मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आला उच्च न्यायालयाचा निर्णय


मुंबई : मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. यामुळे हैदराबाद गॅझेटियरच्या मदतीने मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या शासनमान्य प्रक्रियेतील अडथळे दूर झाले आहेत.


फडणवीस सरकारने सप्टेंबर महिन्यात हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदी आणि इतर पूरक कागदपत्रांची छाननी करुन अर्ज करणाऱ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत एक शासननिर्णय काढल्याचे सांगितले. याच सरकारी निर्णयाची प्रत काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांना देण्यात आली. जरांगेंनी प्रसारमाध्यमांसमोर दाखवलेल्या शासननिर्णयाला अनेक ओबीसी संघटनांनी आव्हान दिले होते. या याचिकांवर आज सुनावणी घेण्यात येण्याची शक्यता होती. मात्र न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे व न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठाने तांत्रिक कारणावरून या याचिकांवर सुनावणी करण्यास आज नकार दिला आहे. त्यामुळे आता या याचिका मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर व न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणीला जाण्याची शक्यता आहे. जोपर्यंत पुढील निर्णय येत नाही तोपर्यंत मराठा आरक्षण सुरक्षित आहे. जीआरनुसार कागदपत्रे तपासून आणि हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदी बघून योग्य व्यक्तींना कुणबी प्रमाणाक्ष दिले जाईल.


कुणबी प्रमाणपत्रांद्वारे मराठ्यांचे ओबीसीकरण सुरू असल्याचा आरोप ओबीसींमधून मराठ्यांवर होत आहे. हा प्रकार ओबीसींवर अन्याय करणारा असल्याची भूमिका अनेक ओबीसी नेत्यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने काढलेल्या जीआरला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. पण तांत्रिक कारणांमुळे मुंबई उच्च न्यायालयने सोमवारी सुनावणी घेण्यास नकार दिला. यामुळे सध्या शासनाचा जीआर सुरक्षित आहे.


Comments
Add Comment

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत बेस्ट पुरवणार 'बेस्ट सेवा'

मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमीवर डॉ.

'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर

मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची अर्थात 'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. या

मुंबईतल्या दुबार मतदारांचा फुगा फुटणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - दुबार मतदारांचा फुगा आता फुटला जाणार असून महापालिकेच्या पहिल्या प्रयोगातच हा फुगा

म्हाडा सेस इमारती आणि भाडेकरुंसह दुकानांनी अडवला हँकॉक पुलाचा मार्ग

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मध्य रेल्वेच्या भायखळा आणि सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या हँकॉक पुलाची

हरकती व सूचनांच्या पडताळणीसाठी स्थळ पाहणी करुन योग्य निर्णय घ्यावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ च्या अनुषंगाने, संबंधित सर्व

महात्मा फुलेंशी संबंधित फाईल मंत्रालयातून गायब; महसूल मंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

मुंबई : महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनावर तयार होणाऱ्या सरकारी डॉक्युमेंटरीशी संबंधित महत्त्वाची फाईल गायब