
दहावी आणि बारावी परीक्षेसाठी खासगी विद्यार्थी नाव नोंदणी
मुंबई : फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसाठी खासगी विद्यार्थी नाव नोंदणी अर्ज (फॉर्म नंबर १७) नियमित शुल्कासह ऑनलाईन स्वीकारण्याच्या तारखेस ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मंडळामार्फत देण्यात आली आहे. इयत्ता दहावी व इयत्ता बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरित्या फॉर्म नंबर १७ भरून परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
इयत्ता दहावी व इयत्ता बारावी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांकरिता सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालये मंडळाच्या अटी, शर्तीनुसार नाव नोंदणी करण्याकरता उपलब्ध आहेत. या संदर्भातील सर्व माहिती http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. विद्यार्थ्यांना नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच भरावयाचे आहेत. कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही.