA) ने दिलेल्या माहितीनुसार,तीन वर्षांच्या कालावधीत एकूण क्युमिलेटिव आधारावर ७-१८% संचयी नफ्याचा परिणाम अंदाजित केला आहे, ज्यामुळे कंपनीच्या वार्षिक २-६ टक्के ईपीएस (Earning pe r share EPS) वर परिणाम होऊ शकतो.इनक्रेड सिक्युरिटीजच्या मते, अमेरिकेच्या व्हिसा-संबंधित गोंधळा मुळे सध्याच्या अनिश्चिततेत आणि निर्णय घेण्यातील विलंबात एक नवीन वेक्टर जोडला जात आहे.ऑनसाईट महागाई मध्यम कालावधीत व्यवसाय कर ण्याचा खर्च वाढवू शकतेआणि, पर्यायाने, ईबीआयटी (Earning before interest and tax EBIT) मार्जिनवर परिणाम करू शकते.
यामुळेच आज बाजारात मोठ्या प्रमाणात आयटी शेअर्समध्ये 'सेल ऑफ' झाले असून गुंतवणूकदारांना अजून या घडामोडींनंतर आश्वासक चित्र स्पष्ट झाले नाही. त्यामुळे भविष्यातील घडामोड भविष्यातील शेअर हालचालीवर परिणामकारक ठरू शकते ज्यामध्ये मायक्रो व मॅक्रो घटनांचा समावेश आहे. दुपारी १.३५ वाजेपर्यंत हेवीवेट शेअर्समध्ये इन्फोसिसचा शेअर २.७५% टीसीएस शेअर ३.०५%, विप्रो शेअर २.११%, कोफोर्ज शेअर ४.०२%, टेक महिंद्रा ३.४४% घसरला आहे.