Money : आता वर्षाला २.५ लाखांपर्यंत होणार तुमची बचत...

मुंबई : घटस्थापनेच्या मुहूर्तावर केंद्र सरकारने आजपासून नवीन जीएसटी दर लागू केले. या महत्वपूर्ण निर्णयामुळे मध्यमवर्गीयांना कारपासून ते स्वयंपाकघरातील बहुतांश वस्तू खरेदी करताना मोठा फायदा होणार असल्याचे म्हटले जात आहे. यापूर्वी १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नाला आयकरातून सूट देण्यात आली होती. आता जीएसटी नवीन दर लागू झाल्यामुळे, लोकांच्या मनात हा प्रश्न रेंगाळत आहे की किमती कमी झाल्यानंतर मध्यमवर्गीय दरमहा किती पैसे वाचवेल.


या सर्व बदलांचा विचार केला तर वार्षिक १२ लाख रुपयांचे उत्पन्न असलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबाला दरमहा साधारण ११,००० ते १२,००० रुपयांची बचत होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच केलेल्या भाषणात म्हटल्याप्रमाणे, आयकर आणि जीएसटी कपातीमुळे देशातील लोकांना मिळणारी एकत्रित बचत २.५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल. जर ही बचत दरमहा एसआयपीद्वारे १२% परताव्यावर गुंतवली तर पुढील १० वर्षांत जवळपास २५ लाख रुपयांचा निधी तयार होऊ शकतो.


दरम्यान, जीएसटी कौन्सिलने ३ सप्टेंबरला घेतलेल्या निर्णयानुसार ५%, १२%, १८% आणि २८% असे चार करस्लॅब कमी करून आता केवळ ५% आणि १८% स्लॅब लागू केले आहेत. तंबाखू व लक्झरी वस्तूंवर मात्र अतिरिक्त कर कायम राहणार आहे. या बदलामुळे साबण, टूथपेस्ट, शाम्पू, स्वयंपाकघरातील भांडी, शालेय साहित्य, औषधे, दूध, चीज, बटर, बिस्किटे, स्नॅक्स आणि नूडल्स यांसारख्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत. दरमहा ५,००० रुपयांच्या दैनंदिन वस्तूंच्या खर्चावर साधारण ५०० रुपये तर खाद्यपदार्थांवरच्या ८,००० रुपये ते १०,००० रुपयांच्या खर्चावर ८०० रुपये ते १,००० रुपयांची बचत होईल.


वाहनांवरील करही मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आला आहे. कार, दुचाकी आणि तीनचाकी वाहनांवरील कर २८% वरून १८% करण्यात आला असून सायकलींवरचा कर १२% वरून ५% केला आहे. यामुळे लाखभराच्या दुचाकीवर थेट १०,०००, सहा ते आठ लाखांच्या कारवर ६०,००० रुपये ते ८०,००० आणि तीन लाखांच्या ऑटो रिक्षावर ३०,००० रुपयांची बचत होईल. वाहनांच्या सुटे भागही १०% स्वस्त होणार असल्याने देखभालीचा खर्च कमी होईल.


घर बांधताना लागणाऱ्या सिमेंट, ग्रॅनाइट, संगमरवरी व बांबूसारख्या साहित्यांवरील कर कमी करण्यात आल्याने ५० लाखांच्या घरावर साधारण ३ ते ४ लाख रुपयांची थेट बचत होईल. इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्येही दिलासा मिळणार आहे. ४०,००० रुपयांच्या टीव्हीवर ४,००० रुपये, ३५,००० च्या एसीवर ३,५०० रुपये आणि ६०,००० रुपयांच्या सोलर वॉटर हीटरवर तब्बल ७,००० रुपये स्वस्त होणार आहेत.


नवीन करप्रणालीनुसार १२ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर आता कोणताही कर लागणार नाही. यामुळे वार्षिक १२ लाख रुपये पगार असलेल्या व्यक्तीला दरमहा साधारण ७,८०० रुपये तर वार्षिक १० लाख पगार असलेल्या व्यक्तीला ५,२०० रुपये आणि वार्षिक ८ लाख उत्पन्न असलेल्या व्यक्तीला सुमारे ३,००० रुपये दरमहा बचत होणार आहे. ३०,००० किंवा ५०,००० रुपये पगार असलेल्यांसाठी मात्र पूर्वीप्रमाणेच करमाफी असल्याने अतिरिक्त फायदा होणार नाही.


सणासुदीच्या हंगामात लागू झालेल्या या निर्णयांमुळे वाहन, घरगुती उपकरणे आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तू खरेदी करणाऱ्या मध्यमवर्गीयांच्या खिशात प्रत्यक्ष बचतीच्या स्वरूपात दिलासा मिळणार आहे.

Comments
Add Comment

अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर सर्वोच्च न्यायालय नाराज

नवी दिल्ली : अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडिया ड्रीमलाइनर AI-171 विमानाचा १२ जून २०२५ रोजी भीषण अपघात झाला

GST 2.0 सुधारणा लागू केल्यानंतर पंतप्रधान मोदींचे देशाला पत्र

नवी दिल्ली : भारतात GST 2.0 सुधारणा सोमवार २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू झाल्या आहेत. घटस्थापनेच्या दिवशी सुधारणा लागू

Kantara A Legend Chapter 1 : अक्षरश: अंगावर काटा! 'कांतारा चॅप्टर १'च्या ट्रेलरने उडवले प्रेक्षकांचे होश

कन्नड सिनेसृष्टीत २०२२ मध्ये ‘कांतारा’ने (Kantara A legend Chapter 1) प्रेक्षकांची मनं जिंकत प्रचंड धुमाकूळ घातला. ऋषभ

Irfan Pathan On Ind vs Pak Asia Cup 2025 : साहिबजादाची नापाक हरकत! गोळीबाराची ॲक्शन पाहून इरफान पठाण Live कॉमेंट्रीमध्ये म्हणाले…

आशिया चषक २०२५ च्या सुपर-४ फेरीत पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान आमनेसामने आले. या रोमांचक सामन्यात

पूनम पांडे होणार मंदोदरी, दिल्लीत रामलीला सुरू होण्याआधी भडकलं महाभारत

नवी दिल्ली : देशात ठिकठिकाणी रामलीला कार्यक्रम सोमवार २२ सप्टेंबरच्या संध्याकाळपासून सुरू होत आहे. पण हा

जीएसटी दर कपातीत सुमारे ३७५ वस्तू होणार स्वस्त

मुंबई : जीएसटी दर कपातीनंतर आता स्वयंपाकघरातील वस्तूंसोबत इलेक्ट्रॉनिक्स, औषधे, उपकरणे आणि वाहनांपर्यंत सुमारे