Monday, September 22, 2025

सलग दहाव्या तिमाहीत घर विक्रीत घसरण या तिमाहीत ४% घसरणीसह सर्वाधिक घसरण महाराष्ट्रात

सलग दहाव्या तिमाहीत घर विक्रीत घसरण या तिमाहीत ४% घसरणीसह सर्वाधिक घसरण महाराष्ट्रात

मुंबई:प्रॉपइक्विटीच्या नव्या अहवालानुसार, भारतातील आघाडीच्या नऊ शहरांमधील घरांच्या विक्रीत ४% घसरण झाली आहे. सलग दहाव्या तिमाहीत (Quarterly) घसरण झाली आहे. आर्थिक २०२५-२६ च्या तिसऱ्या जुलै ते सप्टेंबर तिमाहीत १ लाख युनिटच्या वर विक्री १००३७० युनिट्सवर स्थिरावली होती असे रिअल इस्टेट डेटा अँनालिटिक्स कंपनी प्रॉपइक्विटीने म्हटले आहे. अहवालातील माहितीनुसार तथापि नवीन लाँचिंग स्थिर राहिले आहे तिमाही बेसिसवर (Quarter on Quarter QoQ) बेसिस आधारावर १०% घसरून १ लाखाच्या खाली येत ९२२२९ युनिट्सवर पोहोचले आहे. इतर शीर्ष नऊ शहरांमध्ये बेंगळुरू,चेन्नई, हैदराबाद, मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, कोलकाता आणि दिल्ली-एनसीआर यांचा समावेश असल्याचे अहवालात नमूद केले गेले आहे.

आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत पहिल्या नऊ शहरांमध्ये विक्रीत वार्षिक (वार्षिक) घट प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेशामुळे झाली होती. ज्यामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पुणे यांचा समावेश आहे ज्यामध्ये सामान्यतः ६% ते २८% घसरण झाली आहे. मात्र आर्थिक २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत बेंगळुरू, चेन्नई आणि कोलकाता येथे अनुक्रमे २१%, १६% आणि २५% वाढ झाली. आर्थिक २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत दिल्ली-एनसीआर आणि हैदराबादमध्येही वार्षिक विक्रीत ४% वाढ झाली.अहवालातील माहितीनुसार, तिमाहीत बेसिसवर शीर्ष नऊ शहरांमधील विक्रीत १% किंचित घटली आहे ज्यामध्ये फक्त दिल्ली-एनसीआर (२४%) आणि ठाणे (११%) मध्ये घसरण झाली असून इतर सात शहरांमधील घरांच्या विक्रीत वाढ झाली असल्याचे स्पष्ट केले गेले.

या अहवालातील निरिक्षणावर भाष्य करताना प्रॉपइक्विटीचे संस्थापक आणि सीईओ समीर जसुजा म्हणाले आहेत की,' नवीन लाँच सलग कमी होत असले तरी गृहनिर्माण बाजारपेठ निरोगी आहे असे आम्हाला का वाटते याचे कारण म्हणजे विक्री नवीन लाँचपेक्षा जास्त आहे. आम्हाला असा अंदाज आहे की २०२५ मध्ये अंदाजे ४ लाख युनिट लाँच आणि अंदाजे ४.५ लाख विक्री होईल, जी २०२४ च्या आकड्यांपेक्षा किंचित कमी आहे.'नवीन गृहनिर्माण पुरवठ्याच्या बाबतीत, अहवालात असेही म्हटले गेले आहे की भारतातील शीर्ष ९ शहरांमध्ये नवीन लाँचिंग मात्र इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) स्थिर राहिले. आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत १ लाख युनिटच्या खाली ९२२९ युनिट्स राहिले. यावर अधिक माहिती देताना जसुजा म्हणाले आहेत की,'चालू तिमाहीत मंदावलेली का मे झाली असली तरी, सणासुदीच्या हंगामामुळे आगामी तिमाहीत पुन्हा वाढ होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे मागणी वाढेल, ज्यामुळे लाँचिंगची गती सुधारेल आणि शोषण पातळी वाढेल.'

चेन्नई, नवी मुंबई, पुणे आणि कोलकातामध्ये नवीन लाँचिंगमध्ये वार्षिक वाढ झाली आहे आणि बेंगळुरू, हैदराबाद, मुंबई, ठाणे आणि दिल्ली-एनसीआरमध्ये घट झाली आहे. तथापि, नवीन पुरवठ्यात तिमाहीत १०% टक्के घट झाली आहे.माहितीनुसार ,दिल्ली-ए नसीआरमधील विक्रीत ३१% घसरण झाली आहे, त्यानंतर पुण्यात १५% आणि चेन्नईमध्ये २९% घसरण झाली आहे. तथापि, हैदराबाद, कोलकाता आणि नवी मुंबईमध्ये या शहरांमध्ये मात्र अनुक्रमे १४%,२४% आणि ६% वाढ झाली आहे, असे अहवालात म्हटले गे ले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >