
खैबर पख्तूनख्वा : दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी उड्डाण केलेल्या पाकिस्तान एअरफोर्सने सोमवारी सकाळी प्रचंड चूक करत आपल्याच नागरिकांवर बॉम्बचा हल्ला केला. या भीषण हल्ल्यात तब्बल ३० नागरिकांचा मृत्यू झाला असून, त्यात महिला व लहान मुलांचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २२ सप्टेंबर रोजी खैबर पख्तूनख्वाच्या तिराह व्हॅली भागात पाक एअरफोर्सकडून हवाई हल्ला करण्यात आला. यावेळी चिनी बनावटीच्या जे-१७ फायटर जेट्समधून एअर स्ट्राईक सुरू होती. मात्र, लक्ष्य चुकल्याने काही बॉम्ब थेट नागरिकांच्या घरांवर कोसळले. या दुर्घटनेत ३० जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाल्याची माहिती स्थानिक सूत्रांकडून समोर आली आहे. तरीदेखील, पाकिस्तान एअरफोर्सने या प्रकरणी अद्याप एकही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.
७०० दहशतवादी हल्ल्यांनंतर पाकिस्तानची झोप उडाली
पाकिस्तानमधील दहशतवादाचा विळखा दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत चालला आहे. फक्त ऑगस्ट महिन्यातच खैबर पख्तूनख्वा प्रांतात तब्बल ७०० हून अधिक दहशतवादी हल्ले झाले. या भीषण कारवायांमध्ये २५८ पाकिस्तानी जवानांनी प्राण गमावले. सततच्या हल्ल्यांमुळे हैराण झालेल्या पाकिस्तानी सैन्याने अखेर खैबर बॉर्डरवर मोठं स्पेशल अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष कारवाईचा भाग म्हणून डेरा इस्माईल खान आणि बाजौर भागात पाकिस्तान एअरफोर्सकडून जोरदार एअर स्ट्राईक करण्यात आला. दहशतवाद्यांच्या अनेक ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र, या हल्ल्यांमध्ये किती दहशतवादी ठार झाले किंवा नुकसान किती झालं याबाबत अधिकृत आकडेवारी अद्याप जाहीर झालेली नाही.

प्रतिनिधी:आरबीआयने आपल्या नव्या Weekly Statistical Supplement या माहिती पत्रिकेत परकीय चलनासाठ्याची आकडेवारी जाहीर केली आहे. या अहवालानुसार, परकीय चलन (Foreign Exchange Reserves) मध्ये ...
तिराह वॅलीत पाकिस्तानी आर्मीची मोठी चूक
सोमवारी सकाळीच डेरा इस्माईल खान भागात झालेल्या ऑपरेशनमध्ये सात दहशतवादी ठार मारल्याचा दावा पाकिस्तानी सैन्याने केला होता. यामुळे दहशतवादविरोधी लढाईत सैन्याला मोठं यश मिळाल्याचं सांगण्यात आलं. मात्र, याच धर्तीवर तिराह वॅलीमध्ये नियोजित ऑपरेशनदरम्यान घडली एक गंभीर चूक. पाकिस्तानी एअरफोर्सच्या कारवाईत चुकून दहशतवाद्यांऐवजी नागरिकांवरच बॉम्ब पडले. यात महिला आणि लहान मुलांसह अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संताप पसरला असून, पाकिस्तान आर्मीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
📍 Video of the DAY 🔥 Kashmir erupts with ‘Vande Mataram’ & ‘Jai Shri Ram’ after India’s win over Pakistan. — A scene unimaginable before Modi govt. New Kashmir, New India 🇮🇳 pic.twitter.com/6kTqfsJga6
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) September 22, 2025
टीटीपीचे ६००० पेक्षा जास्त दहशतवादी सक्रिय
तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) ही सर्वात खतरनाक दहशतवादी संघटना इथे सक्रिय असून, आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी मोठं आव्हान ठरत आहे. युनायटेड नेशन्सच्या अहवालानुसार, टीटीपीकडे तब्बल ६००० पेक्षा जास्त दहशतवादी आहेत. याशिवाय या संघटनेचे १० पेक्षा अधिक ट्रेनिंग कॅम्प कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. खैबरमधील कठीण डोंगराळ भौगोलिक परिस्थिती आणि अफगाणिस्तानच्या सीमेजवळील स्थान यामुळे या संघटनेला मोठा फायदा होतो. विशेष म्हणजे, खैबर जिल्हा अफगाणिस्तानच्या सीमेजवळ असल्याने दहशतवाद्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणं कठीण झालं आहे. अफगाणिस्तानातून सहज प्रवेश मिळाल्याने दहशतवादी पाकिस्तानात घुसून हल्ले घडवून आणतात आणि परत सीमापार निसटतात. त्यामुळे हा भाग पाकिस्तानी सुरक्षेसाठी सर्वात मोठं डोकेदुखी ठरला आहे.
पाकिस्तानात कट्टर इस्लामिक शासन आणण्याच्या टीटीपीच्या हालचाली
सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, टीटीपीला अफगाणिस्तानकडून थेट किंवा अप्रत्यक्ष मदत मिळत असल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. अफगाणिस्तानातील तालिबानी शासनावर पाकिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय आणि संरक्षण पुरवल्याचे गंभीर आरोप वारंवार केले जात आहेत. पाकिस्तान सरकारचा आरोप आहे की, खैबरसारख्या सीमावर्ती भागात टीटीपी दहशतवादी नवी भरती करत असून, अफगाणिस्तानातून शस्त्रास्त्रं आणि तांत्रिक मदत मिळते. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याचं काम अधिक कठीण झालं आहे. टीटीपीच्या कारवायांमुळे देशात आधीच शेकडो जवान आणि नागरिकांचे जीव गेले आहेत. पाकिस्तानातील लोकशाही व्यवस्थेवर घाला घालून कट्टर इस्लामी कायदे लागू करणं हा टीटीपीचा दीर्घकालीन हेतू असल्याचं सुरक्षा विश्लेषकांचं म्हणणं आहे.
एअर स्ट्राइक चुकून की जाणूनबुजून?
पाकिस्तानातील खैबर प्रांतातील एअर स्ट्राइकमुळे ३० नागरिकांचा बळी गेल्यानंतर मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. हा हल्ला खरंच चुकून झाला की जाणूनबुजून केला गेला? असा संशय उपस्थित होऊ लागला आहे. पाकिस्तानी आर्मीने याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही. मात्र, स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की लष्कराने खैबरमधील लोकांना मुद्दाम लक्ष्य केलं. कारण या प्रांतातील लोक गेल्या काही दिवसांपासून सैन्याच्या कारवायांविरोधात आक्रोश व्यक्त करत होते. या घटनेला आणखी गंभीर वळण देणारी गोष्ट म्हणजे, खैबर प्रांत हा माजी पंतप्रधान इमरान खान यांचा बालेकिल्ला मानला जातो. पाकिस्तानात सध्या इमरान खान आणि लष्कर यांच्यातील संघर्ष लपून राहिलेला नाही. अनेक राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की, या हल्ल्यामागे राजकीय सूडाची छटा असू शकते. खैबर हे पाकिस्तानातील एकमेव राज्य आहे जिथे इमरान खान यांचा पक्ष सत्तेवर आहे. त्यामुळे, एअर स्ट्राइकमुळे नागरीकांचा बळी जाणं केवळ दहशतवादविरोधी कारवाई नसून राजकीय डावपेचाचाही भाग आहे का? असा सवाल अधिक तीव्रतेने उपस्थित होत आहे.