Sunday, September 21, 2025

दसरा-दिवाळीत सुक्यामेव्याची खरेदी सर्वसामान्यांना शक्य!

दसरा-दिवाळीत सुक्यामेव्याची खरेदी सर्वसामान्यांना शक्य!

बदाम, पिस्ता, खजूर प्रतिकिलो ४० ते १०० रुपयांनी स्वस्त

मुंबई (प्रतिनिधी) : खजूर, बदाम, पिस्ता हे खाण श्रीमंतीचे लक्षण समजले जात होते. सुकामेव्याच्या वाढत्या दरामुळे गोरगरीबांना दिवाळी दसरा सणाच्या कालावधीत खरेदी करणे त्यांना अवघड जात होते. केंद्र सरकारने जीएसटीत केलेल्या बदलामुळे सुकामेव्याची खरेदी आता सर्वांच्या आवाक्यात येणार आहे.

नवरात्र उत्सवात देवीची घटस्थापना सोमवारी (दि. २२) होत आहे. त्यानिमित्ताने सोमवारपासून देशात केंद्र सरकारने जीएसटीचे दर कमी केले आहे. यामध्ये द्वायफ्रूट सुकामेव्याचे दर १२ टक्क्यांवरून जीएसटी ५ टक्के करण्यात आले आहे. यामुळे खजूर, बदाम, पिस्ता, अंजीर, आक्रोड, जर्दाळू आदी सुकामेवा प्रतिकिलो ४० ते १०० रुपयांनी स्वस्त होणार आहे. नवरात्र उत्साहात मोठ्या प्रमाणात उपवास केला जातो.

सुकामेव्यातील दरात घट झाल्याने विक्रीत वाढ होऊन दिवाळी दसऱ्यामध्ये गिफ्ट देण्याच्या बॉक्समध्ये सुकामेव्याच्या उलाढालीला गती मिळेल. दिवाळीमध्ये घरी येणाऱ्या पाहुण्यांना देण्यात येणाऱ्या भेटवस्तूंमध्ये सुकामेव्याच्या पॅकिंग विक्रीतील उलाढाल वाढून मार्केटमधील अर्थकारणात बदल झालेला पाहावयास मिळेल.- अमर चौधरी, नवदुर्गा सुपर मार्केट

इराण, अफगाणिस्तान या देशातून खजुरांची आयात केली जाते. मागील वर्षाच्या तुलनेत खजुरांच्या भावात २५ टक्के घट झाली आहे. यंदा मात्र केंद्र सरकारने १२ टक्क्यांवरून ५ टक्के जीएसटी केल्याने ड्रायफ्रूट दरात घट झाली असून ३६० चा खजूर २७० पर्यंत आला आहे. यामुळे सामन्यांकडून मागणी वाढणार असून हे दर दसरा, दिवाळीमध्येही असेच राहणार असून सामान्यांची दिवाळी गोड होणार आहे. - नवीन गोयल,डायफ्रूट व्यापारी व दी पूना मर्चट चेंबर सदस्य

Comments
Add Comment