Monday, September 22, 2025

अरुण गवळी तुरुंगातून बाहेर, आता लेक योगिता गवळी राजकारणात सक्रिय!

अरुण गवळी तुरुंगातून बाहेर, आता लेक योगिता गवळी राजकारणात सक्रिय!

मुंबई: अनेक वर्षांनी तुरुंगातून बाहेर आलेले माजी आमदार अरुण गवळी यांनी आता राजकारणात सक्रिय होणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र, त्यांच्या जागी त्यांची दुसरी मुलगी योगिता गवळी राजकारणात प्रवेश करणार आहे. यापूर्वीच त्यांची मोठी मुलगी गीता गवळी राजकारणात सक्रिय आहे. अखिल भारतीय सेना पक्षाकडून या दोन्ही मुली आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवणार आहेत.

?si=LhJ_OwXY9iKmH5sm

गवळी यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी

१९८० च्या दशकात रमा नाईक आणि बाबू रेशीमसोबत गवळींनी आपली टोळी (Gang) तयार केली होती. गवळींच्या टोळीने नंतर भायखळा टोळीला संपवून आपले वर्चस्व निर्माण केले. रमा नाईकच्या एन्काउंटरनंतर अरुण गवळींचे दाऊदसोबत वैर वाढले. गवळी यांनी रिअल इस्टेट व्यवसायातून मोठी कमाई केली. २ मार्च २००७ रोजी शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती.

योगिता गवळी राजकारणात दाखल

योगिता गवळी पेशाने वकील असून, त्या 'कर फाऊंडेशन'च्या संस्थापिका आहेत. त्यांचा विवाह अभिनेता अक्षय वाघमारे यांच्याशी झाला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने त्या राजकारणात प्रवेश करत आहेत. अखिल भारतीय सेनेच्या तिकिटावर त्या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

 
Comments
Add Comment